मुरलीधर भवार/ऑनलाइन लोकमतकल्याण, दि. 25 - व्हॉट्सअपवर झालेल्या वादातून विशाल रमेश खाडे या तरुणाने रेल्वे मार्गात उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने त्याच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढला. तसेच आत्महत्या का करीत आहे याचा मेसेज कुटुंबीयांना पाठविला. आत्महत्या करण्यासाठी तो त्याच्या पत्नीला सोबत घेऊन गेला होता. मात्र त्याने स्वत: आत्महत्या केली. पत्नीला दूर लोटूनदिले. ही घटना वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान 22 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. या विशालने आत्महत्या केली असली तरी त्याच्या आत्महत्येची नोंद अपघाती मृत्यू अशी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या तरुणाच्या विरोधात त्याच्या कुटुंबियांनी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. तसेचआरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.विशाल खाडे हा तरुण वैतरणानजीक टेंभे गावात राहणारा होता. तो आसनगाव येथील एका खाजगी कंपनीत कामाला होता. विशाल राहत असलेल्या टेंभे गावातील एका तरुणासोबत विशालचा व्हॉटसअप ग्रुपवरून वाद झाला होता. या कारणावरुनतरुणाने विशालला शिव्या दिल्या होत्या होत्या. तसेच धमकी दिली होती. संपूर्ण तालुक्यात विशालची बदनामी करुन त्यांचे जगणो मुश्कील करु असा दम भरला होता. या कारणावरुन विशालने त्याच्या भावाला 22 डिसेंबर रोजी व्हॉट्सअपवर मेसेज पाठविला. विशाल गावातील तरुणाच्या धमक्यांना कंटाळला असून त्याचा त्याला होणारा त्रस सहन होत नाही. विशाल त्याची पत्नी वैष्णवी हिच्यासोबत आत्महत्या करीत आहे. विशालने हा मेसेज घरच्या मंडळींना पाठविला. तो त्याच्या पत्नी वैष्णवीला सोबत घेऊन वाशिंदनजीक रेल्वे मार्गात गेला. आत्महत्या पत्नीला सोबत घेऊन एकाच वेळी करण्याचा विचार विशालने पक्का केला. गाडी जवळ येण्यापूर्वी त्याने स्वत:च्या मोबाईलमध्ये सेल्फी काढला. गाडी जशी जवळ आली तसे त्याने त्याच्यापत्नील दूर लोटून स्वत:ला गाडीखाली झोकून दिले. विशालने आत्महत्या केली. याची साक्षीदार त्याची पत्नी आहे. त्याने पाठविलेला मेसेज हा त्याच्या आत्महत्येचा पुरावा आहे. विशालने त्याच्या आत्महत्येपूर्वी घरच्यांना पाठविलेल्या तरुणाचा उल्लेख केला आहे. झालेल्या वादाचा उल्लेख केला आहे.तो तरुण त्याच्याच गावात राहणारा असून मुंबई महापालिकेतील बेस्टच्या सेवेत कामाला आहे. घटना घडल्यापासून तो तरुण पसार झाला आहे. विशालचे वडील मुंबई महापालिकेत कामाला आहेत. त्यांच्या निवृत्तीला दीड वर्ष उरले आहे. विशाल आसनगावमधील खाजगी कंपनीत कामाला होता. विशालला दुर्वा नावाची सहा महिन्याची मुलगी आहे. विशालची मुलगी पोरकी झाली आहे. विशालचा लहान भाऊ वैभव आहे. विशालच्या आत्महत्येमुळे खाडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसलळा आहे. घटना घडल्यावर पत्नी वैष्णवी, वडिल रमेश व भाऊ वैभव खाडे यांनी कल्याण रेल्वे स्थानकात तक्रार देण्यासाठी गेले असतात्यांची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतलेली नाही. त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. यासंदर्भात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पाबळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, विशालच्या मृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. आज त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार अर्ज घेतला आहे. पुढील चौकशी करण्यात येईल.
व्हॉट्सअपच्या वादातून तरुणाने ट्रेनखाली केली आत्महत्या
By admin | Published: December 25, 2016 10:31 PM