मुंबई : लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहून स्टंट करताना एक तरुण खांबाला धडकला आणि लोकलमधून पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांकडून त्याचा तपास केला जात आहे.
घटना कधी व कुठे घडली, याचा अंदाज पोलिसांनाही आलेला नाही. रेल्वे पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यानची असू शकते. त्यानुसार, चर्चगेट आणि मुंबई सेन्ट्रल रेल्वे पोलीस स्थानकांच्या हद्दीत ही घटना घडल्याचा अंदाज घेऊन, त्यानुसार सर्व माहिती प्राप्त केली जात आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यांतील स्टंट करताना होणाऱ्या अपघातांचे रेकॉर्डही तपासले जात असल्याचे सांगण्यात आले. व्हिडीओ समोर येताच तीन जण घटनेची माहिती देण्यासाठी समोर आले. मात्र, अधिक माहिती मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)