शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे - राज्यपाल

By admin | Published: February 05, 2016 3:47 AM

महाराष्ट्र एनसीसीने आतापर्यंत २५पैकी १७ वेळा पंतप्रधानांचे मानाचे निशाण पटकावले असून, देशातील सर्वोत्तम एनसीसी संचालनालय म्हणून महाराष्ट्राचा लौकिक वाढवला

मुंबई : महाराष्ट्र एनसीसीने आतापर्यंत २५पैकी १७ वेळा पंतप्रधानांचे मानाचे निशाण पटकावले असून, देशातील सर्वोत्तम एनसीसी संचालनालय म्हणून महाराष्ट्राचा लौकिक वाढवला. त्यामुळे आपला आम्हाला अभिमान आहे; महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे व देशालाही अभिमान आहे, अशा शब्दांत राज्यपालांनी एनसीसी कॅडेट्सचे कौतुक केले.नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिर व परेडमध्ये सहभागी होऊन विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र एनसीसीच्या संपूर्ण चमूला राजभवनावर बोलावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. एनसीसीमध्ये राष्ट्रभक्ती व शिस्त हे गुण बाणविले जातात. त्यामुळे एकदा एनसीसी कॅडेट राहिलेल्या विद्यार्थ्याने हे गुण आयुष्यभर जोपासले पाहिजेत, असे राज्यपालांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. युवकांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे तसेच आपण निवडलेल्या क्षेत्रामधे नेतृत्व करावे, असे राज्यपाल या वेळी म्हणाले. यंदा महाराष्ट्रातील ७७ मुले व ३७ मुली यांच्या चमूने प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये भाग घेतला होता. कवायत स्पर्धा (वरिष्ठ गट), बॅले स्पर्धा व मोस्ट एंटरप्रायझिंग नेव्हल युनिट या प्रकारांत कॅडेट्सनी सर्वोत्तम कामगिरी केली; तसेच राज्याच्या १५ मुलांनी व १० मुलींनी प्रजासत्ताकदिनी राजपथावर झालेल्या संचलनात भाग घेतल्याचे लेफ्टनंट जनरल गिल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)