- रियाज मोकाशी
कोल्हापूर : पर्यटनस्थळी अतिउत्साह दाखविणाºया चार तरुणांना जिवाला मुकावे लागले; तर एका वृद्धाची मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली. न्यू करंजे (ता. राधानगरी) येथील माउली कुंडात (डोह) स्टंट करण्यासाठी उडी मारलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेले जालन्याचे दोन तरुण पंचगंगा नदीघाटावर पुराच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले. त्यापैकी योगेश जगताप (२०, रा. राजूर गणपती, जालना) हा बुडाला तर अर्जुन मसलेकर (१९, रा. मसला, जालना) यास वाचविण्यात यश आले.सांगलीत दोघांचा मृत्यूसांगली : शिराळा पश्चिम भागातील निसर्गरम्य उखळूचा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या एकाचा १८ जुलैला मृत्यू झाला. दुसºया घटनेत २ जुलैला सांगलीत कृष्णा नदीवर मौजमजा करीत मासेमारी करणाºया भावाला माव्याची पुडी काढून देण्याच्या प्रयत्नात नितीन आप्पासाहेब कांबळे (४४) बंधाºयाच्या प्रवाहातून वाहून गेले होते. दोन दिवसांनंतर त्यांचा मृतदेह सापडला.रत्नागिरीत वाचविले दोघांचे जीवरत्नागिरी : अतिउत्साह, बेपर्वाई यामुळे दोघांचा जीव धोक्यात आल्याच्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या. समुद्रात पोहण्यास गेलेल्या व बुडणाºया एकाला स्थानिकांनी गणपतीपुळे येथे वाचविले, तर व्हिडीओ तयार करण्यासाठी एका पर्यटकाने धबधब्याच्या टोकावरून खाली उडी मारली, त्यामुळेजखमी झालेल्या तरुणास रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.दारू नडली...आंबोलीमध्ये २ बळीसावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : आंबोली व कावळेसाद येथे वेगवेगळ्या तीन अपघातांच्या घटना घडल्या. त्यात दोघांना प्राण गमवावे लागले. हे सर्व प्रकार मद्यधुंद अवस्थेत तसेच सेल्फी काढताना घडले आहेत. आंबोली येथे२९ जुलैला गोवा येथील प्रवीण नाईक हा संरक्षक भिंतीवर उभा राहून प्राण्यांना खाऊ घालण्याच्या नादात खोल दरीत कोसळला. मात्र, त्याला ट्रेकर्स व पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. तर आंबोलीतील मुख्य धबधब्यावर सेल्फी काढताना सोलापूर येथील कुणाल फडतरे हा गंभीर जखमी झाला होता.व्हिडीओ व्हायरल झाल्याने समोर आले भयानक सत्य३१ जुलैला आंबोली-कावळेसाद येथे गडहिंग्लज येथून वर्षा पर्यटनासाठी आलेल्या इम्रान गार्दी (रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) व प्रताप उजगरे (रा. बीड) या दोन युवकांचा मद्यधुंद अवस्थेत दरीत पडून मृत्यू झाला. हे मद्यपी तरुण दरीच्या तोंडावर उभारलेल्या सुरक्षा कठड्यावर कसे चढले? त्यांनी दारूच्या नशेत स्टंट करण्याच्या नादात थेट दरीतच स्वत:ला कसे झोकून दिले? या सर्वाचा खुलासा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झाला. मात्र त्यानंतर लोकांनी सहानुभूती व संतापाची भावनाही व्यक्त केली.प्रशासनाकडून विचारपूसहीनाही - ट्रेकर्स आल्मेडाआम्ही सहा दिवस कावळेसादच्या दरीत मृतदेह बाहेर काढण्यासाठी उतरत होतो; पण प्रशासनाच्या एकाही व्यक्तीने आमची साधी विचारपूसही केली नाही. सहाव्या दिवशी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आम्हाला फोन केला. तहसीलदार पाचव्या दिवशी घटनास्थळी आले. मग काय करायचे, असा सवाल सांगेली येथील ट्रेकर्स बाबल आल्मेडा यांनी केला. प्रशासनाने आम्हाला मृतदेह काढण्यासाठी कोणत्याही सुविधा दिल्या नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.जीवरक्षकांना पर्यटकांकडून मारहाणगणपतीपुळे किनाºयावर तीन ठिकाणी चाळवंड (भवरा) निर्माण झाला आहे. उंच लाटेबरोबर पर्यटक पाण्यात ओढले जातात. पाण्यात जाऊ नये, या जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. काही वेळी पर्यटकांकडून जीवरक्षकांना मारहाण, शिवीगाळही केली जाते. महिला पर्यटकही त्यात पुढे असतात. सध्या ग्रामविकास यंत्रणेकडून दरमहा जीवरक्षकांना मानधन दिले जाते, परंतु त्यांचा विमा अथवा अन्य सवलतींपासून ते वंचित आहेत.- राज देवरुखकर, जीवरक्षक, गणपतीपुळे