शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

जिल्हा परिषदा भाजपामुक्त?

By admin | Published: March 09, 2017 4:43 AM

राज्यातील जिल्हा परिषदा भाजपमुक्त ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून जिथे सत्ता स्थापन करायची आणि हे दोघे एकत्र येऊनही जिथे सत्ता मिळत नाही तिथे राष्ट्रवादीने

- यदु जोशी, मुंबई

राज्यातील जिल्हा परिषदा भाजपमुक्त ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून जिथे सत्ता स्थापन करायची आणि हे दोघे एकत्र येऊनही जिथे सत्ता मिळत नाही तिथे राष्ट्रवादीने शिवसेनेला बरोबर घ्यायचे आणि काँग्रेसने बाहेरून वा तटस्थ राहून पाठिंबा द्यायचा, असे नवीन समीकरण आता समोर आले आहे. ‘आम्ही दोघे एकत्र येऊन सत्ता स्थापन होतेय अशा ठिकाणी अन्य कुणाची मदत घेण्याचा प्रश्न नाही. अशा जिल्ह्यांबाबत उस्मानाबाद व आणखी एखादी जिल्हा परिषद सोडून आमची आघाडी जवळपास नक्की झाली आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले. आम्ही एकत्र येऊनही सत्ता मिळत नाही अशा ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे आणि काँग्रेसने मतदानात भाग न घेता अप्रत्यक्षपणे पाठिंबा द्यावा, असा विचार सुरू झाला असल्याचे तो म्हणाला.असे झाल्यास बीड, जालना, हिंगोली, यवतमाळ, बुलडाणा, नाशिक, कोल्हापूर व सांगलीमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या खेळीला शिवसेना काय प्रतिसाद देणार हे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्तेची वाट भाजपाने सुकर केली. ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. अन्य आठ महापालिकांमध्ये सत्ता भाजपाकडे असेल हेही निश्चित आहे. (विशेष प्रतिनिधी) शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत भाजपा आशावादीजिल्हा परिषदांत शिवसेना व भाजपा एकत्र येतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला.आता ते जिल्हा परिषदांत आम्हाला तसाच प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत, याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे संकेत त्यांनी दिले.- तिन्ही पक्षांच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेत ‘कर्जमाफी नाही तर कामकाज नाही’, असे बजावत जोरदार घोषणाबाजी केली. - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या खेळीला शिवसेना काय प्रतिसाद देणार हे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्तेची वाट भाजपाने सुकर केली.तर भाजपाकडे तीनच जि.प.आता जिल्हा परिषदेबाबत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल. भाजपा-शिवसेना एकत्र आले तर २५ पैकी १४ जिल्हा परिषदांमध्ये युतीची सत्ता राहील. मात्र, भाजपाला बाजूला ठेवण्याचे अन्य या तिघांनी ठरविल्यास भाजपाची केवळ लातूर, वर्धा, चंद्रपूर या तीनच जिल्ह्यात सत्ता येईल. शिवसेनेच्या भूमिकेला त्यामुळेच महत्त्व आले आहे. गेल्यावेळी विदर्भातील चार जिल्हा परिषदांमध्ये भाजपा - राष्ट्रवादीची आघाडी होती. यावेळी राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार असतील तर आम्ही अप्रत्यक्ष पाठिंब्याचा विचार करू शकतो, असे काँग्रेसच्या नेत्याने सांगितले.