शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

तरुणाईला लागले ‘फिजेट स्पिनर’चे वेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 3:50 AM

सध्या मार्केटमध्ये, बसस्टॉपवर, रेल्वे स्थानकांवर, कॉफी शॉप्समध्ये आणि महाविद्यालयाच्या कट्ट्यांवर, आवारात, कॅन्टीनमध्ये सर्वत्र एकच वस्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

अक्षय चोरगे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्या मार्केटमध्ये, बसस्टॉपवर, रेल्वे स्थानकांवर, कॉफी शॉप्समध्ये आणि महाविद्यालयाच्या कट्ट्यांवर, आवारात, कॅन्टीनमध्ये सर्वत्र एकच वस्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे; ती वस्तू म्हणजे ‘फिजेट स्पिनर’. मध्यभागी असणाऱ्या बेअरिंगच्या आधारे फिरणारी तीन पाती म्हणजे फिजेट स्पिनर. बेअरिंगवर बोट ठेवायचे आणि स्पिनर फिरवत राहायचे. हे खेळणे फिरवत राहिल्याने मनावरील ताणतणाव कमी होत असल्याचा दावा विक्रेते करत आहेत. यातील तथ्य अजून समोर आलेले नसले तरी या खेळाने तरुणाईला सध्या कमालीचे गुंतवून ठेवल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे.प्रत्येक काळात आणि प्रत्येक पिढीत वेगवेगळे ट्रेण्ड्स आणि फॅशन असतात. तरुणाई अशा नवनव्या फॅशनसोबत वाहवत जाते आणि त्याचे अनुकरणही करते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तरुणांचा कल फिजेट स्पिनरकडे वळलेला दिसतोय. हे खेळणे विविध रंगांत, विविध डिझाइन्स आणि धातूमध्येही उपलब्ध आहे. प्लास्टिक, अ‍ॅल्यूमिनियम, फायबर, तांबे आणि अगदी सोन्या-चांदीसारख्या उंची धातूमध्येही फिजेट स्पिनर उपलब्ध आहे.शॉपिंग साइट्ससह स्टेशनरी दुकाने, रस्ते आणि फुटपाथवरील फेरीवाल्यांकडे आणि मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानात ते दिसून येत आहे. अमेरिकेतील शाळांमध्ये बंदी-या खेळण्याबाबत इंटरनेटवरून माहिती मिळाली आहे की, या खेळण्याची शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे विद्यार्थी अभ्यास सोडून या खेळण्यामध्ये गुंतत आहेत. यावर उपाय म्हणून अमेरिकेतील काही शाळांमध्ये या खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.खेळण्याच्या किमती -फिजेट स्पिनरच्या किमती ५० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत. फेरीवाल्यांकडे ५० ते एक हजार रुपयांपर्यंत आणि आॅनलाईन शॉपिंग संकेतस्थळांवर तीन हजार रुपयांपर्यंत किमतीचे फिजेट स्पिनर उपलब्ध आहेत.अ‍ॅण्ड्रॉइडवरही लोकप्रिय-एका कंपनीने फिजेट स्पिनर नावाचे अ‍ॅप लाँच केले. हे अ‍ॅप लाँच करताच अवघ्या काही दिवसांतच या अ‍ॅपची लोकप्रियता गगनाला भिडली. हे अ‍ॅप आतापर्यंत एक कोटी लोकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केले आहे. याच नावाचे अजून एक अ‍ॅप वेगळ्या कंपनीने लाँच केले. त्या अ‍ॅपलासुद्धा पन्नास लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे. फिजेट स्पिनर गेमसुद्धा लाँच करण्यात आला आहे.चिनी कनेक्शन-नवनवीन चिनी बनावटीची खेळणी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांसाठी आकर्षणाचा विषय बनत आहेत. त्यामुळे चायनिज खेळणी खेळत वाढलेल्या आताच्या पिढीला चायनिज फिजेट स्पिनरने वेड लावले आहे. हे खेळणे २५ ते ३० वर्षांपूर्वी चीनमध्ये अस्तित्वात आले. आपल्या देशात आणि मुख्यत: इथल्या मोठ्या शहरात या खेळण्याने २०१७ च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये प्रवेश केला.‘मोबाइल’ला मिळतो ब्रेक !फिजेट स्पिनरच्या अतिवापरामुळे सध्याच्या पिढीला लागलेल्या मोबाइलच्या व्यसनाला ब्रेक मिळाला असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक तरुण जो वेळ मोबाइल वापरण्यात वाया घालवत होते, त्यापैकी काही वेळ फिजेट स्पिनरसोबत खेळण्यात घालवत आहेत. काही ठिकाणी कट्ट्यांवर फिजेट स्पिनरच्या स्पर्धा रंगताना पाहायला मिळत आहेत.