सध्या यूट्युब मनोरंजनाचा उत्तम पर्याय बनला आहे. यावरील बरेच कार्टून, चित्रपट, टीव्ही मालिका लहान मुलांमध्ये लोकप्रिय आहेत. मनोरंजनाशिवाय यावर लहान मुलांना शिकण्यासाठी विज्ञान व्हिडिओ आणि शैक्षणिक व्हिडिओ यांसारखे अनेक उपयुक्त व्हिडिओ देखील आहेत. पण मुलांच्या हातात मोबाईल देताना पालकांसाठी सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे यावरील अश्लील सामग्री. तथापि, अजूनही एक पातळ रेषा आहे जी यूट्युबवरील व्हिडिओंपासून अश्लील सामग्री वेगळे ठेवते. तुमच्या मुलांना पॉर्न आणि अश्लील व्हिडिओ पाहण्यापासून रोखण्यासाठी काही टिप्सचा वापर केला पाहिजे. ज्याद्वारे तुम्ही यूट्युब किड-फ्रेंडली बनवू शकता आणि प्रौढ सामग्री ब्लॉक करू शकता. कसे ते जाणून घेऊ या...
मोबाईलवर ‘यूट्युब रिस्ट्रिक्टेड मोड’ कसा ऑन कराल? n स्मार्टफोनमध्ये यूट्युबचे ॲप ओपन कराn उजव्या बाजूला कोपऱ्यात तुमच्या नावासह असलेल्या वर्तुळावर क्लिक कराn आता ‘सेटिंग्स’ पर्याय निवडाn पहिलाच ‘जनरल’ पर्याय निवडn आता शेवटून दुसरा ‘रिस्ट्रिक्टेड मोड’ हा पर्याय असेल तो सुरू करा डेस्कटॉपवर ‘यूट्युब रिस्ट्रिक्टेड मोड’ कसा ऑन कराल? n वेब ब्राउझरवर यूट्युब डॉट कॉम खोला n उजव्या बाजूला प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा n प्रोफाईल मेन्यूमधून ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर क्लिक कराn आता ‘ॲक्टिव्ह रिस्ट्रिक्टेड मोड’ हा पर्याय समोर येईल तो सुरू करा n अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी रिस्ट्रिक्टेड मोड ॲक्टिवेट होईल.