शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

100 नाण्यांचे मडके!

By admin | Published: June 24, 2016 5:25 PM

मी अनेक वर्षे पैसा हाताळला नव्हता आणि खूप एकत्र पाहिलासुद्धा नव्हता. अकरा रु पये भरून बँकेत माझे मायनर अकौंट उघडले होते. पासबुकासोबत नाणी साठवायला मातीचे एक मडकेही मिळाले होते

मी अनेक वर्षे पैसा हाताळला नव्हता  आणि खूप एकत्र पाहिलासुद्धा नव्हता. अकरा रु पये भरून बँकेत माझे मायनर अकौंट उघडले होते. पासबुकासोबत नाणी साठवायला  मातीचे एक मडकेही मिळाले होते. त्यात एक रुपयाची शंभर नाणी मावायची. मडके भरले की बँकेत नेऊन द्यायचे. मग बँकेतले काका त्यातले पैसे तुङया अकौंटला जमा करतील, असे मला सांगितले होते. पण त्यांनी आपले पैसे चोरले तर? - मला भीती वाटत होती. आता पैसा दिसू लागला आहे. त्याची किंमतही कमी झाली आहे;
पण भीती मात्र तशीच आहे. आणि स्वत: कमवत असलो तरी मडक्याचा आकारही तितकाच आहे.
 
