शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कुपोषणावर जि.प.चा डोहाळे जेवणाचा उतारा

By admin | Published: March 03, 2017 4:09 AM

गावपाड्यांतील गरोदर मातांना एकत्र आणून त्यांची खणानारळाने ओटी भरण्यासह डोहाळे जेवणही त्यांना समारंभपूर्वक दिले जात आहे.

सुरेश लोखंडे,ठाणे- गावपाड्यांतील गरोदर मातांना एकत्र आणून त्यांची खणानारळाने ओटी भरण्यासह डोहाळे जेवणही त्यांना समारंभपूर्वक दिले जात आहे. याशिवाय, वीटभट्टीवरील माताबालकांसाठी आरोग्यजत्रा आदी उपक्रमांचा प्रारंभ शहापूर तालुक्यातील अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डोहाळे जेवणापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याने केला आहे. आदिवासी, ग्रामीण भागांतील माताबालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासह जन्माला येणारे बाळ सशक्त व गोंडस असावे, यासाठी आरोग्य विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहे. या उपक्रमांना सामाजिक एकोपा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि संस्कृती जतन आदींची जोड देऊन सातव्या महिन्यातील डोहाळे जेवणाचा उपक्रम आरोग्य केंद्रांमध्ये राबवत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे यांनी लोकमतला सांगितले. ऐकिवात असलेल्या गोड व डोहाळे जेवणाचा सुखद अनुभव, डॉक्टरांकडील औषधोपचार सुखी व आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे असल्याची जाणीव या मातांना होत आहे. यातून कुपोषित नसलेले गुटगुटीत व सशक्त बालक जन्माला आणणे शक्य होत आहे. तर, आजारपणात भगत, बुवाबाजी, धागेदोरे, जडीबुटी आदी अंधश्रद्धेच्या उपायांपासून आदिवासी कुटुंबं दूर जात आहेत. डॉक्टर, परिचारिका, कम्पाउंडर आदींकडून मिळत असलेल्या आपलेपणाची व जिव्हाळ्याच्या वागणुकीमुळे आदिवासी, ग्रामीण माता, बालक रुग्णालयांकडे वळले आहे. यामुळे बालविवाह प्रतिबंध, अल्पवयीन मातेच्या गरोदरपणाला रोख लागून अंधश्रद्धेवर मात केली जात असल्याचा दावा डॉ. सोनावणे करीत आहे. नाचणीची भाकरी, चटणी, वांगी, खजूर, डांगराची पुरी, अंडी या पदार्थांसह आरोग्य विभागाचे चौरस जेवण, या डोहाळे जेवणानंतर या आदिवासी मातांची खणानारळाने ओटी, हळदकुंकू आणि पौष्टिक औषधी व गोळ्या या गर्भवतींना डोहाळे जेवणात मिळत आहेत. याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते.