शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

ये रे ये रे पावसा !.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 6:02 AM

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यंदा पूर आला,  मात्र अनेक ठिकाणी पावसाने इंगाही दाखवला. त्यामुळे काही ठिकाणी कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. खरे तर असे प्रय} अजूनही ‘प्रयोगिक’च आहेत. शंभर टक्के यश त्यातून मिळत नाही; पण  पूर्वीच्या चुका दुरुस्त करणे, ‘वेळ’ साधणे आणि सखोल अभ्यासाच्या माध्यमातून  यशाचे प्रमाण नक्कीच वाढवता येऊ शकते आणि त्यासाठीचा खर्चही कमी करता येऊ शकतो.

ठळक मुद्देमानवाने 1946 सालापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगांना सुरुवात केली. विन्सेंट जोसेफ श्ॉफर याने पाऊस पाडण्याची पहिली कृती 13 नोव्हेंबर 1946 रोजी केली.

- विनय र. र.

कृत्रिम पाऊस पाडावा म्हणून अनेकदा कमी पाऊस झालेल्या प्रदेशांतील लोक सरकारच्या मागे लागतात. यज्ञात भवती पर्जन्य: असे वेदात म्हणून ठेवलेले आहे. याचा अर्थ यज्ञ म्हणजेच यत्न किंवा प्रयत्न केले की पाऊस पडतो. आधुनिक विज्ञानानेसुद्धा पाऊस पाडण्याचे प्रयत्न चालू ठेवले आहेत. पाऊस पडण्यासाठी कोणत्या प्रकारचे वातावरण हवे याचा अभ्यास माणसाने वर्षानुवर्षे निरीक्षणे करून, अनुमान काढून परंपरेने सर्वांसमोर मांडला.पाऊस येतो कसा?आपल्याला प्राथमिक शाळेतच पर्जन्यचक्र  शिकवलेले असते. सूर्याच्या उन्हामुळे पाण्याची वाफ होते, ती हलकी असल्यामुळे वर वर जाते. वर हवा थंड असल्यामुळे ती गोठते. तिचे ढग होतात. ते जड होऊन खाली येतात आणि पाण्याच्या थेंबांच्या स्वरूपात खाली पडतात. त्यालात आपण पाऊस म्हणतो. वास्तवात पाऊस पडण्यासाठी आवश्यक असणारी पर्यावरणीय स्थिती काय आहे याचा अभ्यास खूपच बारकाव्याने करावा लागतो. पाऊस पडण्यासाठी ढग तयार व्हावे लागतात. ढग म्हणजे बारीक बारीक सूक्ष्म पाण्याचे थेंब. पावसाचे थेंब तयार होण्यासाठी पाण्याची वाफ लागते, त्याचप्रमाणे गारवाही लागतो. हवेत बाष्प सामावून घेण्याची र्मयादा ओलांडली जावी लागते. ते पाण्याच्या सूक्ष्म थेंबांच्या रूपात अवतरते. थेंबांनाही अवतरण्यासाठी काही आधार लागतो. निसर्गामध्ये अतिशय सूक्ष्म अशा धुळीच्या कणांचा आधार घेऊन हे बाष्पाचे थेंब अवतरतात. आकार वाढून एकत्न येतात. काही मायक्रोमीटर आकाराचे थेंब मिलिमीटर आकारांमध्ये एकत्न आले की, त्यातून पाऊस पडण्याची शक्यता वाढते. माणसाला याचे माप कळाल्यावर कृत्रिम पाऊस पडण्यासाठी माणसाने केलेल्या प्रयोगांमध्ये याबाबत प्रयोग करण्यात आले.मानवाने 1946 सालापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगांना सुरुवात केली. विन्सेंट जोसेफ श्ॉफर याने पाऊस पाडण्याची पहिली कृती 13 नोव्हेंबर 1946 रोजी केली. ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय भागातील बाथरूस्ट प्रांतात जनरल इलेक्ट्रिक लॅब या कंपनीने 1947 मध्ये कृत्रिम पावसाचा व्यावसायिक प्रयोग केला. असे प्रयोग अनेक देशांनी केले त्यामध्ये अमेरिका रशियासुद्धा आहेत.कृत्रिम पावसाचे तीन टप्पेपहिल्या टप्प्यामध्ये हवेच्या वरच्या थरांमध्ये अशी रसायने फवारतात की जी बाष्पशोषक असतात.  पावसाळ्यामध्ये मीठ पाझरते याचा अर्थ हवेतले बाष्प ते शोषून घेते. साधारणपणे कंपन्या ज्या मिठाची विक्र ी करतात त्यामध्ये ही बाष्पशोषक रसायने काढून टाकलेली असतात. मात्न बाजारात खडेमीठ मिळते त्यामध्ये ही रसायने असतात. उदाहरणार्थ कॅल्शियम क्लोराइड.दुसर्‍या टप्प्यामध्ये या बाष्पशोषक कणांनी केलेले बाष्प आणखी मोठय़ा प्रमाणात एकत्न व्हावे म्हणून दुसरी फवारणी केली जाते. त्यामध्ये मीठ, युरिया, अमोनियम क्लोराइड, अमोनियम नायट्रेट, सुका बर्फ  असे पदार्थ वापरले जातात. आपण घरी आइस्क्र ीम करताना बर्फ आणखी गार करण्यासाठी हे पदार्थ वापरले असतील.पहिल्या दोन घडामोडी झाल्यानंतर ढग दिसायला लागतात. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे सिल्व्हर आयोडाइडचा वापर करणे. अत्यल्प मात्नेमध्ये त्याचे द्रावण तयार करून ते ढगांच्या वरच्या बाजूला जोर लावून तुषारांच्या स्वरूपात विमानातून फवारतात. सिल्व्हर आणि आयोडाइड असे दोन आयन यातून बाहेर पडतात. या आयनांवर विद्युत प्रभार असतो. पाण्याचे रेणूसुद्धा एका बाजूला धन आणि दुसर्‍या बाजूला ¬ण विद्युत प्रभार असणारे रेणू असतात. सिल्व्हर; जो धन प्रभारित आहे त्याच्या भोवती पाण्याच्या रेणूंचा ¬ण प्रभारित भाग आकर्षित होतो आणि आयोडाइड हा ¬ण प्रभारित असल्यामुळे पाण्याचा धन प्रभारित भाग त्याकडे आकर्षित होतो. अशा प्रकारे हळूहळू हे पाण्याचे सूक्ष्म रेणू एकत्न येत येत पाण्याचे कण तयार होतात आणि हे कण त्याच वेळेला सुका बर्फही पसरल्यामुळे अधिक थंड होऊन बर्फाच्या रूपात जातात. म्हणजे ढगांमध्ये बर्फ असतो; पण अतिशय पातळ आणि विरळ थराच्या रूपात. प्रयोगातून फवारलेल्या रसायनांचे माध्यमातून ते थर एकत्न येतात आणि जड होऊन जमिनीकडे सरकतात आणि पाण्याच्या थेंबाच्या रूपात आल्यावर त्यापासून पाऊस पडतो.आज-काल विमानातून फवारणी करण्याऐवजी ज्याप्रमाणे दिवाळीत फटाके उडवून उंच भागात फटाक्याची दारू पसरवली जाते, त्याप्रमाणे ढगांच्याही वरच्या पातळीवर जातील अशी मिसाइल उडवून त्यातून ढगांमध्ये कृत्रिम रसायनांचे रोपण केले जाते. मिसाइलमधून ढग रोपणी करणे विमानापेक्षा स्वस्त पडते आणि त्याची यशस्वितादेखील 80 टक्के अधिक आहे.  मागे बारामती भागांमध्ये असा एक प्रयोग करण्यात आला की गॅसच्या फुग्यांमध्ये बारीक केलेली मिठाची पूड भरून हजारो फुगे एकाच वेळेला आकाशात सोडायचे. फुगे वर गेले की हवेचा दाब कमी होत असल्यामुळे त्यांचा आकार वाढेल आणि  विशिष्ट उंचीवर गेल्यावर हे फुगे फुटतील. त्यावेळेला या फुग्यांमधून मिठाच्या बारीक कणांची फवारणी आपोआपच आकाशात होईल आणि त्यापासून पाऊस पडेल अशी अपेक्षा होती.कृत्रिम पाऊस पाडण्याच्यामध्ये यशस्वीतेचे प्रमाण खूप मोठे आहे असे नाही. अर्थात अजूनही त्यात सुधारणा करायला खूपच वाव आहे. अमेरिकेत जेव्हा पाऊस पाडण्याचे प्रयोग सुरू झाले त्या वेळेला कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी एक टन पावसासाठी 1.3 सेंट इतका खर्च येत होता. मात्न त्यात सुधारणा होत आता ऑस्ट्रेलिया मधले यशस्वी प्रयोग पाहता एक टन पावसासाठी केवळ 0.3 सेंट इतकाच खर्च येत आहे.भारतामध्ये 1983 साली असे प्रयोग करायला सुरुवात झाली. प्रथम तामिळनाडूमध्ये हे प्रयोग झाले. 2003 ला कर्नाटकमध्ये आणि 2018ला आंध्र प्रदेशातल्या बारा जिल्ह्यांमध्ये झाले. 2009 साली महाराष्ट्रात एका अमेरिकन कंपनीच्या मदतीने पावसाचे पहिले प्रयोग झाले. या वर्षीही याच प्रकारे कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग करण्यात आले. यात शंभर टक्के यश मिळत नसले तरी अधिक सखोल अभ्यास करून, चुका दुरुस्त करत करत आणि योग्य वेळ साधून कृत्रिम रोपणाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याची शक्यता वाढवता येणे शक्य आहे.

कृत्रिम पावसाचे तोटे 1. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी रसायनांची जी फवारणी करण्यात येते ती रसायने मानवी आरोग्याला किंवा सजीवांना घातक नाहीत ना? विशेषत: सिल्व्हर आयोडाइडचे काही घातक परिणाम दिसून येऊ शकतात. त्यातला सिल्व्हर एक जड धातू आहे. याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे.2. कृत्रिम पावसाची आपल्याला पूर्वकल्पना असते, मात्न इतर सजीवांना याची पूर्वकल्पना नसल्यामुळे त्यांच्या जीवनचक्र ामध्ये फरक पडू शकतात. निसर्गचक्रामध्ये अनेक प्राण्यांची जीवनचक्रे  एकमेकांत गुंतलेली असतात. एखाद्याच्या जीवनचक्राला धक्का लावला तरी त्यामुळे इतर जिवांच्या अस्तित्वालाही धक्का लागू शकतो.3. कृत्रिम पाऊस पाडण्याची कौशल्ये माणसाच्या हाती आल्यावर तो त्याचा वापर शत्नू राष्ट्रावर आघात करण्यासाठी, तसेच दहशतवादीही त्याचा वापर आपली दहशत निर्माण करण्यासाठी करू शकतात.4. माणसाने आपल्या बुद्धीच्या आधारावर प्रयोग करून विज्ञान-तंत्नज्ञान विकसित केले; पण ते कोणत्या कारणांसाठी वापरायचे याची सांस्कृतिक आणि नैतिक बाजू विचारात घेतली नाही, आपल्या हाती निसर्ग बदलण्याची शक्ती आल्यामुळे आपण कसाही निसर्ग बदल करू शकतो अशा घमेंडीत माणूस राहिला तर इथला सुदृढ निसर्ग बिघडेल. माणसावरही त्याचे दुष्परिणाम होणारच. तेव्हा या गोष्टी सावधपणे केल्या पाहिजेत. 

कृत्रिम पावसाचेअसेही ‘प्रयोग’!केवळ दुष्काळावर उपाय म्हणूनच कृत्रिम पाऊस पाडला जातो असे नाही. 2008 साली बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या उद्घाटन समारोहात त्या समारंभावर पाणी पडायला नको म्हणून बीजिंगच्या अलीकडे असा प्रयोग करण्यात आला. बीजिंगचा समारंभ पावसाविना निर्विघ्न पार पडला! आग्नेय आशियात विशेषत: मलेशिया, इंडोनिशियामध्ये मोठे वणवे लागून जेव्हा हवेत मोठय़ा प्रमाणात धुराचे प्रदूषण झाले होते, त्यावेळीही अशाप्रकारे पाऊस पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले. 2017ला दिल्लीमध्ये जेव्हा हवेतील कणांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढून धुळीचे प्रदूषण झाले त्यावेळीही कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाबाबत विचार केला गेला, मात्न प्रत्यक्षात तो करण्यात आला नाही.vinay.ramaraghunath@gmail.com(लेखक विज्ञान प्रसारक आणि मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष आहेत.)