मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुठलीही फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले आहे. दरम्यान, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री रिट्रीट हॉटेलला अचानक भेट देत आमदांरांसोबत चर्चा केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आमदारांसोबतच हॉटेलमध्ये मुक्काम केला. विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र निकलांनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत आग्रही भूमिका घेतली. पण भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती देण्यास नकार दिला. त्यानंतर शिवसेनेने अधिकच ताठर भूमिका घेतली होती. त्यामुळे 13 व्या विधानसभेची मुदत संपल्यानंतरही नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. सत्तेत सहभागासाठी काँग्रेस राजी होईना, राष्ट्रवादी मात्र आग्रही एकीकडे राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले असताना दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी व्हायला हवे अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे. मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी त्यासाठी राजी नाहीत. अशावेळी फार तर शिवसेना- राष्ट्रवादीच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेस घेऊ शकते.मुंबई, दिल्लीतील काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली असता त्यांनी ही परिस्थिती स्पष्ट केली. काँग्रेसचे बहुसंख्य आमदार हे आपल्या पक्षाने शिवसेना-राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये सहभागी व्हावे या मताचे आहेत. मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा त्यास विरोध आहे. हिंदुत्वासह विविध मुद्यांवर शिवसेनेची असलेली भूमिका काँग्रेसच्या भूमिकेशी विसंगत अशीच राहिली आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये बसले तरी किंवा बाहेरून पाठिंबा दिला तरी काँग्रेसला ते राजकीयदृष्ट्या परवडणार नाही, असा सूर दिल्लीत आहे.शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आपणही सरकारमध्ये सहभाग सहभागी व्हावे ही भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसच्या काही आमदारांनी सोनिया गांधी यांची भेट मागितली होती; मात्र ती मिळाली नाही. राष्ट्रवादीकडून फारच आग्रह धरला गेला तर काँग्रेस एखादवेळी सेना-राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार करू शकेल,पण तूर्त तोही विचार फक्त समोर नाही. काँग्रेस सत्तेत सहभागी झाली नाही तर सरकारला स्थैर्य असणार नाही; किंबहुना सरकार सहा आठ महिन्यांच्या वर टिकणार नाही असे राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेत्यांना वाटते. याआधी काही राज्यांमध्ये तसा अनुभव देखील आलेला आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा शिवसेना आमदारांसोबत मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 8:33 AM