अकोला : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच युवक काँग्रेसने कामाला सुरुवात केली आहे. राज्यभरातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी एका ‘हायटेक’ निवडणूक प्रक्रियेचा उपयोग करून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यभरात ९, १० व ११ सप्टेंबर रोजी टॅबमधील एका अॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर युवक काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यानुसार राज्यभर सदस्य नोंदणी केल्यानंतर आता विविध पदांसाठी हे सदस्य ९, १० व ११ सप्टेंबर रोजी मतदान करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी आ. अमित झनक, सत्यजित तांबे व कुणाल राऊत रिंगणात आहेत, तर प्रदेश महासचिव पदासाठी सागर देवेंद्र कावरे, अभिषेक भरगड, सागर देशमुख व श्रेयश इंगोले उभे आहेत.
यंदाची युवक काँग्रेसची ‘हायटेक’ निवडणूक; अॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 12:10 AM