शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

बाळासाहेब

By admin | Published: October 17, 2015 3:05 PM

काही इमारतींना, जागांना आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान असतं. विशेषत: आपलं करिअर घडण्याच्या काळातल्या इमारतींना तर आपल्या मनात एक विशेष जागा असते. आपल्या करिअरच्या इमारतीच्या पायाचे दगड तिथल्या जागेत असतात.

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
काही इमारतींना, जागांना आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान असतं. विशेषत: आपलं करिअर घडण्याच्या काळातल्या इमारतींना तर आपल्या मनात एक विशेष जागा असते. आपल्या करिअरच्या इमारतीच्या पायाचे दगड तिथल्या जागेत असतात, तिथं भेटलेल्या माणसांनी आपल्या आयुष्याच्या बांधकामात महत्त्वाची जोडणी केलेली असते. 
1980-82 नंतर अलका टॉकिजशेजारी असलेल्या ‘रवि’ बिल्डिंगच्या अडिचाव्या मजल्यावर माझा स्टुडिओ-कम-ऑफिस होतं. सुरुवातीला तर अगदीच छोटय़ा लिफ्टएवढय़ा जागेत आणि नंतर त्या जागेसमोरच थोडय़ा मोठय़ा जागेत. तर ही रवि बिल्डिंग, तिथं कामानिमित्त, टाइमपाससाठी भेटलेली माणसं, आलेले गमतीजमतीचे अनुभव याबद्दल खूप मस्त मस्त गोष्टी आहेत त्याबद्दल वेळोवेळी गप्पा मारूच, पण आज ‘रवि बिल्डिंग’ म्हटलं की पाठोपाठ आठवणा:या बाळासाहेबांबद्दल!
बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब धारप, रवि बिल्डिंगचे मालक, सर्वेसर्वा! एखाद्या अख्ख्या बिल्डिंगचा एक मनुष्य मालक असतो आणि तो आपल्या माहितीतला असतो, ही गोष्ट माङयासाठी तरी तेव्हा नवीनच होती. मला मोठं अप्रूप वाटायचं या गोष्टीचं! बाळासाहेबांचं व्यक्तिमत्त्वही त्यांच्या नावासारखंच होतं. 
मराठी साहित्यातल्या नारायण धारप या नावाभोवती एक गूढसर वलय होतं. त्या नारायण धारपांच्या आणि  या धारपांच्या फक्त नावातच साम्य होतं असं नव्हे, तर ते नात्यानंही एकमेकांशी बांधलेले आहेत असं माङया कानावर होतं; नि त्यामुळेसुद्धा माङया मनात एकूणच धारप ह्या आडनावाभोवती एक वलय निर्माण झालेलं होतं. आज इतक्या वर्षांनीसुद्धा बाळासाहेब धारप हे नाव डोळ्यापुढं आलं की दृष्टीसमोर क्षणार्धात तरळते ती त्यांची पाठीत किंचित बाक काढून चालणारी, मध्यम उंचीची मूर्ती. आणि मुख्यत: आठवतं ते त्यांचं टक्कल नि भेदक नजर. विशिष्ट कोकणस्थी हिरवट निळे-घारे डोळे. अंगावर वांगाचे ठिपके. 
बिल्डिंगच्या मोठय़ा फाटकात त्यांची ती खास स्कूटर पार्क करताना, जाताना-येताना दृष्टीस पडत. स्कूटर लावून झाल्या झाल्या कुठेही न रेंगाळता झपझप चालत थेट त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचत. चालताना कुणाकडेच बघत नसले तरीसुद्धा नजरेतली जरब जाणवल्याशिवाय राहत नसे. इंग्लिश पद्धतीची टकाटक राहणी. कपडय़ांची आवडनिवड नि रंगसंगतीसुद्धा तशीच. क्वचित वेळेला, फ्रीकआऊट मूडमध्ये आहेत, हे लक्षात यायचं ते लालहिरव्या बोल्ड रंगाच्या कॉलरवाल्या टीशर्टमध्ये असत, तेव्हा. पायात कधीकधी टेनिसचे शूज दिसत. टेनिस फार आवडायचं त्यांना. कधी अध्र्या बाह्यांचा स्वच्छ पांढरा बुशशर्ट असला की त्याला शोभेलशी क्र ीम किंवा ग्रे रंगाची ट्राऊझर आणि पायात चमकदार काळे बूट. टीशर्ट असला की छानसे अमेरिकन पद्धतीचे स्पोर्टी किंवा कॅज्युअल सँडल. रंगसंगतीच्या आणि  राहणीमानाच्या बाबतीत चोखंदळ माणूस. हुन्नरी माणूस, रसिक आणि कलासक्त. 
