शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

आल्प्स आणि हिमालय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2018 12:46 PM

आल्प्सची भौतिकता आणि हिमालयाची आध्यात्मिकता चित्रांत टिपणारा तरुण चित्रकार देवदत्त पाडेकर. प्रवासात त्याला हिमाच्छादित पर्वतांचं दर्शन झालं आणि तो त्यांच्या प्रेमातच पडला. यानंतर आल्प्स आणि हिमालय पर्वतराजीत सलग काही वर्षं त्यानं प्रवास केला. चित्रं रंगवली, माणसांना भेटला, निसर्गाचे रौद्र, विलोभनीय विभ्रम अनुभवले. त्यातून त्याचं चित्रच नाही, जगणंही समृद्ध झालं.

- शर्मिला फडके(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत.)कला-इतिहासातल्या चित्र प्रवाशांचे अनुभव वाचल्यावर प्रश्न पडतो आजच्या तरुण, समकालीन चित्रकारांना या अशा, फक्त चित्रांकरता प्रवास करण्यामधे कितपत रस असतो? किंवा त्यांचा असा प्रवास करण्यामागचा दृष्टिकोन काय असतो नेमका? आर्ट रेसिडेन्सीजच्या, स्टडी टूर्सच्या निमित्ताने, चित्रांची प्रदर्शनं, कला-मेळ्यांना भेट अशा निमित्तांनी आजचा तरुण चित्रकार जगभर भटकंती करत असतोच, चित्र काढण्याकरता परदेशामध्ये मुक्कामही करतात अनेकजण, इंटरनेटच्या माध्यमातून तसंही सगळं जग चित्रकाराच्या स्टुडिओमध्ये स्वत:हून आलेलं असतं, मग अशावेळी केवळ चित्र काढण्याकरता भटकंती करण्यामागचं थ्रील, स्वत:ला, स्वत:च्या चित्रांना शोधण्याची आस त्यांच्यामध्ये शिल्लक राहिलेली असते का? ती ऊर्मी त्यांच्या मनात शिल्लक असते का?शोध घेत असताना एक नाव अगदी सहज समोर आलं. देवदत्त पाडेकर. आजच्या भारतीय तरुण चित्रकारांमध्ये देवदत्तचं काम त्यातल्या वेगळेपणाने उठून दिसणारं. सोशल मीडियापासून दूर राहून, शांतपणे आपलं काम करत राहाणारा देवदत्त सातत्याने आपल्या कामामध्ये काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त चित्र काढण्याकरता देवदत्तने आल्प्स आणि हिमालय या दोन बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये सलग काही वर्षं प्रवास केला, या प्रवासात त्याने चित्रं रंगवली, विविध माणसांना भेटला, निमर्नुष्य जागी राहाण्याचा अनुभवही घेतला, निसर्गाचे रौद्र, विलोभनीय विभ्रम त्याने अनुभवले, त्यांच्या नोंदी ठेवल्या.. नेमकं काय मिळालं देवदत्तला या प्रवासातून? मुळात असा प्रवास त्याला करावासा का वाटला? याची उत्तरं जाणून घेणे मला अनेक दृष्टींनी महत्त्वाचं वाटलं.२००७ ते २००९ या काळात इटालीतल्या़ फ्लोरेन्स डान्स सेंटरमध्ये बॅले डान्सर्सच्या चित्रमालिकेवर काम करत असताना देवदत्तने अनेकदा, वेगवेगळ्या वेळी आल्प्स पर्वतराजीच्या बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन विमानप्रवासादरम्यान घेतलं होतं आणि प्रत्येक वेळी नव्याने तो आल्प्सच्या विलोभनीय सौंदर्याच्या मोहात पडला. आल्प्समध्ये प्रत्यक्ष भटकंती करण्याची इच्छा त्याच वेळी त्याच्या मनात जन्माला आली. ही कल्पना प्रत्यक्षात यायला २०१३ साल उजाडलं. देवदत्तने स्विस आल्प्सच्या प्रदेशात यावेळी पहिल्यांदा प्रवास केला आणि मग पुढची दोन वर्षं तो पुन्हा पुन्हा तिथे जातच राहिला.