ZP Election 2020 : विधानसभेतील 'ती' चूक भाजपाला भोवली; नागपूर जिल्हा परिषद काँग्रेसच्या 'हातात'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:00 PM2020-01-08T17:00:48+5:302020-01-08T17:39:05+5:30
Nagpur ZP Election 2020 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात या निवडणुका होत असल्याने राजकीयदृष्ट्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते
नागपूर - राज्यातील बदललेल्या सत्तासमीकरणानंतर स्थानिक पातळीवरही जिल्हा परिषद निवडणुकीचे धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या होमपीचवर भाजपाला रोखण्यात काँग्रेसला यश आलं आहे. नागपूर जिल्हा परिषदेवरकाँग्रेसला अनपेक्षित यश मिळालं आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या एकूण ५८ जागांपैकी काँग्रेसला 30, राष्ट्रवादीला १०, भाजपा १५, शिवसेना १, अपक्ष १, शेकाप १ या जागांवर यश मिळालं आहे. नागपूर जिल्हा परिषदेवर यापूर्वी भाजपाचं वर्चस्व होतं. जिल्ह्यात ५८ जिल्हा परिषदेच्या जागांसाठी २७० उमेदवार व पंचायत समितीच्या ११६ गणांसाठी ४९७ उमेदवार रिंगणात होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात या निवडणुका होत असल्याने राजकीयदृष्ट्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नागपूर जिल्ह्याला तीन मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे ही निवडणुक त्यांच्या अस्तित्वाची लढाई झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती तर शिवसेना स्वतंत्र लढत होती.
Maharashtra: Bharatiya Janata Party loses Zila Parishad elections in Nagpur. BJP faces defeat in Union Minister Nitin Gadkari's home village Dhapewada. Congress emerges as single largest party with 31 seats.
— ANI (@ANI) January 8, 2020
याबाबत सत्ताधारी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावत म्हटलंय की, भाजपाच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपूरमधून झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर बसवलेली पकड आज उध्वस्त झाली आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप निवडणूक घेण्यास टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे जात होती. मात्र आज निवडणूक झाली असून ज्या नागपूर जिल्हयात भाजपचे दिग्गज नेते आहेत त्याच जिल्हयात भाजपाला पराभव पत्करावा लागला. नागपूरकरांनी भाजपावर नाराजी व्यक्त केली त्याची दखल महाराष्ट्र घेईल असं त्यांनी सांगितले.
बावनकुळेंना तिकीट नाकारले पुन्हा भोवले
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते. बावनकुळेंचे तिकीट कापल्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत भाजपला बसला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीत तो मोठ्या प्रमाणात बसताना दिसतो आहे.
आजी-माजी मंत्री पुत्र जिंकले
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मंटपांजरा सर्कलमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र राष्ट्रवादीचे सलील देशमुख तर हिंगणा तालुक्यातील रायपूर सर्कलमध्ये माजी मंत्री रमेश बंग यांचे पुत्र राष्ट्रवादीचे दिनेश बंग विजयी झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
उपराजधानीत शिवसेनेची घसरगुंडी; भाजपाची 'मंदी' अन् काँग्रेसची मुसंडी!
हवा बदल रही है! नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालांवरून भुजबळांचा भाजपाला टोला
नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेकडे
पालघरमध्ये भाजपाची पडझड; शिवसेना नं. १, पण राष्ट्रवादी 'गेम चेंजर'
नंदुरबारमध्ये भाजपा-काँग्रेस समसमान, पण 'कमळा'ने केली कमाल