शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
2
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
3
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
4
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
5
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
6
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
7
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
8
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
9
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
11
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
13
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
14
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
15
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
16
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
17
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
18
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
19
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
20
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....

ये शहर किसने बनाया.. - घर बांधणार्‍या बेघर माणसांची चित्नं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 6:02 AM

आपली घरं, मॉल्स, मल्टिप्लेक्स, ऑफिसेस. हे सारं बांधणारी बेघर माणसं. अत्यंत निर्लेपपणाने हे सगळं बांधून  ते तिथून निघून जातात. तिथे त्यांना परत प्रवेश नसतो.  त्या इमारतीत ते परत फिरकतही नाहीत. हे कष्टकरी जर उद्या समजा नाहीसे झाले तर  काय हाहाकार उडेल आपल्या पांढरपेशा जगात?.

ठळक मुद्देचंद्रमोहन कुलकर्णी यांच्या ‘ये शहर किसने बनाया’ या चित्न सिरीजमध्ये बांधकामं आणि बांधकामं करणार्‍यांचं विश्व चित्नं बनून समोर येतं. अँक्र ीलीक आणि ऑइल माध्यमात केलेली ही चित्नं 15 ते 21 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शित केली गेली होती.

- जुई कुलकर्णी

डोळे असूनही दिसत नाही असं अनेकांचं होतं. चांगलं चित्न ही गोष्ट अशी असते की ती तुमच्या डोळ्यांना नजर देते. चित्न तुम्हाला संवेदनशीलतेनं आजूबाजूचं जग पहायला शिकवते. चित्न बघायला लागलो की आजूबाजूचं जगही वेगळं दिसायला लागतं.चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या ‘ये शहर किसने बनाया’  या चित्नमालिकेमधले चित्नविषय आपण अनेकांनी अनेकदा पाहिले आहेत. रस्त्यावरून रोज येता-जाता, शेजारीपाजारी किंवा स्वत:च्या घराची बांधकामं पहाताना हे सगळं दिसतंच. हे इमारतनिर्मितीचं चैतन्यमय वातावरण असतं. फक्त या वातावरणात इतकी चित्ने आहेत हे आपल्याला कधीच जाणवलं नसेल.इथंच कलाकार, कलाकार म्हणून वेगळा आणि मोठा ठरतो.ही घरं बांधणारी बेघर माणसं या इमारतीतच शेजारी किंवा आसपास कुठेतरी कच्च्या खोपट्यांत राहतात. त्यांची स्वत:ची अशी घरं नसतात. कंत्नाटदार ठेवेल तसं, तिथं तात्पुरतं रहायचं. काम संपलं की दुसरीकडे चालू लागायचं.माणसाला घराचा अफाट मोह असतो. एक सुरक्षित निवारा म्हणून घराचं महात्म्य कधीच संपलंय. आता गरजेहून अधिक ठळक झालीय ती घराशी निगडित घरमालकाची प्रतिष्ठा.