रस्त्यानं जातायेता किंवा जिन्यात चढउतर करताना नजरानजर व्हायची तेव्हा छान पण मोजकं हसत आणि  लगेचच त्यांच्या पद्धतीप्रमाणो कुणाकडेही न बघता, पण थेटपणो बघत झपझप निघून जात. मग मीही अधूनमधून नमस्कार वगैरे करून अगदी मोजकं बोलून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे. पण नमस्कार, हायहॅलो याच्यापलीकडे संभाषण सरकायला बराच वेळ गेला. मग थोडंथोडं बोलणं होई. चित्रकलेबद्दल, फोटोग्राफीबद्दल भरभरून बोलत. त्यांच्याकडे फोटोग्राफीबाबतची सौंदर्यदृष्टी तर होतीच; शिवाय तंत्रचंही ज्ञान होतं. कॅमे:याच्या तांत्रिक बाबींबद्दल बोलायला ते नेहमीच उत्सुक असत. पुण्यातल्या मोठमोठय़ा आणि महत्त्वाच्या फोटोग्राफर्सशी त्यांची चांगलीच जवळीक होती. पुण्यातल्या महत्त्वाच्या काही क्लब्सचे ते आजीव सभासदही होते. मोठय़ा वर्तुळात त्यांची ऊठबस होती. एखाद्या बिल्डिंगचा मालक भाडेकरूंकडून महिन्याच्या महिन्याला भाडं गोळा करण्यापलीकडे एरवी काय करत असेल, याबद्दल मला चांगलंच कुतूहल होतं. भाडं गोळा करणं एवढंच काही एकमेव काम त्यांना नसणार, इतपत मला समजत होतं. त्यांच्या झपझप चालण्याच्या शैलीमुळे असेल एखादेवेळेस, पण बाळासाहेब नेहमीच घाईत असलेले दिसत. बिल्डिंगमध्येच त्यांचं एक ब:यापैकी मोठं ऑफिसही होतं. विशिष्ट वेळेला ते तिथं येतजात आणि  बसतही असत. पण, व्यवसाय म्हणून ते काय करतात हे मात्र माङया लक्षात यायचं नाही. बाळासाहेबांच्या एकूणच धारदार व्यक्तिमत्त्वाबद्दल आकर्षण असल्यामुळे ते काय काम करत असतील्, याबद्दलचं माझं कुतूहल आणखीनच वाढायचं. 
जसजसा मी रवि बिल्डिंगमध्ये स्थिरावू लागलो, तसतसं आमच्यातल्या परिचयाचं रूपांतर व्यावसायिक संबंधात झालं. ते काय करतात, या प्रश्नाचं उत्तरही मला लवकरच मिळालं. 
एके दिवशी सकाळी अकरा-साडेअकरा वाजता त्यांच्या ऑफिसमधनं उठून एक मजला वरती चढून माङया स्टुडिओ-कम-ऑफिसमध्ये स्वत: बाळासाहेबच प्रत्यक्ष हजर झाले! त्यांच्या झपझप चालण्याच्या पद्धतीप्रमाणो थेट झपकन आतच आले आणि माङया  टेबलासमोरच्या लोखंडी खुर्चीत बसलेच एकदम !!
