शहरं
Join us  
Trending Stories
1
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
2
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
3
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
4
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
5
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
6
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेती जे. पी. नड्डा यांची भेट
7
ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा?
8
आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना 
9
Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला
10
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."
11
पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी
12
भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला
13
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
14
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
15
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
16
जगातील टॉप ५० कंपन्यांमध्ये भारतातील एकही नाही, कुठपर्यंत झाली Relianceची घसरण?
17
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
18
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
19
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
20
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."

जि.प.चे माजी सीईओ, कार्यकारी अभियंत्यांना दोन महिने कारावास

By admin | Published: June 27, 2014 12:29 AM

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील ३८ कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे, असे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिल्यानंतरही जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यपालन

कामगार न्यायालयाचा निर्णय : न्यायालयीन आदेशाची अवमानना प्रकरणभंडारा : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील ३८ कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे, असे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिल्यानंतरही जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यपालन अधिकारी (सीईओ) अरूण डुबे व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश सुशीर यांनी न्यायालयाचे आदेश न पाळता अवमानना केली. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांना येथील कामगार न्यायालयाने गुरुवारी दोन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील ३८ कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०१० पर्यंत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जात होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना चौथ्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाऊ लागले. या अन्यायाविरुद्ध ३८ कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली. डिसेंबर २०१२ मध्ये या याचिकेवर निर्णय देत औद्योगिक न्यायालयाने सदर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे तसेच त्यावर १२ टक्के व्याज द्यावे, असे आदेश जिल्हा परिषदेला दिले. या निर्णयाविरोधात जिल्हा परिषदेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट पिटीशन दाखल केली. परंतु, उच्च न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर जिल्हा परिषदेने सर्वाेच्च न्यायालयाचे दार ठोठावले. तिथेही जिल्हा परिषदेला पराभूत व्हावे लागले. सर्वाेच्च न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचे आदेश दिले. दरम्यान, डिसेंबर २०१२ मध्ये औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेला दोन महिन्यात करावयाची होती. परंतु जिल्हा परिषदेने या आदेशाच्या अंमलबजावणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. अखेर कर्मचाऱ्यांनी भंडारा कामगार न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.