नागपूर : दिल्लीत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला गोळीबार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा होता. युवाशक्ती ही बॉम्बसारखी आहे. त्याची वात पेटविण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला.
मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी केंद्राकडे गळा काढावा. अतिवृष्टीने बाधितांसाठी केंद्राकडे आम्ही १५,५०० कोटी मागितले. जे आदळआपट करत आहेत, त्यांचे नेते पंतप्रधान आहेत. आम्ही ६,५०० कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. ३,५०० कोटींपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना वाटली आहे.
हा तर शहिदांचा अपमान : फडणवीसजामिया मिलियातील घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणे हा शहिदांचा अपमान आहे. जे नारे तिथे दिले गेले, त्याच्याशी मुख्यमंत्री सहमत आहेत का, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.जीएसटीचा परतावा देण्यास केंद्राची दिरंगाईकेंद्राकडून राज्याला येणारा जीएसटीचा परतावा १५ हजार कोटींचा आहे. आता केंद्राने चार ते साडेचार हजार कोटींचा हप्ता दिला आहे. तो देण्यास उशीर झाल्याचे केंद्राने मान्य केले आहे. असे जर सरकार चालायला लागले, तर इकडे विरोधकांनी राज्य सरकारच्या नावाने बोंबाबोंब करू नये. शिमगा केंद्राच्या नावाने करावा, असे ठाकरे म्हणाले.