मुंबई : राज्य सरकारतर्फे अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला झेड प्लस-प्लस सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. रडार, बंकर्सच्या माध्यमातून तसेच खासगी सुरक्षेसह एनएसजी कमांडोंचाही या सुरक्षेत समावेश असणार आहे.नरिमन पॉइंटपासून अरबी समुद्रातील २.५ किलोमीटरवरील परिसरात १६ हेक्टर खडकाळ पृष्ठभागावर शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकतेच याबाबतची पर्यावरणीय मंजुरीही दिली आहे. परिणामी स्मारक उभारण्याच्या हालचाली राज्य सरकारने तीव्र केल्या आहेत. (प्रतिनिधी)
महाराजांच्या स्मारकाला झेड प्लस-प्लस सुरक्षा!
By admin | Published: February 23, 2015 3:07 AM