एकाकी आयुष्यात तंत्रज्ञानाचा स्मार्ट ओलावा
शहरं माणसाला एकटं पाडतात. ती स्मार्ट होतात, तेव्हा तर हा एकटेपणा अधिकच कोरडा आणि असह्य होऊ शकतो असा आक्षेप, अनुभव आणि अभ्यासही आहे.
या एकटेपणाचा दोष माणसाची गरजच संपवून टाकणा:या तंत्रज्ञानाला दिला जातो. पण स्पेनमधल्या बार्सिलोनाच्या प्रयोगशाळेत वेगळं काही घडतं आहे. माणसांपासून तुटून एकेकटय़ा उरलेल्या आणि वाढलेल्या आयुर्मानामुळे अधिकाधिक विकल होत जाणा:या ज्येष्ठ-अतिज्येष्ठ नागरिकांची तंत्रज्ञानाशी मैत्री करून दिली जाते आहे.
त्यांच्या एकाकी आयुष्यात हे तंत्रज्ञान थोडा स्नेहाचा ओलावा देऊ शकेल का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अपर्णा वेलणकर
शहर व्यवस्थापनातला तंत्रज्ञानाचा (अति)वापर हा जगभरात औत्सुक्याचा आणि आता हळूहळू वाढत्या टीकेचा / शंकाकुशंकांचा विषय होऊ लागला आहे. शहर नावाची (अ)व्यवस्था ही एक जिवंत रचना असते. त्यातल्या शिस्तीइतकीच उत्स्फूर्तता आणि नियमिततेइतकीच अकल्पितता हा त्या रचनेचा आत्मा! - त्या आत्म्यालाच हे ‘स्मार्ट’ प्रकरण नख लावतं असे आक्षेप, अभ्यास आणि अनुभवही आता पुढे येऊ लागले आहेत.
या पाश्र्वभूमीवर ‘नसलेल्या’ माणसाची उणीव काही प्रमाणात तरी भरून काढू शकण्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर हा पर्याय अधिक ठळकपणो पुढे येतो, तेव्हा या चर्चेची एक दुसरी बाजूही दिसते.
कुटुंबीय जवळ नसल्याने आणि वाढलेल्या वयोमर्यादेमुळे अतिवृद्धत्वात अधिकच एकटय़ा पडलेल्या बार्सिलोनातल्या पेस्टर आजी (मंथन : 8 मे) एकटय़ा अगर वेगळ्या नाहीत. ते सगळ्याच विकसित अर्थव्यवस्थांमधल्या ज्येष्ठ-अतिज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाचं एक प्रतीकच आहे.
युरोपातले जवळपास सगळेच देश वृद्धत्वाच्या वाटेवर चालणारे. ग्रेईंग पॉप्युलेशन! जन्मदर घटलेला आणि आयुर्मान वाढलेलं. त्यामुळे दरवर्षी लोकसंख्येचं सरासरी वय वाढतच चाललेलं. अवलंबित्व वाढत जाणा:या नागरिकांची संख्या मोठी आणि कुटुंबव्यवस्थेची चौकट जवळजवळ नाहीच. त्यामुळे जो तो एकेकटा. निवृत्तिवेतनात जगणं महाग होत चाललेलं. ही वाढती दरी भरून काढण्याची धडपड करणं भाग असलेल्या सरकारची जबाबदारी मोठी. वृद्ध आणि अतिवृद्धांच्या देखभालीच्या खर्चाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा भार.
अशा दुष्कर अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी टेली-केअर (टेलिफोनच्या माध्यमातून विविध सेवांची उपलब्धता) युरोपात बरीच रुळलेली आहे.
- पण स्मार्ट तंत्रज्ञानाच्या सुसूत्र वापरासाठी जगभरात मोठा नावलौकिक पटकावलेल्या बार्सिलोना शहराने या जुन्याच व्यवस्थेवर नवा ‘स्मार्ट लेअर’ चढवला. त्यातून उदयाला आलेली व्यवस्था - टेलिकेअर प्लस! हे मुळात एक कॉल सेंटर! पण सेकंड जनरेशन टेक्नॉलॉजीच्या वापराने त्याहून पुष्कळच पुढचे टप्पे गाठलेलं!
ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी युरोपात इतरत्र अस्तित्वात असलेल्या टेलिकेअर सुविधा ‘रिअॅक्टिव्ह रिस्पॉन्स’ या सूत्रवर आधारलेल्या आहेत. म्हणजे मदतीसाठी विनंती आली, की कमीत कमी वेळात त्यावर योग्य त्या कार्यवाहीची व्यवस्था.
बार्सिलोना शहर प्रशासनाने नव्या स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने या व्यवस्थेमध्ये स्वत:हून दखल देणारी, काळजी घेणारी, संवाद करणारी आणि संकटं उद्भवू नयेत यासाठी ज्येष्ठ नागरिकांशी सतत संपर्कात असणारी प्रणाली विकसित केली आहे.
वरवर पाहता हा सारा तंत्रज्ञानाचा कोरडा खेळ आहे, असं वाटू शकतं. म्हणजे म्हातारपणी विकल शारीरिक-मानसिक अवस्थेत एकटय़ा राहणा:या नागरिकांची काळजी कोण घेणार? - तर कॉल सेंटर्स, वृद्धांच्या घरात सर्वत्र लावलेले- त्यांच्या गळ्यात अडकवलेले सेन्सर्स, विविध ठिकाणाहून येणा:या माहितीची विगतवारी करून ती साठवणारी-एकत्रित करणारी-त्यावरून निर्णय घेऊन ते संबंधित यंत्रणोर्पयत पोचवणारी सॉफ्टवेअर्स आणि हे सगळं जंजाळ सांभाळणारी डेटा अॅनालेटिक्स यंत्रणा!
- पण प्रत्यक्षात या तंत्रज्ञानाच्या बरोबरीने या सगळ्या व्यवस्थेला जिवंत मानवी चेहरा देण्याची कसरतही बार्सिलोनाच्या या व्यवस्थेने साधली आहे.
एक आकडेवारी पाहा :
या टेलिकेअर-प्लस यंत्रणोत काम करणा:या एकूण कर्मचा:यांपैकी (फक्त) 35 टक्के मनुष्यबळ हे कॉलसेंटर ऑपरेटर्स आहेत. 15 टक्के लोक त्यातल्या तंत्रज्ञानाची निर्मिती-व्यवस्था-संचलन पाहतात आणि उरलेले 5क् टक्के लोक मोबाइल युनिट ऑफिसर्स, सोशल वर्कर्स आहेत. या प्रशिक्षित लोकांचा ज्येष्ठ नागरिकांशी ‘प्रत्यक्ष’ संबंध असतो. अडीअडचणीच्या वेळेला मोटारबाइकवरून घरोघरी धावण्यापासून विशेष जरुरी असलेल्या नागरिकांसाठी ठरावीक दिवसांच्या अंतराने ‘होम व्हिजिट’ करण्यार्पयतची कामं ही टीम करते.
टेलिकेअर-प्लसमध्ये होणारे 6क् टक्क्यांहून जास्त फोनकॉल्स हे ‘आउटबाउण्ड’ असल्याची ताजी टक्केवारी आहे. म्हणजे मदतीसाठी येणा:या फोनपेक्षा सेंटरमधून स्वत:हून केले जाणारे फोन जास्त. तातडीने येणारी आणीबाणी हाताळणं हे मूळ उद्दिष्ट बदलून स्वत:हून संपर्क करून आणीबाणी येऊच नये याची खात्री करणं या नव्या सूत्रभोवती (डोण्ट जस्ट रिस्पॉण्ड अॅण्ड मॉनिटर, कॉल अॅण्ड रिअॅश्युअर) ही व्यवस्था काम करते.
