नरेश डोंगरे, मुंबई/नागपूरमहाराष्ट्रासह देशभरातील तरुण ‘इसिस चॅटर्स’च्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिली असून, शहानिशा करण्यासाठी नागपुरातून ताब्यात घेतलेल्या हैदराबादच्या तरुणांचा ‘आॅनलाइन रेकॉर्ड’ तपासला जात आहे.गेल्या ३०-३२ तासांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या अब्दुल बासित मोहम्मद आरिफ (२१, रा. नसीबनगर, हैदराबाद), सय्यद ओमर फारुख हुसेन (२२, गुलशन इक्बाल कॉलनी, हैदराबाद) आणि माज हसन फारुख (२१, मुस्कान हयात, हुमायूंनगर) यांना येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) स्थानिक अधिकारी व हैदराबाद काउंटर इंटेलिजन्स टीमने (सीआयटी) ही संयुक्त कारवाई केली. हैदराबादमध्ये या विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे.हे तीन विद्यार्थीच नव्हे, तर तेलंगण, महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील तरुण इसिसच्या चॅटर्ससोबत संपर्कात आहेत, असा त्यांनी खुलासा तपास यंत्रणांकडे केल्याचे कळते. हे सर्व चॅटर्स स्वत:चे नाव न वापरता कोडवर्डचा वापर करतात. फारच कमी वेळा संभाषणासाठी मोबाइलचा वापर होतो. त्यामुळे तपास यंत्रणा मोबाइलसोबतच संगणक, लॅपटॉपचाही डाटा ‘क्रॅक’ करण्याच्या प्रयत्नात आहेत.
‘इसिस चॅटर्स’च्या संपर्कात तरुणवर्ग
By admin | Published: December 28, 2015 3:41 AM