- सचिन कुंडलकर
 
लहान असताना पैसा आजूबाजूला दिसत नसे. मुलांना तो हाताळायला मिळत नसे आणि सतत सगळे पैशांविषयी आणि वस्तू विकत घेण्याविषयी बोलत नसत. नोकरी करून ज्यांचे घर चालते अशा साध्या मराठी मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये पैसा हा एकाच वेळी अतिशय जपून, अतिशय उदात्तपणो आणि फारसा न दाखवता बाळगायची किंवा खर्च करायची सवय असे.
आई-वडिलांनी आम्हाला कधीही कशाचे कमी केले नाही. आपल्याला एखादी गोष्ट परवडते का, आपली ती करण्याची ऐपत आहे का? याची काळजी आपल्या मुलांपर्यंत आईवडील अतिशय नाजूकपणो पोहचू देत नसत. एखाद्या खर्चाला मुलांना नाही म्हणण्याची विशिष्ट पद्धत प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये समजुतीने तयार झालेली असे.
मी पैसा अनेक वर्षे हाताळलाच नव्हता. खूप एकत्र पाहिलासुद्धा नव्हता. आमच्या भागातले सगळे दुकानदार हे लहानपणीचे माङया वडिलांचे खेळगडी होते. काही लागले तर आईची परवानगी घेऊन त्या दुकानात जायचे आणि लागणारी वही, पेन, पेन्सिल घेऊन यायचे. संध्याकाळी किंवा दुस:या दिवशी बाबा जाऊन बिल चुकते करून यायचे.
माङो घराजवळच्या बँकेत मायनर अकौंट उघडले होते ते अकरा रु पये भरून. माङया हातात माङो स्वत:चे पासबुक देण्यात आले होते तेव्हा मला काहीतरी वेगळेच वाटून गेले होते. तरीही पैसा मी पाहिलाच नव्हता. हातात फक्त पासबुक होते. त्यावर अकरा रु पये खात्यात असण्याची नोंद होती. म्हणजे ह्या जगात ते अकरा रु पये फक्त माङो आणि माङो होते. मला ते हवे तेव्हा मिळणार होते का? तर नाही. कारण बचत करण्याची सवय लागावी म्हणून ते खाते उघडले गेले आहे असे मला सांगण्यात आले होते. मला बचत म्हणजे काय ते कळत नव्हते. वेळ आली की ते पैसे कामी येतात. पण मी लहान असल्याने वेळ येणो वगैरे उच्च मराठीतील विचार मला कळत नव्हते. मला असे वाटले की, एक वेळ झाली घडय़ाळात की सगळेजण आपापले पैसे काढून घेणार आहेत. 
त्या पासबुकासोबत नाणी साठवायला मातीचे एक मडके मला देण्यात आले. ते मडके सर्व बाजूंनी बंद होते; पण एक नाणो आत जाऊ शकेल अशी खाच त्याला वरच्या बाजूला होती. त्यात एक रु पयाची शंभर नाणी मावतात असे मला सांगण्यात आले. ते मडके भरले की बँकेत नेऊन द्यायचे मग बँकेतले काका त्यातले पैसे तुङया अकौंटला जमा करतील. अकौंट म्हणजे काय? माङया मनात दुसरा प्रश्न. मी गौरी-गणपती आले की आईसोबत बँकेच्या लॉकररूममध्ये जाऊन चांदीचे दोन पेले, एक ताट आणि नथ असे घेऊन येत असे. लॉकर हेच अकौंट आहे अशी माझी समजूत होती. म्हणजे आपले अकरा रु पये अशाच एका लॉकरमध्ये ठेवले आहेत आणि हे मातीचे मडके भरले की ते त्या लॉकरमध्ये जाणार आहे, असे मला वाटायचे.
- नाही तसे नसते. एक दिवस मला बसून बँक, व्याज, खाते अशा अनेक गोष्टी वडिलांनी समजावल्या. मला हा बँकिंगचा उपद्व्यापच कळाला नाही. मान्यच झाला नाही. आपले पैसे आपण त्यांना का द्यायचे? त्यांनी चोरले तर? अशी मी वडिलांशी हुज्जत घालत बसलो. मला त्यात सगळ्यात नाटय़मय घटनाही कळली की, मडके भरले की ते फोडायचे आहे आणि त्यातली नाणी प्लास्टिकच्या पिशवीत भरून बँकेतल्या काकांकडे नेऊन द्यायची आहेत. मला फारच आनंद झाला. मला काचा फुटणो, मातीची भांडी फुटणो, कपबश्या फुटणो ह्या गोष्टी इतक्या म्हणजे इतक्या आवडत की सांगता सोय नसे. माङो मनच फार फिल्मी होते. कधी एकदा ते मडके पूर्ण भरते आहे आणि मी ते जोरात फोडतो आहे असे मला झाले होते. शंभर नाणी बाहेर पडणार होती. ती मोजून प्लास्टिकच्या पिशवीत भरून, पिशवीला रबर लावून बँकेतल्या काकांकडे नि ऐटीत चाललो आहे असे दृश्य मला दिसले. आणि मी नाणी गोळा करायला सुरु वात केली. बचतीची आवड लागावी म्हणून मला ते मडके दिले होते. मला बचतीचे जवळजवळ वेड लागल्यासारखा मी वागत होतो. मिळेल तशी एक रुपयाची नाणी जमवायचा मी सपाटा लावला. खाऊचे पैसे मडक्यात जाऊ लागले. लहानपणी कुणाला नमस्कार केला की प्रेमळ माणसे अकरा रुपये हातावर ठेवीत. मी सारखे न चुकता घरी आलेल्या ज्येष्ठ लोकांना नमस्कार करू लागलो. पेप्सी-कोला खाण्याऐवजी तो एक रु पया मडक्यात ठेवू लागलो. त्या मडक्याचे वजन माङयाइतकेच वाढू लागले आणि मला मडके फुटून नाणीच नाणी बाहेर पडतायत अशी स्वप्नं पडू लागली. शंभर नाणी. म्हणजे अलीबाबाच्या गोष्टीत असतात तशा मोहरा. त्याच्या गुहेत मोहरांनी भरलेले रांजण होते. माङयाकडे नाण्यांनी भरलेले मडके होते. मी मध्येच रात्री उठून ते मडके खळ खळ वाजवून पाहायचो आणि परत झोपी जायचो.
एकदा मी बाबांसोबत बँकेत गेलो असताना बाबांनी मला पासबुक भरून आण असे सांगून एका बाईंकडे पिटाळले. त्यांनी मला सोळाशे प्रश्न विचारून माङो पासबुक घेऊन त्यात काहीतरी खरडून ते माङया हातात दिले आणि मला भोवळ यायची बाकी राहिली होती. माङया पासबुकावर एकोणीस रु पये झाले होते. अकराचे एकोणीस? कुणी केले? मला त्या बाई खूप आवडल्या. ह्यांनी पासबुकात लिहिले की ती रक्कम वाढते. वाह! बँक ह्या गोष्टीवर माझा विश्वास बसला.
एकदा रात्री मी आईवडिलांना कसल्यातरी चिंतेत बोलताना ऐकले. असे कधी घडत नसे. कारण आईवडील आमच्यासमोर कधीही कसलीही रडगाणी गात नसत. मी झोपलो आहे असे समजून ते दोघे बोलत होते. त्यांना घरखर्चाचे केवढे तरी ताण आले होते. दिवाळी येत होती. आधीची अनेक बिले थकली होती आणि सुट्टीत सगळ्या पाहुण्यांचा तळ आमच्या घरी असणार होता. कुजबुजत ते दोघे कसा मार्ग काढायचा याचा विचार करत होते. तेव्हा मी घाबरलो आणि मला एकदम रडायलाच आले. कारण आईबाबांना सगळे सोपे असते आणि त्यांच्याकडे पैसे असतात अशी माझी सोपी समजूत होती. बाबांना पगार मिळतो हे मला माहिती होते, पण पगार म्हणजे काय, कधी मिळतो, किती मिळतो, मला काही कल्पना नव्हती. पैसे कमी पडू शकतात हा अनुभवच नव्हता. पैसे असतात. आई आपल्याला एखादी गोष्ट घेऊन देत नाही तेव्हा ती नाही म्हणत नाही. आपण ती पुढच्या महिन्यात घेऊ असे म्हणते. त्या रात्नी मला आईवडिलांचे हे बोलणो ऐकून एकदम असहाय वाटले. आपल्यामुळे तर अशी वेळ नाही न आली? आपण वह्या जास्त आणतो. सारखे आइस्क्र ीम खातो. मावशीकडे जाताना बसने न जाता रिक्षाने जाण्याचा हट्ट करतो. त्यामुळे तर असे झाले नसेल न? मला कशाचे काही कळेनासे झाले. ‘वेळ आली की’ असे जे आई सारखे म्हणते ती अशीच काहीतरी असावी. आपले एकोणीस रु पये आणि सत्तर ऐंशी नाणी आपण त्यांना देऊन टाकूया का? 
पैशाची भीती वय वाढले तशी वाढतच गेली. तो कमवायला लागलो तेव्हापासून तो कमावण्याच्या आनंदापेक्षा ती भीती नेहमी मोठी होत राहिली. असे का झाले? कुठून आली ही भीती? मला कळेनासे झाले आहे. पैसा दिसू लागला आहे, त्याची किंमत कमी होत गेली आहे; पण त्याची भीती नाही. एक विशिष्ट प्रकारची भीती घेऊन येतो पैसा. तो असला तरी आणि नसला तरी. भुंग्यासारखा मनात गुणगुणत राहतो. बँकेत पडून राहिला तरी आठवत राहतो. आनंदाचा एखादा मोठा खर्च करताना मनाला अपराधी वाटवत राहतो. मोकळे असे सोपे त्याच्याबद्दल वाटत नाही. अजूनही. स्वत: कमवायला लागलो तरी. आताही मडक्याचा आकार तितकाच आहे.
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com