आरत्या, मोरया, मोरया आणि गणपती बाप्पाचा गजर, सॅन होजे नगरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 09:19 PM2018-09-23T21:19:54+5:302018-09-23T21:27:41+5:30

सॅन फ्रांसिस्को बे एरियातील लोकांनी याही वर्षी बाप्पाचे अगदी स्वागत जोरदार केले. पाहताक्षणीच भान हरपावे अशी हि सुबक देखणी, १५ फुटी भव्यदिव्य मूर्ती कमळामध्ये विराजमान होती.

Aarti, Moraya, Moraya and Ganpati Bappa Alar, San Hoje Nagari Dumdumali | आरत्या, मोरया, मोरया आणि गणपती बाप्पाचा गजर, सॅन होजे नगरी दुमदुमली

आरत्या, मोरया, मोरया आणि गणपती बाप्पाचा गजर, सॅन होजे नगरी दुमदुमली

Next
ठळक मुद्देआरत्या, मोरया मोरया आणि गणपती बाप्पा चा गजरसॅन होजे नगरी दुमदुमली

रेणुका इनामदार

सॅन फ्रांसिस्को बे एरियातील लोकांनी याही वर्षी बाप्पाचे अगदी स्वागत जोरदार केले. पाहताक्षणीच भान हरपावे अशी हि सुबक देखणी, १५ फुटी भव्यदिव्य मूर्ती कमळामध्ये विराजमान होती.

सांता क्लारा काऊंटी फेअर ग्राऊंड्स, सॅन होजे येथे झालेल्या या सोहळ्याला ५० हजार लोकांनी भेट दिली. भारतातून आलेले आई वडील, काका काकू अगदी भारतात असल्यासारखं वाटतंय गं, हे सांगतांनाचा चेहर्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. 'हजारो मैल दूर राहता पण आपली संस्कृती इतकी छान जपता. असेच काम करीत रहा, तुमच्या पुढच्या पिढीचे भवितव्य उज्वल राहील' असे आशीर्वाद देताना नागपूरहून आलेल्या देसाई काकांना अगदी भरून आलेले.

 



बाप्पाच्या २ दिवसांच्या मुक्कामात बाप्पाला खुश करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल तर प्रसादासाठी १०१ किलोचा बुंदीच्या लाडू, उकडीचे-तळलेले-खव्याचे-पेढ्याचे मोदक, घरी केलेले गुलाबजाम, खीर आणि वेगवेगळ्या प्रकारची मिठाई नैवेद्य म्हणून खास.
नटून थटून पैठण्या, शालू, जरी काठाच्या साड्याआणि दागिने घालून आलेल्या बायका. धोतर, सलवार कुर्ता, त्यावर पगडी किंवा टोपी घातलेले पुरुष आणि अगदी लहान बाळापासून ते १५-१६ वर्षाची मुले पारंपरिक वेशात या दोन दिवसात बघायला मिळाली.



मराठी हिंदी आरत्या, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरयाचा गजर आणि भाविकांनी उत्स्फूर्तपणे गायलेले मोरया रे बाप्पा मोरया रे यांनी खरंच सॅन होजे नगरी २ दिव्वास दुमदुमत होती. श्री गजानन महाराज बे एरिया ग्रुपच्या अथर्वशीर्ष पठणाने वातावरण भारावलेले तर स्पार्तन पथकाने जोशदार ढोल ताश्या बरोबर यावर्षी बरची हा नृत्यप्रकार सादर केला.


भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमात स्तोत्र पठण, भजन, गायन, शास्त्रीय नृत्यांचे विविध प्रकार, लोक नृत्य, सिनेनृत्य, लाईव्ह बँडस, वाद्यवादनाचा कार्यक्रम यांचे सादरीकरण झाले. मराठी सिने नृत्यदिग्दर्शका दीपाली विचारे त्यांच्या ग्रुपने लोकनृत्ये आणि बे एरियातील नावाजलेल्या नृत्यगुरूं अनिता, अर्चना, दीप्ती, जया, प्रीती, राधिका, शोतरुपा, शिवा, शुभदा आणि प्रतीक्षा यांच्या ग्रुप्सनी बॉलीवूड सिनेतारकांच्या गाण्यांवर नृत्य करून धमाल उडवून दिली.

अमित पवार आणि आदित्य पटेल या दोन्ही ग्रुपनी धमाकेदार अशी नृत्ये केली. रविवारी रात्री महाआरतीनंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण सोहळ्याला अजूनच रंगत आणली. पंडित विलास ठुसे यांनी गणपतीची स्थापना केली तर २ दिवसातल्या आरत्या अरविंद साळवेकर, रंजना जोशी आणि रविवारची महाआरती-उत्तरपूजा श्री प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते झाली.

रेडिओ जिंदगीचे सर्वेसर्वा श्री नीरज धर, सीईओ श्री तारेश आनंद, प्रवीण सुगग्ला, सेहबा शाह यांनी ३ महिने अथक प्रयत्न करून बे एरियातील लोकांना गणेश उत्सवाचा आनंद दिला. नीरा धर यांच्या देखरेखीखाली गणपतीची आरास आणि लोकांच्या स्वागतासाठी कमानी, रंगीबेरंगी पताका, दिव्यांची रोषणाई, झेंडूच्या फुलांच्या माळा अशी संपूर्ण परिसराची सुंदर सजावट होती. सांस्कृतिक कार्यक्रमाची धुरा ज्यात ९०० च्या वर कलाकारांनी गणपतीसमोर आपली गायन, वादन, नृत्य सेवा सादर केली ती रेणुका इनामदार यांनी यशस्वीरीत्या पेलली.

व्हिसिटर्सप्लॅन .कॉमचे राम आणि धर्मेश वर्मा, डिव्हाईन वास्तूच्या रेवा आणि रितेश कुमार, ओन स्वीट होम रियल्टीचे अमित इनामदार आणि अनेक व्यावसायिक यांच्या सहकार्याने हा सोहळा अतिशय उत्तम पार पडला. नियोजनात इरा नाईक, सोम्या महासेठ, मायकल चांद, याशिका अहुजा, चिंतन सोधा, मीनल उगले, अंकित शाह, मनोज सुधाकर, विशाल कपूर, सनी मोझा, सुनीता राज, कुंजन सक्सेना, स्वाती राऊत, वेदिका, दक्षता आणि अनेक कार्यकर्त्यांची मदत झाली.
 

बाप्पाच्या उत्तरपुजेनंतर छोट्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक- गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच्या गजरात भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. अमेरिकेतल्या पश्चिम विभागातील सार्वजनिक गणपती अशी हि रेडिओ जिंदगी गणपतीची ओळख आता झाली असून पुढच्या वर्षीच्या बाप्पाच्या आगमनाची सगळे पुन्हा आतुरतेने वाट बघत आहोत.
रेणुका इनामदार,
सॅन होजे, कॅलिफोर्निया

Web Title: Aarti, Moraya, Moraya and Ganpati Bappa Alar, San Hoje Nagari Dumdumali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.