शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
3
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
4
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
5
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
6
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
7
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
8
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
9
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
10
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
11
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
12
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
13
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
14
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
15
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
16
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
17
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
18
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
19
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
20
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा

बार्सिलोनाच्या पेस्टर आजी

By admin | Published: May 08, 2016 1:02 AM

मारिया लुईसा पेस्टर. या 85 वर्षाच्या स्पॅनिश आजीबाई. बार्सिलोनाच्या नावास नावाच्या उपनगरातल्या छोटय़ा घरात एकटय़ाच राहातात.

- अपर्णा वेलणकर
 
स्मार्ट सिटी म्हणजे फक्त रूक्ष तंत्रज्ञान.
माणसामाणसामधले संबंध संपवणारं,
माणसाला माणसाची गरजच 
उरू न देणारं आणि सगळा प्रत्यक्ष संवाद यंत्रंकडे सोपवणारं 
एक कोरडं उत्तर
- अशी टीका सातत्याने होते आहे.
या पाश्र्वभूमीवर स्पेनमधल्या  बार्सिलोना या शहराने केलेले 
काही प्रयोग मात्र वेगळे आहेत.
माणसामाणसातला संपलेला संवाद नव्याने सुरू करण्याचं काम  
स्मार्ट तंत्रज्ञानाकडे सोपवण्याचा 
प्रयत्न करणा:या बार्सिलोनाची सैर.
 
मारिया लुईसा पेस्टर. या 85 वर्षाच्या स्पॅनिश आजीबाई. बार्सिलोनाच्या नावास नावाच्या उपनगरातल्या छोटय़ा घरात एकटय़ाच राहातात. जोडीदार तीनेक वर्षापूर्वी निवर्तला. दोन मुलं. ती युरोपभरात पोटापाठी विखुरलेली. आजीबाई एकटय़ाच. 2क्11र्पयत त्यांचं बरं चाललं होतं. सरकार मदतीला होतं. समाजातल्या अतिज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीला सरकार कायद्याने जबाबदार. त्यामुळे त्यासाठीच्या योजनेअंतर्गत सरकारी खर्चाने त्यांच्या घरी आठवडय़ातून एकदा तासाभरासाठी एक मोलकरीण येई. घर साफ करणं, स्वयंपाक करून फ्रीजमध्ये भरून ठेवणं, सामान आणणं अशा सगळ्या गोष्टी ती करी. आजीबाईंना मोठी मदत होई.
2011 साली स्पेनवर आर्थिक अरिष्ट आलं आणि मध्यवर्ती सरकारचे खिसे एकदम आवळले गेले. ‘अवलंबित्व कायद्या’नुसार अतिज्येष्ठ, निवृत्त नागरिकांना दिल्या जाणा:या आर्थिक मदतीत मोठी कपात झाली आणि केंद्रीय सरकारने उर्वरित खर्चाची जबाबदारी शहर प्रशासनावरच टाकली. स्वाभाविकच अनेक योजना बंद पडल्या, विस्कळीत झाल्या.
त्याची झळ ज्येष्ठांना बसली. त्यात पेस्टर आजी होत्याच. मोलकरीण येईना. स्वत:च्या खर्चाने कुणाला मदतीला बोलावणं परवडेना. मुलं दूर. नातेवाईक, मित्र म्हणावे, तर तेही सत्तरीच्या पुढचे. पेस्टर आजींची पंचाईत झाली.
..पण त्यांचं नगर प्रशासन स्मार्ट!
तोवर जग बदलू घातलेल्या स्मार्ट तंत्रज्ञानात मोठी आघाडी घेतलेल्या बार्सिलोना शहर प्रशासनाने या प्रश्नावर स्मार्ट तोडगा काढायचा ठरवला आणि तातडीने उपाय शोधायला घेतले.
काही दिवसातच आधी अस्तित्वात असलेल्या जुन्या रचनेवर ