पिंपरी, दि. 5- समुद्र किनारी किंवा रस्त्यावर सेल्फी काढणं तरूणांच्या जीवावर बेतलं असल्याच्या घटना घडताना आपण पाहतो आहे. असाच प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. रेल्वे रूळावरून जात असताना सेल्फी काढण्याचा नाद दोन तरूणांच्या जीवावर बेतला आहे. कानाला हेडफोन लावून रूळावरून जात असताना सेल्फी काढणाऱ्या दोन जणांना ट्रेनने धडक दिल्याने त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकावर उपचार सुरू आहेत.मोबाईल दुरूस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी दोन तरूण राजस्थानहून पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते. ते दोघं फिरायला जाण्यासाठी पिंपरी रेल्वे स्थानक परिसरात गेले होते. कानाला हेडफोन लावून ते दोघं तिकीट काढण्यासाठी रूळावरून जात होते. रेल्वे रूळावरून चालत असताना ते सेल्फी काढायला लागले. हेडफोन्स लावल्यामुळे समोरून येणाऱ्या रेल्वेचा त्यांना आवाज ऐकु आला नाही. आणि लोणावळयाहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेची त्या दोघांना धडक त्यांना बसली. ३१ जुलैला घडलेल्या या अपघातातील एकजण दगावला असून दुसऱ्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचं श्रवण मलराम घांची (वय २० , रा. थेरगाव, मूळ जोधपूर, राजस्थान) असं नाव आहे. तर त्याचा मित्र भवनसिंग बाबूसिंग राठोड (वय १९) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रवण व भवनसिंग हे दोघेही राजस्थानमध्ये एकाच भागात राहणारे आहेत. दहावीची परीक्षा दिल्यानंतर दोघेही मोबाईल दुरूस्तीचे काम शिकण्यासाठी पुण्यात आले. थेरगाव येथील नातेवाईकांकडे राहून ते सांगवी येथील नातेवाईकाच्या मोबाईल शॉपीमध्ये रोज जात असत. ३१ जुलैला त्यांनी फिरायला जाण्याचे ठरविले. दोघेही पिंपरी रेल्वेस्थानक परिसरात आले. रेल्वेमार्गावरून तिकीटघराच्या दिशेने चालत जात असताना श्रवणला सेल्फी घेण्याची इच्छा झाली. दोघेही रेल्वेमार्गावर सेल्फी घेण्यासाठी थांबले. त्यांच्या कानात हेडफोन होता. दरम्यानच्या कालावधीत लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेने जाणारी लोकल त्या रूळावर आली. रेल्वेचा हॉर्न वाजत होता.परंतू हेडफोन लावल्याने त्यांना रेल्वेच्या हॉर्नचा आवाज ऐकु आला नाही. लोकल जवळ आली, रेल्वेची धडक बसून दोघेही बाजुला फेकले गेले. या अपघातात ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी श्रवणचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. भवनसिंगला उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचीही प्रकृती गंभीर आहे. सेल्फीच्या नादात एकाला प्राण गमवावे लागले तर दुसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
सेल्फीच्या नादात तरूणाने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2017 7:10 PM
रेल्वे रूळावरून जात असताना सेल्फी काढण्याचा नाद दोन तरूणांच्या जीवावर बेतला आहे
ठळक मुद्दे रेल्वे रूळावरून जात असताना सेल्फी काढण्याचा नाद दोन तरूणांच्या जीवावर बेतला आहेकानाला हेडफोन लावून रूळावरून जात असताना सेल्फी काढणाऱ्या दोन जणांना ट्रेनने धडक दिल्याने त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकावर उपचार सुरू आहेत