शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

तुम बिलकुल हम जैसे निकले!

By admin | Published: October 18, 2015 2:26 AM

लेखनवाचन, विचारस्वातंत्र्यासह खाण्यापिण्यावरही लादले जाणारे निर्बंध, त्यापायी होणाऱ्या हत्या, पडणारे खून यासारख्या घटना एकीकडे आणि दुसरीकडे भूमिका घेत सरकारचा निषेध करत

- मेघना ढोके,  नाशिकलेखनवाचन, विचारस्वातंत्र्यासह खाण्यापिण्यावरही लादले जाणारे निर्बंध, त्यापायी होणाऱ्या हत्या, पडणारे खून यासारख्या घटना एकीकडे आणि दुसरीकडे भूमिका घेत सरकारचा निषेध करत आपापले पुरस्कार परत करणारे बुद्धिवादी लेखक-विचारवंत, त्यासंदर्भातही होणारे वाद-प्रतिवाद असा अस्वस्थ माहौल देशात खदखदत असताना सरहदपारहून एक बंडखोर लेखिका सांगतेय की, विखाराचा खातमा विखारानं नाही होऊ शकत, त्यासाठी शांतता आणि सौहार्दाची भूमिकाच घ्या; आणि जी चूक शेजारी पाकिस्ताननं केली, ती चूक ‘देश आणि समाज’ म्हणून तुम्ही करू नका! फहमिदा रियाज त्यांचं नाव. ‘तुम बिलकुल हम जैसे निकले’ असं म्हणणारी आणि पाकिस्तानातल्या धर्मवेड्यांच्या चुकांचा पाढा वाचत भारतीय जनतेला सावध राहा म्हणणारी त्यांची कविता सोशल नेटवर्किंग साईट्सवर फॉरवर्डच्या चक्रात सध्या लोकप्रिय झाली आहे. त्यांच्याशी थेट पाकिस्तानात कराचीला संपर्क साधला. तेव्हा ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, धार्मिक उन्मादाचा रस्ता जगणं खाक करून माणसांना जिवंतपणी नरकयातना कशा देतो याचं ढळढळीत उदाहरण असलेला देश तुमच्या शेजारी आहे, आमच्याकडे पाहा, आम्ही केली ती चूक तुम्ही करू नका!’ज्येष्ठ पाकिस्तानी कवी, लेखिका आणि कार्यकर्त्या म्हणून फहमिदा रियाज यांचं उर्दू साहित्यात मोठं नाव आहे. आपल्या लेखन आणि विचारस्वातंत्र्यांसाठी त्यांनी पाकिस्तानात अनंत यातना सोसल्या. जनरल झिया उल हक यांच्या कारकिर्दीत तर त्यांना आपल्या लेखनशैलीमुळे थेट तुरुंगवास भोगावा लागला. पाकिस्तानात जगणं दुश्वार झालं म्हणून स्वत:च्याच देशातून हद्दपार होत भारतात आश्रय घ्यावा लागला. १९८१ ते १९८७ या काळात त्या भारतात राहत होत्या आणि भारत सरकारनं त्यांना आसरा दिला होता. आपल्या लेखनासाठी हद्दपार होणं पत्करलेल्या फहमिदा रियाज यांचं म्हणणंच आहे की, लेखनस्वातंत्र्य फुकट मिळत नाही. लेखकाला आपल्या शब्दाची किंमत मोजावीच लागते. ती मोजली तर लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतात. कथनी आणि करणीत अंतर दिसलं तर लोकांनी तरी काय म्हणून बुद्धिवाद्यांवर विश्वास ठेवावा?आपल्या परखड विचारांची जबर किंमत मोजलेल्या फहमिदा रियाज यांच्याशी झालेल्या संवादाचा विशेष वृत्तांत आजच्या मंथनमधे!