आपण आपल्या घरात किती गुंततो, घरावर किती प्रेम करतो ! अगदी घरघर लागावी तशी काहीजणांची अवस्था होते. घरांची मालकी मिळवण्यासाठी कधी कधी सगळी हयात कर्ज फेडण्यात जाते. आयुष्य तडजोडी करण्यात जाते. ही घरं बांधणारे मात्न अनिकेत राहतात. हे लोक आपलं घर, ऑफिस, शहर बांधून पुन्हा बेघर होतात.हे लोक रंगीबेरंगी, स्वस्तातले कपडे घालून काम करतात. यातले बाप्ये धोतरं, लुंग्या नेसलेले, काही पायजमे, पॅण्ट्स घातलेले असतात. बायका साड्यांमध्येच असतात, क्वचित कुणी बाई सलवार-कुर्त्यामध्ये असते. त्यांचे काम करून करून घट्टे पडलेले हात-पाय, पीळ पडलेले स्नायू, कोरडी राकट काळपट त्वचा, धुळकट केस, बरेचदा राबून राबून निर्विकार चेहरे. सतत इतकं कष्टाचं काम करून, व्यसनांपायी आणि बहुतांशी कुपोषित असल्याने सगळेजण बारीक असतात.या चित्नांमध्ये हे सगळं टिपलंय. स्थिर चित्नात हालचाल, वेग टिपणं हे विशेष, ते तर इथं खूप दिसतंय. कुणी घमेली उचलतंय, कुणी सिमेंटवर पाणी मारतंय, कुणी वाळू चाळतंय, कुणी विटा उचलून वाहतंय, कुणी रंग देतंय, कुणी सिमेंट थापतंय.एकीकडे मशिन्स काम करतायत. सिमेंट मिक्स होतंय, ओतलं जातंय.कुणी रंगाने माखलेले चहा पितायत. बायाबापड्या तिथंच सळ्यांवर, पत्र्याशेजारी बसल्यायत. मधेच आडोशाला बांधलेल्या झोळीत त्या बाळाकडे जाऊन येत असतील. चार विरंगुळ्याच्या गप्पा मारत असतील.एखादा वॉचमन डुलकी काढतोय. अजस्र जेसीबी आणि क्रे न, अजस्र आकाशाला आव्हान देतायत. सिमेंटचे पाइप लोळत पडलेयत. माणसांच्या मात्न सतत हालचाली चालूयत.एखादा सुपरवायझर खेकसत ओरडत असतो. हा सुपरवायझर जीन्समध्ये किंवा जरा ठीकठाक कपड्यांत असतो. पण मजूर लोक काळपट धोतरांमध्ये, विटक्या कळकट पॅण्टमध्ये, पायजम्यामध्ये असतात.या चित्नांमधल्या बायका मला विशेष जाणवल्या.स्री असूनही पुरुषांच्या सोबतीने या अंगमेहनतीची कामं करणार्‍या बाया आहेत.बायकांच्या सिन्थेटिक भडक रंगीत साड्या, कुरता. त्यावर घातलेला नवर्‍याचा/बापाचा जुना शर्ट. डोक्याला गुंडाळून घेतलेली ओढणी, कापड. एवढय़ा कामातही अंगावरचे नकली दागिने उठून दिसतात. ठसठशीत आणि चमकणारे दागिने.पिवळा रंग, यलो ऑकर या चित्नांमध्ये विशेष जाणवला. अजस्र क्रे नच्या मागे पसरलंय पिवळं, धुमसतं, धुळकट आकाश. अंगावर येणारं पिवळं आकाश. आणि मधेच कुठे करडा निळसर रंगही दिसतो. विटांचा तपकिरी लालसर रंगही दिसतो. मधेच बायकांच्या कपड्यांचे राणी, केशरी असे रंग उठून दिसतात. काही चित्नं दुरून पाहिली की मग वर आल्यासारखी वाटतात.त्या पलीकडे दिसतो एक वेगळाच सिमेंटी रंग.वाळू चाळण्याची हालचालही या स्थिर चित्नात दिसते आणि स्तिमित व्हायला होतं.रंग देणारा त्या भिंतीशी इतका एकरूप झालेला जाणवतो की तो नीट जवळ जाऊन बारीक नजर करूनच शोधावा लागतो.निर्मिती सुरू आहे. काहीतरी बांधण्याचं काम सुरू आहे. जे बांधलंय ते नीटनेटकं, सुशोभित करण्याचं काम सुरू आहे. हे जे काही बांधलं जातंय ते दुसर्‍यासाठी असणार आहे. या इमारती पूर्ण झाल्यावर या माणसांना इथं प्रवेश नसणार आहे. ठरलेल्या मोलाने काम करून हे इथून कायमचे निघून जाणार आहेत.