मालेगाव, दि. 3 - शहरात पाच हजार ८५० वैयक्तिक, तर ५० सार्वजनिक शौचालये बांधून तयार झाली आहेत. शहर हगणदारीमुक्त झाल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्य व केंद्र शासनाच्या पथकाकडून लवकरच शहराची पाहणी करण्यात येणार आहे.
मालेगाव शहर स्वच्छ व हगणदारीमुक्त व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शहरात ८ हजार १९६ वैयक्तिक शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट मनपासमोर होते. या दृष्टीने मनपा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी केवळ तीन हजार ७०० वैयक्तिक शौचालये उभारण्यात आली होती, तर नव्याने उभारण्यात येणाºया सार्वजनिक शौचालयांची संख्या शून्य होती. मनपा आयुक्त धायगुडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी कंबर कसली होती. गेल्या दोन महिन्यांत शौचालय उभारणीच्या कामांना वेग आला होता, तर उघड्यावर शौचास बसणाºयांविरुद्ध कायद्याचा बडगा उगारण्यात आला होता.
उघड्यावर शौचास बसणाºया ८१ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. याचाच परिणाम म्हणून शहर हगणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येत्या काही दिवसांत राज्य व केंद्र शासनाच्या पथकाकडून शहराची पाहणी करून अधिकृतरीत्या शहर हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.४ शहरातील नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम योजनेचा लाभ घ्यावा यासाठी १६ हजार रुपये अनुदान मनपाकडून देण्यात येत आहे. सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त धायगुडे यांनी केले आहे. तसेच सार्वजनिक शौचालयांची तोडफोड व नासधूस करणा-यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीचा खर्च वसूल करण्यात येणार असल्याचेही धायगुडे यांनी सांगितले.
४ नव्याने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयात शौचास जाणा-या नागरिकांकडून नगरसेवक व मनपा प्रशासनाच्या नावाखाली काही नागरिक पैसे उकळत असल्याची बाब समोर आली आहे. नव्याने उभारण्यात आलेले शौचालय पे अॅण्ड युज या तत्त्वावर अद्याप देण्यात आलेले नाही तरीदेखील पैसे उकळण्यात येत आहेत. असे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आयुक्त धायगुडे यांनी सांगितले.