लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची चार ते पाच जणांनी परवानाधारक पिस्तूलमधून गोळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी पूर्वेतील आयरे रोड येथे घडली. उभ्या केलेल्या गाड्या बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षदर्शी वरुण गोपाल शेट्टी याने ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचा दावा केला. दरम्यान, सुशिक्षित, सुसंस्कृत डोंबिवलीतील गोळीबाराची ही महिनाभरातील तिसरी घटना आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.विक्रांत उर्फ बाळू केणे (२६, रा. हनुमान मंदिराजवळ, आयरेगाव) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आयरे गावात विक्रांत केणे यांची मोटार आणि भगत यांचा जेसीबी, डम्पर समोरासमोर उभे होते. भगत यांच्या गाड्या बाहेर काढल्या जात असताना विक्रांतची मोटार अडथळा ठरत होती. ती बाजूला काढण्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. संतापलेल्या भगतने विक्रांतला घराबाहेर बोलावून त्याच्याकडील पिस्तूलने विक्रांतवर गोळी झाडली. आरोपीच्या शोधासाठी चार पथके रवानाविक्रांत केणे हत्येप्रकरणात चार ते पाच आरोपी आहेत. सर्व आरोपी सध्या फरारी असून, त्यांची नावे आणि गाडीनंबर आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी चार पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.शौचालयाच्या जागेवरून हत्या?आयरे गावातील विक्र ांत केणे यांच्या बंगल्यालगतच एक चाळीचा प्लॉट भगत याने विकासासाठी घेतला होता. तेथील काही जागा शौचालयासाठी सोडण्यास विक्रांतने भगतला सांगितले. त्यासाठी भगतने नऊ लाख रुपयांची विक्र ांतकडे मागणी केली.
युवा सेना पदाधिकाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
By admin | Published: May 31, 2017 3:36 AM