शहर सुरक्षेशी संबंधित असलेले सगळे विभाग या ‘स्मार्ट’ व्यवस्थेशी जोडलेले आहेत. म्हणजे एखाद्या घरातून आलेल्या इमजर्न्सी अॅलर्टनंतर केलेला फोन विशिष्ट वेळेत उचलला गेला नाही, तर संबंधित व्यक्ती अडचणीत असल्याचं ओळखणारी सॉफ्टवेअर्स तातडीने त्या विभागातले पोलीस आणि अग्निशमन दलाला परस्पर अॅलर्ट्स पाठवतात. त्यामुळे टेलिकेअर-प्लसच्या रिस्पॉन्स टीमच्या बरोबरीने पोलीसही घटनास्थळी पोचतात.
स्पेनची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सुसूत्र नाही. म्हणजे एका विभागाची योजना दुस:या विभागाचा खर्च वाढवणारी तरी ठरते किंवा एकाच सेवेसाठी विविध ठिकाणाहून सारखेच प्रयत्न होऊन खर्चाला अकारण वाटा फुटतात.
या गदारोळाला सुसूत्रतेने बांधून आरोग्य विभागाच्या एकूण सरकारी खर्चाला आळा घालण्यासाठीही टेलिकेअर-प्लस मोठा वाटा उचलू शकते, हे सिद्ध झालं आहे. शहर आणि केंद्रीय प्रशासनाच्या आरोग्य विभागाशी डेटा शेअरिंग साधून या व्यवस्थेने प्रत्येक (ज्येष्ठ) नागरिकाला पुरवल्या जाणा:या सुविधांमध्ये सुसूत्रता साधली आहे.
बार्सिलोना शहर प्रशासन आणि टनस्टॉल टेलेविदा या खासगी कंपनीच्या संयुक्त भागीदारीत चालणा:या या स्मार्ट प्रकल्पाने शहरातल्या प्रत्येक ज्येष्ठ-अतिज्येष्ठ नागरिकार्पयत पोचण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे.
एवढंच नव्हे, तर सेवेची गुणवत्ता कित्येक पटीने वाढवून खर्चात मात्र कपात साधली आहे.
या स्मार्ट योजनेसाठी खर्च केला जाणारा एक युरो शहर प्रशासनाचे 2.46 युरो वाचवतो. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना द्यायच्या सरकारी सुविधांपोटी तिजोरीवर पडणारा भार तब्बल अडीच पटीने कमी झाला आहे.
श््रल्लू’ी2इउठ
बार्सिलोनाची 2क्टक्के लोकसंख्या 65 वर्षावरील आहे. 2क्4क् र्पयत हे प्रमाण 25 टक्क्यांवर पोचेल. शहरी व्यवस्थेने दिलेला ‘एकटेपणा’ ही भविष्यातली मोठी व्याधी होऊ घातल्याचे इशारे युरोपमध्ये दिले जात आहेत. भविष्यातलं हे चित्र सावरण्यासाठी टेलिकेअर-प्लसच्या पुढचं पाऊल म्हणून श््रल्लू’ी2इउठ नावाचं एक अॅप विकसित केलं गेलं आहे. या अॅपचा उपयोग करून ज्येष्ठ नागरिक आपले नातेवाईक, मित्र, शेजारी, डॉक्टर, शहर प्रशासनातले सोशल वर्कर्स यांचा समावेश असलेलं जास्तीत जास्त 1क् लोकांचं एक व्यक्तिगत सर्कल तयार करू शकतात. या वर्तुळामधून संबंधित व्यक्तीला संवादाची शक्यता, आधार मिळावा अशी कल्पना आहे. ज्येष्ठ नागरिकांना वापरायला सोपा इंटरफेस हे या अॅपचं वैशिष्टय़! बार्सिलोना शहर प्रशासनातल्या सोशल इनोव्हेशन डिपार्टमेंटच्या प्रकल्पाला पाच मिलियन युरोचं ब्लूमबर्ग मेयर्स चॅलेंज अवॉर्डही मिळालं आहे.
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com