कष्टाची कामं करून करून आपलं शहर तयार करणारे हे मजूर. यांचं जगणं, काम करणं, काम करण्यातली धोकादायक परिस्थिती, विर्शांतीचे, विरंगुळ्याचे चुकार क्षण, यांचे कपडे, विशिष्ट हालचाली हे सगळं सगळं या चित्नांमध्ये सामावलेलंय.अदिती हर्डीकर नावाची माझी चित्नकार मैत्नीण म्हणाली, की शहरं डेव्हलप करणार्‍या बांधकाम कंपन्यांमध्ये अशी चित्नं लागली तर या मजुरांच्याकडे पाहायचा लोकांचा अँप्रोचच बदलून जाईल. मनात म्हटलं, होय कदाचित; पण माणूस म्हणून तितकी संवेदनशीलता शिल्लक असली पाहिजे.आपली स्वच्छ, सुंदर, चकचकीत घरं, मॉल्स, मल्टिप्लेक्स, ऑफिसेस तयार करून देणारे हे लोक कशा खोपटांमध्ये राहत असतील. अत्यंत निर्लेपपणाने हे सगळं बांधून ते तिथून निघून जातात. त्या मॉलमध्ये त्यांना परत प्रवेश नसतो. त्या इमारतीत ते परत फिरकतही नाहीत. परत आलेच तर पेहरावावरून त्यांना चोर समजण्याची भीतीच अधिक असते. जगण्यासाठी, रोजीरोटी मिळवण्यासाठी हे कष्टाचं, कधी कधी धोक्याचं काम करायचं.जिथं आपला घाम, कधी कधी रक्त सांडून काही निर्माण करायचं ते अत्यंत निर्लेपपणाने सोडून निघून जायचं. बुद्धालाच जमेल असं हे न गुंतणं आहे. विरक्ती आहे. ‘इदं न मम’ न म्हणता आचरणात आणत या माणसांनी ही शहरंच्या शहरं उभी केलीयत. घरं , ऑफिसेस, रस्ते, पूल, मेट्रोज, टोलेजंग टॉवर्स, काचेच्या इमारती, सगळी शहरंच बांधतात हे लोक.ही घरं बांधणारी बेघर माणसं. मग कधीतरी काम पूर्ण होतं, ट्रक येतो, सामान चढतं आणि ही माणसं दुसरीकडे दुसरं काही बांधायला निघून जातात.खरं तर जगाची केवळ दोन तुकड्यात विभागणी झाली आहे. कष्टकरी, हातावर पोट असणारी माणसं आणि पांढरपेशी सुशिक्षित माणसं. दोन्ही जगं एकमेकांना लगडलेली आहेत. एकमेकांवर अवलंबून आहेत तरी एकमेकांपासून कोसो दूर आहेत.या चित्नप्रदर्शनात जाणवलं की इथला प्रत्येक कॅनव्हास आणि ब्रशचा फटका या कष्टकरी माणसांना दिलेला आदर आणि सन्मान आहे. यांनी बांधलेल्या घरांमधे राहाताना, या वास्तू तुडवताना, इमारती वापरताना या लोकांची आपल्याला टीचभर जाणीव तरी असते का? डोळ्यांना दिसूनही न दिसणारे हे कष्टकरी जर उद्या समजा नाहीसे झाले तर काय जबर हाहाकार उडेल आपल्या पांढरपेशा सुखवस्तू लोकांच्या जगात?.चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्ने ही अस्सल भारतीय बांधकाम कामगारांची चित्ने आहेत. चंद्रमोहन कुलकर्णी म्हणाले की, हे सगळं जग बघता बघता मनात साठत गेलं आणि अवघ्या काही महिन्यात त्यांनी ही चित्नं काढली. चित्ने म्हणून तंत्न दृष्टीने ही इतकी परिपूर्ण आहेत की ते तंत्नही जाणवत नाही, म्हणूनच ती उत्तम चित्ने ठरतात. चंद्रमोहन कुलकर्णी या चित्नकाराचं विधान या चित्नांमध्ये दिसतं म्हणून ही उत्तम चित्नं आहेत.हे शहर बनताना राबलेले असंख्य हात, गाळलेला घाम आणि लागलेलं कौशल्य या चित्नांमध्ये जाणवतं आणि पाहणार्‍याला नकळत हलायला होतं. मग माधव आचवल किमयात म्हणतात ते आठवतं, ‘रसिकांच्या नकळत त्याचे हृदय हलवणे, यापेक्षा कलाकृतीला तरी निराळे काय हवे असते?’juijoglekar@gmail.com(लेखिका चित्रभाष्यकार आहेत.)