शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

झेडीपीत ३५९ रुजू नाहीत

By admin | Published: June 13, 2016 3:25 AM

पालघर जिल्ह्यामध्ये बिन्दुनामावली नुसार ४७९ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

हितेन नाईक,

पालघर- ठाणे जिल्ह्याच्या विभाजना नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये बिन्दुनामावली नुसार ४७९ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.परंतु पालघर मध्ये त्यातील प्रथमत: ३५९ कर्मचाऱ्यांनी रुजू होण्यास नकार देऊन आपल्या कर्मचारी संघटनांमार्फत प्रशासनावर दबाव टाकण्यास प्रारंभ केला असून त्याला ठाण्यातून मिळणाऱ्या राजकीय पाठबळा मुळे अजूनही हे कर्मचारी पालघर जिल्ह्यात हजर झालेले नाहीत. याचा फटका जिल्हा परिषदे च्या विकासत्मक कामांना बसत आहे. पालकमंत्र्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष या संदर्भात एकजुटीने प्रयत्न करतांना दिसत नसल्याने हया विरोधात शिवसेना आपल्या स्टाइल ने आंदोलन उभे करेल असा इशारा जि.प.सदस्य प्रकाश निकम यांनी दिला आहे.स्वतंत्र पालघर जिल्हा परिषद् अस्तित्वात आल्या नंतर ठाणे व पालघरमध्ये किती अधिकारी, कर्मचारी असावेत हे शासन पातळीवर निश्चित करण्यात आले होते. त्यातील बिंदु नामावली नुसार ठाणे जिल्ह्यातील ४७९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पालघर मध्ये बदल्या करण्याचे आदेश निघाले होते.परंतु पालघर मध्ये जाणे गैरसोयीचे असल्याचे कारण सांगून हया कर्मचाऱ्यांनी पालघर मध्ये जाण्यास नकार दिला होता. या बाबत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री,आयुक्त पातळीवर बैठकाही झाल्या आहेत.त्या नुसार ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा परिषदेमध्ये वर्ग झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रुजू झालेच पाहिजे असे आदेश निघाल्याचेही समजते. मात्र अजूनही हे कर्मचारी स्वेच्छा निवृती घेण्याच्या धमक्या देत रुजू होण्याबाबत चालढकल करीत आहेत.शासकीय यंत्रणांनी जलद काम करावे असे अपेक्षीत असतांना बालविकास प्रकल्प,महिला बालविकास, समाजकल्याण, पाणीपुरवठा इ.महत्वपूर्ण विभागाच्या ४७९ पैकी ३५९ कर्मचाऱ्यांची आॅर्डर निघून ही ते पालघरमध्ये रुजू होण्यास तयार नाहीत असे त्यांनी सांगितले.>खासदारांच्या दबावामुळे घडले सारे?खासदार कपिल पाटील यांच्या दबावामुळे ठाणे जि.प. कर्मचाऱ्यांना सोडत नाही. तसेच पालक मंत्री विष्णू सवरा आणि जि.प.अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या धरसोड प्रवृतीमुळे हे घडत असल्याचे त्यानी लोकमतशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हया प्रकरणात लक्ष घालावे आणि दोन वर्षापासून भिजत पडलेला हा प्रश्न निकालात काढावा. येत्या १५ दिवसात कर्मचारी पालघरमध्ये कामावर हजर झाले नाहीत तर सेना जिल्हा प्रमुख,जि.प.उपाध्यक्ष,गटनेते यांच्या सह शिवसेना स्टाइल ने आंदोलन उभारण्याचा इशारा ही निकम यांनी दिला आहे.