ते बसले, आणि मी मात्र खुर्चीतल्या खुर्चीत एकदोन इंच उडालोच! खुद्द बाळासाहेब धारप माङयासमोर बसले होते!! आमच्या बिल्डिंगचे मालक!! माङया हातातलं काम थांबवून, माङया मनात दरारामिश्रित आदरभाव असलेल्या त्या व्यक्तीकडे क्षणभर भांबावून बघतच राहिलो. खुर्चीतल्या खुर्चीत थोडेसे रेलून, पण टेबलावर सैलसर हात ठेवून बाळासाहेब बसले होते. त्यांच्या त्या रोखून बघण्याच्या खास शैलीत माङयाकडे रोखूनही बघत होते. चेह:यावर किंचित हास्य. (दाताला जीभ लावत लावत बोलण्याची त्यांची लकब आजही आठवते.) एका विशिष्ट खर्जातल्या आवाजात मधूनमधून खाकरण्याचीही त्यांना सवय होती. अगदी क्वचित वेळेला खोकल्याची उबळ येत असे. 
दुसरंतिसरं काही न बोलता आणि कोणतीही औपचारिक सुरुवात अथवा प्रस्तावना न करता थेट म्हणाले, 
‘‘माझं काम करशील का?’’ मी बाळासाहेबांचं कसलं काम करायचंय याचा मला काही अंदाज येईना. एक तर बाळासाहेब असे अनमानधपक्या माङयाकडे येऊन बसलेत, या धक्क्यातनंच मी अजून सावरलो नव्हतो. त्यात त्यांचं काम करण्याबद्दल मला ते विचारत होते. थेटच. मला त्यांचा प्रश्नच नीट कळला नव्हता; त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं याचा विचार करत मी तसाच बावळटासारखा त्यांच्याकडे बघत राहिलो. का कोण जाणो, माङया अंगाला सुटलेला सूक्ष्मसा कंपही आजसुद्धा आठवतोय. थोडा भानावर आल्यावर मी म्हणालो,
‘‘.. हो.. पण. कसलं काम?’’
- माङया स्वरातलाही कंप मला जाणवत होता. 
‘‘हाउस जर्नलचं.’’ माङयाकडे रोखून बघत, पण शांतपणानं बाळासाहेब म्हणाले.
ते दोन शब्द उच्चारायच्या आधी ते जेवढा वेळ थांबले होते, तेवढय़ा वेळात स्वत:ला पुन्हा एकदा नीटच सावरून खुर्चीचा पुन्हा ताबा घेत पूर्ण भानावर येत मी म्हणालो, 
‘‘म्हणजे, डिझायनिंगचं?’’
‘‘हो.’’ - बाळासाहेब.
‘‘..करीन.’’
मी, ‘करीन’ असं म्हटल्यावर खरं तर पुढे काही संभाषण सुरू राहणं अपेक्षित होतं. पण तसं काहीच झालं नाही. जेवढय़ा झपकन ते खुर्चीत बसले होते, तेवढय़ाच झटकन खुर्चीतून उठून उभे राहिले आणि दाराकडे वळून नि माङयाकडे पाठ करून अचानक निघूनही गेले!!
जाताना फक्त ‘ओके’ इतकं पुटपुटल्याचं मात्र मी ओझरतं ऐकलं. माङया खुर्चीतून उठून त्यांच्यामागे धावत जाऊन ‘ओके’ म्हणजे काय, कसलं काम आहे, त्याचं स्वरूप काय, कोणत्या कंपनीचं आहे आणि त्याबद्दल आपण परत कधी बोलणार, कधी भेटणार, मी तुमच्याकडे यायचंय, की तुम्हीच परत माङयाकडे येणार, कामाच्या डीटेल्स काय.. वगैरे प्रश्न त्यांना विचारण्याची संधीच त्यांनी मला दिली नाही. 
पॅसेजमधून झपझप पावलं टाकीत बाळासाहेब खालच्या मजल्यावर निघूनही गेले होते!
(पूर्वार्ध)
उत्तरार्ध पुढील अंकी.