शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

इंडस्ट्रीयल संस्थेविरूध्द उपोषणास बसविले म्हणून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 3:11 PM

उदगीर येथील सिद्धार्थ इंडस्ट्रीयल को-आॅपरेटीव्ह संस्थेतील गैरप्रकाराविरुद्ध महिलांना उपोषणास बसविल्याचा राग मनात धरुन..

ऑनलाइन लोकमतउदगीर, दि. 22 : उदगीर येथील सिद्धार्थ इंडस्ट्रीयल को-आॅपरेटीव्ह संस्थेतील गैरप्रकाराविरुद्ध महिलांना उपोषणास बसविल्याचा राग मनात धरुन संस्थेच्या पदाधिकाऱ्याने उदगीरमधील एका युवकाचा अपहरण करुन खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे़ याप्रकरणी चार संशयितांना शहर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले आहे़. 

उदगीरच्या सिद्धार्थ इंडस्ट्रीयल को-आॅपरेटीव्ह संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत त्याची चौकशी करुन गुन्हे नोंदविण्याच्या मागणीसाठी सविता बिरादार व अन्य काही महिला उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्या होत्या़ त्यांना उदगीरच्या फले नगरातील विजय बळीराम मसुरे (वय ३५) या युवकानेच उपोषणास बसविल्याचा संशय संस्थेचा पदाधिकारी शिवकुमार झटिंग कांबळे  याच्या मनात होता़ त्यातूनच बुधवारी रात्री १०़१५ वाजण्याच्या सुमारास त्याने त्याच्या अन्य चार साथीदारांमार्फत विजयचे अपहरण करुन त्याचा शहरापासून ६ किमी अंतरावरील तिवटग्याळ पाटी येथे दगडाने ठेचून खून करण्यात आला़ त्यानंतर मृतदेह तेथेच टाकून मारेकरी पसार झाले़ ही घटना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलिसांना कळाली़ तेथून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला़.

याप्रकरणी मयत विजय मसुरे यांच्या पत्नी अनिता मसुरे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी शिवकुमार झटिंग कांबळे, झटिंग शंकर कांबळे, शांताबाई झटिंग कांबळे, महादेवी वसंत बोडके, अविनाश वाघमारे व अन्य अनोळखी चार जणांविरुद्ध कलम ३६४, ३०२, १२० ब अन्वये शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय अधिकारी अनिकेत भारती, पोनि़ भीमाशंकर हिरमुखे, राजकुमार सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून तपास गती दिली आहे़ आतापर्यंत झटिंग शंकर कांबळे, शांताबाई झटिंग कांबळे, महादेवी वसंत बोडके, अविनाश वाघमारे या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे़ मुख्य आरोपी शिवकुमार कांबळे फरार आहे़  दरम्यान, मुख्य आरोपीस अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता़ त्यांची पोलिसांकडून समजूत काढण्यात आली़ आधी अपहरणाचा मग खुनाचा गुन्हा़याप्रकरणात सुरुवातीला विजय मसुरे यांचे मित्र अविनाश वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ विजय व अविनाश हे दोघे शहरातील विद्या वर्धिनी शाळेजवळ बसलेले असताना एका कारमधून आलेल्या अज्ञात आरोपींनी विजयला मारहाण करीत अपहरण केले़ दरम्यान, मध्यरात्री मृतदेह आढळल्यानंतर याप्रकरणात अनिता मसुरे यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ विशेष म्हणजे या गुन्ह्यात अपहरण प्रकरणात फिर्यादी असलेला अविनाश वाघमारे याला आरोपी करण्यात आले आहे़२ कार व काठ्या जप्त़़घटनेनंतर मारेकऱ्यांनी त्यांची एमएच २४ सी ६८०६ क्रमांकाची कार घटनास्थळीच सोडून पोबारा केला़ तपासात हा क्रमांक अन्य वाहनाचा असल्याचे समोर येत आहे़ तसेच लातूर येथून मुख्य आरोपी शिवकुमार कांबळे यांची एमएच २४ व्ही ६८१७ क्रमांकांची कार स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतली आहे़ त्यात रक्त लागलेल्या काठ्या मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले़आठवडाभरात त्याचा तिसरा गुन्हा़ सिद्धार्थ इंडस्ट्रीयल संस्थेच्या विरोधात उपोषणास बसलेल्या सविता बिरादार व अन्य महिलांना रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मागच्या गुरुवारीच शिवकुमार कांबळेवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७ अन्वये शहर पोलिसांत गुन्हा नोंद आहे़ त्यापाठोपाठ उपोषकर्त्या महिलेपैकी एकीने दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारीच ग्रामीण पोलिसांत कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा शिवकुमारवर नोंदविला गेला आहे़ त्यानंतर आता हा खुनाचा तिसरा गुन्हा त्यांच्यावर नोंद झाला़