आपलं इझल, रंग सोबत घेऊन त्याने आल्प्स पर्वतराजी पालथी घातली. स्विस, फ्रेन्च, इटालियन, आॅस्ट्रियन आणि जर्मन या आल्प्स प्रदेशातल्या रूळलेल्या प्रवासी वाटा जाणीवपूर्वक टाळत, वेगवेगळ्या ऋतूंमधले निसर्गविभ्रम टिपत त्याने हा प्रवास केला. ‘सिम्फनी आॅफसिझन्स’ ही त्याची चित्र-मालिका त्यातून तयार झाली. पण त्यानंतरही देवदत्तचा प्रवास संपला नाही. आल्प्सची भटकंती संपल्यावर त्याच्यातल्या चित्रकाराला आणि प्रवाशाला, दोघांनाही तहान लागली दुसऱ्या तितक्याच सुंदर बर्फाच्छादित पर्वतराजी असलेल्या प्रदेशाची- हिमालयाची. आल्प्स आणि हिमालय, हे दोन्ही बर्फाळ शिखरांनी व्यापलेले निसर्गरम्य प्रदेश, एकमेकांपासून सर्वस्वी भिन्न. त्यांचं वय, भौगोलिकता, तिथला निसर्ग, पर्यावरण, संस्कृती, माणसे सगळंच वेगळं. या वेगळेपणाकडेच देवदत्त आकर्षित झाला. त्याचा पुढच्या प्रवासाचा उद्देशच होता आल्प्स आणि हिमालय या दोन्ही प्रदेशातलं वेगळेपण आणि साम्य नेमकं काय आहे हे धुंडाळणं. त्याकरता मग सुरू झाली हिमालयातली भटकंती. ती अजूनही सुरूच आहे. आल्प्सच्या सौंदर्यात भौतिकता आहे, हिमालयाच्या सौंदर्यात आध्यात्मिकता आहे हे देवदत्तच्या या दोन्ही प्रदेशांमध्ये प्रत्यक्ष प्रवास करून काढलेल्या निष्कर्षाचे सार..आल्प्स आणि हिमालय या दोन्ही प्रदेशातल्या प्रवासात देवदत्तने सातत्याने चित्रं रंगवली. क्षणार्धात बदलणारे निसर्गातले रंग कॅनव्हासवर उमटवण्याच्या प्रयत्नातले आव्हान पेलणे हे चित्रकाराच्या कौशल्याची कसोटी लावणारे ठरते. देवदत्तने ते पेलले आहे हे त्याच्या चित्रांमधून जाणवते. बर्फाची वादळे, हिमनद्या, गोठलेले पर्वतकडे पार करत दुर्गम हिमालयात, अनोळखी आल्प्समध्ये प्रवास करणे सोपे नाही, त्या प्रवासात चित्र रंगवणे, तेही आॅइल्स.. हे तर निश्चितच सोपे नाही.आल्प्स आणि हिमालयात रहाणारी माणसं, त्यांची वेगळी संस्कृती, घरे, त्यांनी जपलेला, जोपासलेला निसर्ग, त्यांच्या उपयोगाचे याकसारखे प्राणी, शेती, झाडं, वाटा.. देवदत्तच्या चित्रांमध्ये हे सगळं आहे. प्रवासाची प्रत्येक नोंद त्याच्या चित्रांमध्ये उमटली आहे. देवदत्तच्या या चित्रांमध्ये निसर्ग फक्त त्याच्या सुंदर, कोमल रूपातच येत नाही, त्याचे विध्वंसक रूपही येते. केवळ चित्रकारालाच मांडता येऊ शकते अशी संवेदनशीलता देवदत्तच्या चित्रांमध्ये आहे, जी केवळ प्रत्यक्ष प्रवासातूनच मनात झिरपू शकते. निसर्गातच केवळ मिळू शकेल अशा एकांतात स्वत:सोबत समष्टीचा विचार मनात आपोआप जन्मतो.देवदत्तचा हा सगळा प्रवास एकट्याने केलेला आहे. इंटरनेटच्या मदतीने त्याने प्रवासमार्ग निश्चित केले. तो ट्रेन, बस, बोटने फिरला, पायी गेला, कधी सर्व सोयींनी युक्त लॉजमध्ये राहिला, कधी तुटलेले पर्वतकडे पार करत, दरी ओलांडत जिवावर उदार होत मार्ग शोधत गेला. प्रवासात अडचणी आल्या, मदतीचे हात पुढे आले, अनोळखी लोकांनी दारं उघडली, काही वेळा फसवणूकही झाली. पण प्रवास कुठेच थांबला नाही. देवदत्तच्या मते हे सगळे अनुभव त्याच्या चित्र-प्रवासातले अपरिहार्य भाग आहेत.देवदत्तच्या काय किंवा कोणत्याही चित्रकाराच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष चित्र-प्रवासातलेच हे सगळे टप्पे. स्वत:ला शोधण्याचे, स्वत:तल्या चित्रकाराला शोधण्याचे. कला-इतिहासातल्या असो किंवा वर्तमानातल्या असो, चित्र-प्रवाशांचे मार्ग बदलत नाहीत, मार्गातले खाचखळगे चुकत नाहीत मुक्कामांची ठिकाणं बदलत नाहीत. प्रवास करून शोध घेण्याची ऊर्मीही बदललेली नाहीच. जे जाणून घेणेच किती आश्वासक ठरते आहे!...

टॅग्स :artकलाnewsबातम्या