शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

योगी आदित्यनाथ अर्थमंत्री झाले तरी देशाची अर्थव्यवस्था '' तो'' टप्पा गाठणारच : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 8:18 PM

जीएसटी अंमलबजावणीतील घोळ आणि मंदीच्या वातावरणामुळे सरकारने हा डल्ला मारला आहे.

ठळक मुद्देउद्योगाला चालना न दिल्यास १० लाख लोकांच्या नोकऱ्या जाण्याची भिती मंदीच्या वातावरणामुळे वित्तीय तुट मोठ्या प्रमाणावर वाढली बँक घोटाळ्यांवर त्यांचे विलीनीकरण हे उत्तर नाही.

पुणे : देशाच्या विकासदराचा ५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा आलेख हा अर्थव्यवस्था गंभीर वळणावर असल्याचे निदर्शक आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारकडून पाच ट्रिलियन डॉलरचे दिवास्वप्न दाखविले जात आहे. निर्मला सीतारामन यांच्याऐवजी योगी आदित्यनाथ अर्थमंत्री झाले तरी देशाची अर्थव्यवस्था कधी ना कधी हा टप्पा गाठणार आहे, असा टोला लगावत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्याच्या विकासदरानुसार तिथपर्यंत कधी पोहचणार, याबाबत सरकारने खुलासा करण्याचे आव्हान दिले.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक धोरणांसह सध्याच्या विकासदराबाबत चव्हाण यांनी टीकेची झोड उठविली. ते म्हणाले, उत्पादन क्षेत्राचा विकासदर ०.६ टक्कयांपर्यंत कमी झाल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाले आहे. वाहन उद्योगामध्ये अभुतपुर्व मंदी आहे. या क्षेत्रात साडे तीन लाख लोकांचा रोजगार गेला आहे. वाहनांचे सुट्टे भाग बनविण्याच्या उद्योगाला चालना न दिल्यास १० लाख लोकांच्या नोकऱ्या जाण्याची भिती आहे. महाराष्ट्रातही मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत परकीय गुंतवणुक व रोजगाराची स्वप्न दाखविण्यात आली. पण स्थिती उलट असल्याने सरकारकडून त्याची माहिती दिली जात नाही. मिहान प्रकल्पातून आठ उद्योगपतींनी जमिनी परत देऊन माघार घेतली. अशा परिस्थितीत केंद्राकडून पाच ट्रिलियन डॉलर आणि राज्याकडून एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट कसे साध्य करणार आहे. त्यासंदर्भात विकासदराबाबत काहीच बोलले जात नाही. एकुणच मंदीचे गंभीर वातावरण असल्याने सरकारने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पावले उचलून जनतेला आश्वस्त करावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.मंदीच्या वातावरणामुळे वित्तीय तुट मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही तुट भरून काढण्यासाठीच रिझर्व्ह बँकेच्या आकस्मिक निधीतून पहिल्यांदाच १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश घेतला. सरकारने तर ३.५ लाख कोटी रुपयांची मागणी केली होती. जीएसटी अंमलबजावणीतील घोळ आणि मंदीच्या वातावरणामुळे सरकारने हा डल्ला मारला आहे. बँक घोटाळ्यांवर त्यांचे विलीनीकरण हे उत्तर नाही. बँकांमध्ये तेच अधिकारी, आदेश देणारे पुढारी आहेत. त्यामुळे जबाबदारी निश्चित करून दोषींवर आदी कारवाई करावी, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. राज्याचा विकासदरही घसरत चालला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यात झालेली परकीय गुंतवणुक व रोजगारनिर्मितीबाबत जाहीरपणे खुलासा करावा, असे आव्हान दिले.

टॅग्स :PuneपुणेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणElectionनिवडणूकCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसाय