लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनाच्या ३१ मे या दुसऱ्यांदा दिलेल्या अंतिम मुदतीनंतरही राज्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. मात्र मुदत संपलेली असली तरी राज्य शासनाच्या मार्फत तुरीची शासकीय खरेदी सुरूच राहील. शेतकऱ्यांची तूर पडून राहणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेईल. अशी ग्वाही पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मंगळवारपर्यंत राज्यात ५७ लाख क्विंटलची शासकीय तूर खरेदी झाली होती. विदर्भात अकोला जिल्ह्यातील पाचही नाफेड केंद्रांवर एक लाख ५२ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. अकोला जिल्ह्यात ८०हजार क्विंटल खरेदी झाली. नागपूरमध्ये आतापर्यंत २८,९१६ क्विंटल एकूण खरेदी झाली. २० हजार क्विंटल माल खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. १९०० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील १३ केंद्रांवर १० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांची ४.५ लाख क्विंटल तूरीचे मोजमाप अद्याप बाकी आहे. वाशिम जिल्ह्यातील पाच नाफेड कें द्रांवर चार लाख ८३ हजार ६५३ क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. ३० मेपर्यंत टोकन घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर यापुढेही खरेदी केली जाणार असल्याचे बाजार समितीच्या सचिवाने स्पष्ट केले.खान्देशात शेकडो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, नंदुरबार व शहादा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू होते. हमदनगर जिल्ह्यात अडीच लाख क्विंटल खरेदी झाली, असे नाफेडचे जिल्हा विपणन अधिकारी जी.एन. मगरे यांनी सांगितले. मराठवाड्यातही माल पडूनउस्मानाबाद जिल्ह्यात १ लाख २६ हजार क्विंटल खरेदी झाली. सुमारे २ हजार शेतकऱ्यांकडे ६० हजार क्विंटल माल मापाविना पडून आहे. बीडमध्ये साडेचार लाख क्विंटल खरेदी झाली तर ४० हजार क्विंटल माल विक्रीस आला आहे. बुधवारी मुदत संपलेली असली तरी राज्य शासनाच्या मार्फत तुरीची खरेदी सुरूच राहील. शेतकऱ्यांची तूर पडून राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल. - सुभाष देशमुख, पणन व सहकार मंत्री
तुरीची शासकीय खरेदी सुरूच राहणार
By admin | Published: June 01, 2017 3:39 AM