शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

Zilla parishad President Reservation List: जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर; राज्यात राजकारण रंगणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 8:17 PM

ZP Election Reservation: ठाणे, पुणे सर्वसाधारण... तुमच्या जिल्ह्यासाठी कोणते आरक्षण पडले... सत्तेचे राजकारण जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील सुमारे ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण आज जाहीर झाले. राज्यातील ग्रा. पंचायतींच्या, नगर पालिका आणि महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आलेल्या असताना हे आरक्षण जाहीर झाले आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदा निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाने काढली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. 

विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता, ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आल्यानं येत्या काही काळात निवडणूक जाहीर होणार का याकडे ग्रामीण भागातील मतदाराचं लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदांसाठी असे आहे आरक्षण...

  • ठाणे : सर्वसाधारण
  • पालघर : अनुसूचित जमाती
  • रायगड : सर्वसाधारण
  • रत्नागिरी :नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  • सिंधुदुर्ग : सर्वसाधारण
  • नाशिक : सर्वसाधारण (महिला)
  • धुळे : सर्वसाधारण (महिला)
  • जळगाव : सर्वसाधारण
  • अहमदगर :अनुसूचित जमाती
  • नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला)
  • पुणे : सर्वसाधारण
  • सोलापूर :नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • सातारा : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)
  • सांगली :सर्वसाधारण (महिला)
  • कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला)
  • औरंगाबाद : सर्वसाधारण
  • बीड : अनुसूचित जाती
  • नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला)
  • परभणी : अनुसूचित जाती
  • जालना : नागरिकांचा मागस प्रवर्ग
  • लातूर : सर्वसाधारण( महिला)
  • हिंगोली : सर्वसाधारण (महिला)
  • अमरावती : सर्वसाधारण (महिला)
  • अकोला : सर्वसाधारण (महिला)
  • यवतमाळ : सर्वसाधारण
  • बुलढणा : सर्वासाधारण
  • वाशिम : सर्वसाधारण
  • नागपूर अनुसूचित जमाती
  • वर्धा : अनुसूचित जाती (महिला)
  • चंद्रपूर :अनुसूचित जाती (महिला)
  • भंडारा : अनुसूचित जमाती (महिला)
  • गोंदिया : नागरिकांचा मागस प्रवर्ग
  • गडचिरोली : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)
टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद