मुंबई: यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं जबरदस्त कामगिरी करत 41 वर्षानंतर कास्य पदकारवर आपलं नाव कोरलं. जर्मनीविरोधात झालेल्या सामन्यात भारतानं 5-4 ने विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हॉकी संघाला एकदम हटके शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.
जर्मनीला नमवून 41 वर्षांनंतर भारतानं हॉकीमध्ये जिंकलं पदकयंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त खेळ करणाऱ्या भारतीय हॉकी संघाने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज जर्मनीविरुद्ध झालेल्या कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भारताने 5-4 असा विजय मिळवत कांस्यपदकावर कब्जा केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारतीय संघ एकवेळ 1-3 असा पिछाडीवर पडला होता. मात्र, या पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत भारताने आघाडी घेतली आणि अखेरीस विजय मिळवला. भारतीय हॉकी संघाने तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे.