शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

जास्तीचे सगळे अडगळ

By admin | Published: September 30, 2016 6:08 PM

आपले आधीचे दुमजली घर सोडून रॉथचे कुटुंब एका छोट्याशा घरात राहायला आले. पण त्याचे म्हणणे, एवढेच पुरेसे नाही.. जीवनशैली पर्यावरणस्नेही हवी. शेकडो पुस्तकांऐवजी ‘किण्डल’ घेणे,

 - शर्मिला फडके

आपले आधीचे दुमजली घर सोडून रॉथचे कुटुंब एका छोट्याशा घरात राहायला आले. पण त्याचे म्हणणे, एवढेच पुरेसे नाही..जीवनशैली पर्यावरणस्नेही हवी.शेकडो पुस्तकांऐवजी ‘किण्डल’ घेणे,शंभर वस्तूंऐवजी दहाच ठेवणे,हे मिनिमलिझम नाही, ती ‘सोय’ आहे.गरज नसताना, काहीही जास्तीचे असणे म्हणजे पसारा..न्यूयॉर्कशहरामधे एका मोठ्या फायनान्स कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरी करणारा रॉथ, जाहिरात संस्थेमध्ये काम करणारी त्याची बायको लेना जवळच्या उपनगरामध्ये एका दोन खणी, लहानशा अपार्टमेण्टमध्ये राहतात. एरवी अमेरिकन घरे सामान-सुमानाने ठासून भरलेली असतात, अगदी अशी लहान अपार्टमेंट्सही. पण हे घर अगदी बेसिक, आवश्यक तेवढेच फर्निचर असलेले, क्लोजेटमध्येही मोजकेच, लागतील असे फॉर्मल आणि काही साधे कपडे. बाकी पसाराही अगदीच आटोपशीर. आॅफिसला जातानाही ते पब्लिक ट्रान्स्पोर्टचा वापर करतात. पन्नाशीतल्या रॉथ आणि लेनाचे हे आजचे सुटसुटीत आयुष्य गेल्या चार वर्षांमधले. याआधी ते आपल्या दोन मुलांसहित उपनगरामध्ये मोठ्या, दुमजली घरात, भरपूर फर्निचर, मॉडर्न गॅजेट्स, लेटेस्ट गाड्यांसहित राहत होते. दोन्ही मुले मोठी होऊन शिक्षणाकरता बाहेर पडल्यावर दोघांना एवढा मोठा पसारा झेपेनासा झाला, गरजेचाही वाटेनासा झाला, करिअरची जबाबदारीही वाढली होती, त्यामुळे मग त्यांनी कामाच्या ठिकाणाच्या जवळ लहान जागेमध्ये आपला आटोपशीर संसार थाटला. लहान जागेत राहायला येण्याआधी आधीच्या मोठ्या घरातील सामानाची ते काढून टाकायच्या आधी केलेली लहान मोठ्या वस्तूंची असंख्य पानांची यादी रॉथने अजूनही जपून ठेवली आहे. त्याच्या सध्याच्या घरातल्या सामानाची संख्या अर्ध्या पानात संपते.मात्र रॉथ अजूनही स्वत:ला आपण मिनिमलिस्ट म्हणवून घेत नाही. व्यक्तिगत वेळ आणि पैसा वाचवणे हे नक्कीच झाले, मात्र मिनिमलिस्ट जीवनशैली ही पूर्णपणे पर्यावरणस्नेही असणेच आवश्यक आहे असे त्याचे मत. आता तो कमी सामानामध्ये, लहान घरात राहत असला तरी असं राहताना त्याला ज्या तडजोडी करायला लागल्या, नव्या सोयी-सुविधा बनवायला लागल्या त्यांचा विचार करता आपले जगणे पर्यावरणस्नेही नाही हे तो प्रामाणिकपणे कबूल करतो. उदाहरणार्थ घरातली शेकडो पुस्तके काढून टाकून किण्डलसारखे इलेक्ट्रॉनिक बुक रीडर घेणे ही गोष्ट म्हणजे मिनिमलिझम नाही. ती सोय झाली. जगण्यातला एकंदर पसाराच काढून टाकणे जमायला हवे, जे मला अजूनही जमलेले नाही. मिनिमलिझम हा ग्राहक संस्कृतीला खतपाणी घालणाऱ्या वृत्तीच्या विरोधात आहे, मात्र आपण अजूनही लहान प्रमाणातले ग्राहकच आहोत हे रॉथ नाकारू शकत नाही. शंभर वस्तूंच्या जागी दहा वस्तू खरेदी करणे म्हणजेच फक्त मिनिमलिझम नाही. काहीही ‘जास्तीचे’ किंवा ‘गरज नसताना’ जमवलेले मिनिमलिझमच्या तत्त्वात बसू शकत नाही. गरज नसताना कमावलेला जास्तीचा पैसा तुम्ही वस्तू विकत घेण्यावर खर्च न करता जर नुसताच बॅँकेमध्ये साठवून ठेवणार असाल तर ते जास्त हानिकारक. रॉथ स्वत:ला भौतिक मिनिमलिस्ट म्हणवून घेतो. मानसिक किंवा आध्यात्मिक पातळीवरील मिनिमलिझमपासून आपण अजून खूप दूर आहोत आणि ही सुरुवात आहे हे त्याला माहीत आहे. मिनिमलिझमची तत्त्वे नेमकी काय ते लोकांनी खोलात जाऊन समजावून घ्यायला हवी. रॉथच्या मते मिनिमलिझममध्ये जग बदलून टाकायची ताकद आहे. त्यामुळे त्याचा प्रसार योग्य प्रकारे, खरेपणानेच व्हायला हवा. रॉथला स्वत:ला असा विचार करणे, त्यानुसार वागणे जमलेले नाही. उदाहरणार्थ वाचवलेल्या वेळेचे, पैशांचे आपण नेमके काय करणार आहोत याचा विचार. अनेकजण प्रवास करणार असे म्हणतात. मात्र हा प्रवास कसा असणार आहे, नुसतीच मौजमजा, क्रूझची सहल, पर्यटनस्थळांचे फोटोग्राफ्स, खरेदी.. असे असेल तर ते मिनिमलिझम तत्त्वात बसत नाही आणि त्यात पर्यावरणस्नेह नाही. कमीतकमी सामानात, कमीतकमी इंधनाचा वापर करून केलेला प्रवास हवा. स्थानिक संस्कृतीला, जनजीवनाला जाणून घेणे हे त्यातून घडणार असेल तर जास्त उत्तम. आर्टिस्ट एलेना स्मिथ मिनिमलिस्ट आहे, मात्र मिनिमलिझमकडे ती कोणत्याही तात्त्विक अंगाने बघत नाही. एलेनाच्या मते मिनिमलिझम हे जीवनविषयक तत्त्वज्ञान नसून तो केवळ एक सौंदर्यवादी विचार आहे. आपल्या आजूबाजूचे जग अडगळ नसेल, पसारा नसेल तर जास्त सुंदर दिसते इतकाच विचार मिनिमलिझममध्ये असावा. नीटनेटक्या, साध्या व्यक्ती आसपासचे जगही सुंदर आणि साधे बनवतात. दृश्यकला, संगीत, वास्तुकला, रचना इत्यादिंमध्ये केलेला मिनिमलिझमचा डोळस वापर हा आपोआपच तुमच्या व्यक्तिमत्त्वामधे झिरपतो आणि मिनिमलिझम तुमच्या जगण्याचा भाग होतो. एलेना आणि रॉथ या दोघांशी बोलताना लक्षात आले की मिनिमलिझम कोणत्याही विशिष्ट व्याख्येत किंवा चौकटीमध्ये बसवणे अवघड आहे. जगण्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर मिनिमलिझम आपल्याला खुणावतो. त्याच्याकडे यायला प्रवृत्त करतो. प्रत्येकाकरता हा टप्पा वेगळा असू शकतो. मिनिमलिझमचा अर्थही प्रत्येकाकरता वेगळा असू शकतो. कारण मुळातच पसाऱ्याच्या, अडगळीच्या कल्पना प्रत्येकाकरता वेगळ्या. ‘सरप्लस’ असण्याचे मोजमापही प्रत्येकाचे वेगळे. मिनिमलिझमभोवती असलेले भावनिकतेचे, सामाजिकतेचे, तत्त्वज्ञानाचे अनेक थर ओलांडून आपण त्याच्या गाभ्यापर्यंत शिरायचा प्रयत्न करायला हवा, आपल्याकरता मिनिमलिझम नेमका काय आहे, आपल्याला तो का हवा आहे आपल्या आयुष्यात याचा विचार करायला हवा. मिनिमलिझमची व्याख्या आणि चौकट लवचिक नक्कीच आहे, मात्र ती सोयिस्कर नसावी. लहान जागेमध्ये राहायला लागल्यावर रॉथला जाणवले वयाची इतकी वर्षे आपण एवढा मोठा पसारा भोवताली जमवून ठेवला होता तो नेमका कशासाठी? मिनिमलिझमकडे आपण यापूर्वीच वळायला हवे होते. काही जण गरज म्हणून, काही अपघाताने, काही जाणीवपूर्वक मिनिमलिझमकडे वळतात आणि मग मिनिमलिस्ट जीवनशैलीचे फायदे लक्षात आल्यावर हे आपण आधीच का केले नाही असं त्या सर्वांनाच वाटतं. त्यामुळे रॉथच्या मनातली भावना काही नवी नाही.