लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सर्वांसाठी सक्तीचे केलेले आधारकार्ड, पॅनकार्ड आता ठाणे जिल्हा परिषद व पाच पंचायत समित्यांसाठी सक्तीचे केले आहे. या कार्यालयांचे बँक खाते असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेला या कार्डची वेळीच उपलब्धता करण्याची तंबी आयकर विभागाने बँकेला दिली. अन्यथा, बँकेवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.विविध योजनांच्या निधीची रक्कम असलेल्या जि.प., पंचायत समित्यांचे खाते टीडीसीसी बँकेत आहे. मात्र, सामान्य व्यक्तीप्रमाणे या कार्यालयांकडे पॅनकार्ड, आधारकार्ड नाही. यामुळे बँक खाते असलेल्या या कार्यालयांचे दोन्ही कार्ड टीडीसीसीने वेळीच उपलब्ध करून घ्यावेत, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची लेखी सूचना आयकर विभागाने टीडीसीसी बँकेला दिली आहे. यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी जि.प.सह पंचायत समित्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.वैयक्तिक खातेदारांप्रमाणेच सरकारी कार्यालयांनादेखील आधारकार्ड व पॅनकार्डचा क्रमांक बँकेत नोंदवण्याची सक्ती नुकतीच करण्यात आली आहे. मात्र, याकडे अद्यापही लक्ष दिले नाही.बँकेचा पाठपुरावा सुरूजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनी पॅनकार्ड आणि आधार न दिल्यास टीडीसीसी बँकेला जबाबदार ठरवण्यात आले आहे. यामुळे बँक अधिकारी, कर्मचारी या सरकारी कार्यालयांशी सुसंवाद साधून वेळीच कार्ड उपलब्ध करण्याठी पाठपुरावा करत आहेत.
जि.प.ला पॅनकार्डसह आधारकार्डची सक्ती
By admin | Published: June 05, 2017 3:22 AM