मुंबई : कृषिपंपांच्या थकीत वीजबिलांच्या रकमेत ६६ टक्के सवलतीचा लाभ घेत, ३ लाख ७५ हजार २५४ शेतकऱ्यांसह १,२८० गावांनी कृषिपंपांचे वीजबिल कोरे केले आहे, तर ३०,३९९ रोहित्रांवरून वीजजोडणी असलेल्या शेतकऱ्यांनी थकबाकीचा भरणा करून रोहित्रांना थकबाकीमुक्त केले. कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार ३१ मार्चपर्यंत चालू बिल व सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे. अशी आहे योजनासुधारित थकबाकीमध्ये ५० टक्के सवलतीची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत आहे. त्या आधी योजनेत अद्यापही सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांनी चालू बिल व५०% थकबाकीचा भरणा केल्यास थकबाकीमुक्तीची संधी आहे. ज्या शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला. मात्र, आवश्यक चालू बिल, सुधारित थकबाकी ५० टक्क्यांपेक्षा कमी भरलेली आहे. त्यांना ३१ मार्चपर्यंत उर्वरित चालू बिल व थकबाकीची रक्कम भरल्यास कृषिपंपाचे संपूर्ण वीजबिल कोरे करता येणार आहे. ६६% रक्कमवीजबिलांची थकबाकीमुक्ती, कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या, भरलेल्या कृषिबिलांमधील ६६ टक्के रक्कम स्थानिक वीजयंत्रणेसाठी खर्च करण्याची तरतूद असलेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. ६,१०० कोटींची थकबाकी माफ n३ लाख ७५ हजार शेतकऱ्यांसह १,२८० गावांनी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीचे स्वप्न साकारले आहे. nआतापर्यंत १९ लाख ५८ हजार ७३४ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग घेतला आहे. n२,०६३ कोटी ४३ लाखांचा भरणा केला आहे. या शेतकऱ्यांची एकूण ६,१०० कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आली आहे.
1,280 गावांत वीज थकबाकी शून्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 6:56 AM