नाशिक-
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता नाराजी नाट्य सुरू झालं आहे. भाजपाकडे जास्त महत्वाची खाती गेल्यानं शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच शिंदे गटातील ज्या मंत्र्यांना दुय्यम दर्जाची खाती देण्यात आली आहेत तेही अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाला डिवचलं आहे.
तुम्हीच म्हणाला होतात ना आम्ही सत्तेसाठी आलो नाही. मग आता रडता कशाला?, असा टोला छगन भुजबळ यांनी मंत्र्यांच्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना लगावला. छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
“फोन उचलल्यावर वंदे मातरम् म्हणणार नाही”; छगन भुजबळांची सरकारी फर्मानावर टीका
"अखेर खाते वाटप झालं आहे हे महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न कुणाला सांगायचे हा प्रश्नच होता. अजून खूप मंत्री यायचे आहेत. त्यावेळेस खात्यांचं पुनर्वाटप होईल. जे खातं दिल आहे, त्यात काम करून दाखवलं पाहिजे. भाजपकडे जास्त मंत्री आहेत. मुख्य वाटा जर भाजपकडे गेला असेल तर चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. शिंदे गटातील अनेकांनी सांगितलं आम्ही सत्तेसाठी आलो नाही. मग आता कशाला रडता?", असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
फोन उचलल्यावर वंदे मातरम् म्हणणार नाहीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात, मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. मंत्री झाल्यावर आदेश काढला, या निर्णयात वाईट वाटण्यासारखे काही नाही. काही जण 'जय हिंद' बोलतात, काही 'जय महाराष्ट्र' बोलतात, आमचे पोलीस बांधव फोन केल्यावर जय हिंद म्हणतात, शिवसेनेचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात, असे छगन भुजबळ यांनी संगितले.