पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०१५मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दिल्लीची टीना दाबी ही देशात प्रथम आली असून, सोलापूरच्या योगेश कुंभेजकर याने राज्यात प्रथम तर देशात आठवा क्रमांक मिळविला. राज्यातील १००हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. श्रीकृष्णनाथ पांचाळ याने राज्यात दुसरा आणि देशात १६वा क्रमांक मिळवला, तर सौरभ गहरवार याने राज्यात तिसरा आणि देशात ४६वा क्रमांक मिळविला आहे. यूपीएससीतर्फे २०१५च्या परीक्षेत यश संपादन केलेल्या १ हजार ७८ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या उमेदवारांची इंडियन अॅडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ‘ए’ आणि ग्रुप ‘बी’ या पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे.
दरवर्षी राज्यातील सुमारे ८ ते १० टक्के विद्यार्थी यूपीएससीमध्ये यश संपादन करतात. यंदाही १० टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. ७ ते ८ विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. मात्र, पहिल्या शंभरमध्ये राज्यातील कमी विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. राज्यातील मुलींंना मात्र तुलनेने कमी यश मिळाले आहे. (प्रतिनिधी)
यूपीएससी परीक्षेतील महाराष्ट्रातले गुणवंत(गुणवत्ता यादी क्रमांकांसह)योगेश कुंबेजकर (८), सौरभ गहरवार ४६, हनुमंत झेंडगे ५0, विशु महाजन ७०, निखिल पाठक १०७, स्वप्नील वानखडे १३२, स्वप्नील खरे १९७, राहुल पांडवे २००,नवनाथ गव्हाणे २२०, हर्षल भोयर २३३, मुकुल कुलकर्णी २३८, रोहित गोडके २५७, अक्षय कोंडे २७८, रवींद्र खटाळे २८३, आशिष काटे ३२८, पंकज खंडागळे ३४०, अक्षय पाटील ३४४, संजीव चेथुले ३५४, दत्तात्रेय शिंदे ३७७, विवेक भस्मे ३९५, श्रीकांत सुसे ४००, रेहा जोशी ३२५, वासुद तोरसेकर४४०, कपिल गाडे ४५५, संदीप भोसले ४८२, स्वप्नील पुंडकर ४८७, शिबी गहरवार ४८९, अमित आसरे ४९०, अदिती वाळुंज ४९१, पुनम पाटे ४९७, तुषार वाघ ५४५, देवयानी हलके ५७६, प्रसाद मेनकुंदळे ५९९, प्रवीण डोंगरे ६०१, आकाश वानखडे ६०३, किरणकुमार जाधव ६१४, किरण शिंदे ६१८, ऋ षिकेश खिल्लारी ६२७, शरदचंद्र पवार ६३२, गोपाल चौधरी ६३५, कुलदीप सोनवणे ६३६, विशाल नरवडे ६४०, पवन बनसोड ६७४, शशांक शेव्हरे ६८२, श्रुती शेजोळे ६९०,स्वप्नील कोठवडे ६९३, राहुल तिरसे ७०५, विनोदकुमार येरणे ७०९, रामदास काळे ७११, स्वप्नील महाजन ७२०, नितीश पाठोडे ७२३, रोहन आगवणे ७३५, समीर पाटील७४६लक्षमीकांत सुर्यवंशी ७५०, प्रांजल पाटील ७७३, संदीप साठे ७७५,विक्र म विरकर ७८४,जय वाघमारे ७८८,किशोर तांदळे ८१४, शुभम ठाकरे ८१७, ओमकारेश्वर कांचिनगरे ८२०, संदीप पानदुले ८२६, भूषण भिरु ड ८२९, संघमित्र खोब्रागडे ८३२,योगेश पाटील ८३६,रामदास भिसे ८५१,स्वप्नील चौधरी ८६२