- अभिनय खोपडेवर्धा - कधीकाळी कॉँग्रेस पक्षाचा मूळ आधार असलेल्या कॉँग्रेस सेवादलात संघटनात्मक फेरबदल करण्यात येत असून अध्यक्षपदी तरुणांना संधी देण्याची सूचना पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. त्यानुसार वर्धा जिल्हाध्यक्षपदी महेश तेलरांधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कॉँग्रेस पक्षाला कार्यकर्ते पुरविण्याचे काम युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून केले जात होते. यासोबतच कॉँग्रेस पक्षाचा आधार समजल्या जाणाऱ्या सेवादलाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रत्येक जिल्ह्यात मध्यमवयीन व्यक्तींकडे दिली जात होती. सेवादल अध्यक्षांना पक्षाच्या कार्यक्रमात येणाºया पाहुण्यांचे स्वागत करण्यापासून त्यांना सलामी देण्यापर्यंत सर्वच कामे करावी लागत होती. संघटन अतिशय मोठे व व्यापक होते. मात्र गेल्या काही वर्षात सेवादलाच्या फेररचनेकडे कॉँग्रेस पक्षाचे दुर्लक्ष झाल्याने मोठी वाताहत झाली होती. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या तीन जिल्ह्यात सेवादल अध्यक्षपद अनेक वर्षांपासून रिक्त होते. हीच परिस्थिती इतर भागातही आहे.ही बाब लक्षात घेवून खा. राहुल गांधी यांनी फेरबदल करून या संघटनेत युवा वर्गाला स्थान देवून त्यांच्या अधिकारात वाढ करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार वर्धा येथे सेवादलाचा जिल्हाध्यक्ष म्हणून महेश तेलरांधे यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र महाराष्टÑ प्रदेश कॉँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांनी दिले.
कॉँग्रेस सेवादलात तरुणांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 6:10 AM