पुणे : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये वाटप करण्याता आलेल्या चिक्कीला येणारा वास तेलाचा असून, चिक्की खाण्यासाठी योग्य असल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी डी. बी. मुंढे यांच्या चौकशीत आढळून आले.जिल्हा परिषदेच्या वतीने तब्बल एक कोटी रुपयांची गूळ-शेंगदाणा चिक्कीचे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये मुलांना पोषण आहार म्हणून वाटप करण्यात आले. राज्यातील चिक्की घोटाळा गाजत असतानाच जिल्हा परिषदेने चिक्की खरेदी करण्याचा निर्णय घेताल. या चिक्की घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला चिक्की खरेदीला सुरुवातीला महिला व बालकल्याण आयुक्तांनी परवानगी देण्यास टाळाटाळ केली. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी स्वत: महिला व बालकल्याण आयुक्तांची भेट घेऊन आम्ही दर्जेदार चिक्की खरेदी करू असे आश्वासन दिले व चिक्की खरेदी करण्यासाठी परवानगी घेतली. त्यानुसार जिल्ह्यात सर्व अंगणवाड्यांमध्ये चिक्कीचा पुरवठा करण्यात आला. यामध्ये हवेली तालुक्यातील ठाकूर फूड प्रॉडक्ट्स व नगर येथील काही विक्रेत्यांकडून ही चिक्की खरेदी करण्यात आली. या चिक्कीबाबत काही पालकांनी ‘लोकमत’कडे तक्रारी केल्या होत्या, की चिक्कीला तेलाचा उग्र वास येत असून, कडक असल्यामुळे मुलांना खातादेखील येत नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी तातडीने मुंढे यांना वेल्हा आणि भोर तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये चिक्कीची तपासणी करण्यास सांगितली. यामध्ये वाटप करण्यात आलेली सर्व चिक्की चांगली असून, चिक्कीला येणारा वास तेलाचा असल्याचे म्हटले आहे.(प्रतिनिधी)>प्रयोगशाळेत तपासूनच चिक्कीचे वाटपजिल्हा परिषदेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या ठाकूर फूड प्रोडक्ट्स चिक्की न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासून घेण्यात आली आहे. अन्न व औषध विभागाचे निकष पूर्ण केले असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी डी.बी. मुंढे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेची चिक्की चांगली
By admin | Published: June 10, 2016 1:00 AM