मालेगाव (नाशिक) : ईद -उल – अजहा अर्थात बकरी ईदचा सण रविवारी (दि.१०) साजरा करण्यात आला. कॅम्प राेडवरील मुख्य इदगाह मैदानावर सकाळी आठ वाजता ईदची नमाज पठण केली गेली. शहरातील विविध इदगाह मैदान व मशिदींमध्येही नमाज पठणाचे नियाेजन करण्यात आले होते.
ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे मनपाचा कायमस्वरूपी एक व चौदा तात्पुरते कत्तलखाने उभारण्यात आले होते. जामा मशिदीचे पेश इमाम तथा आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल हे हज यात्रेला गेल्याने माैलाना इम्तियाज इकबाल मिल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले.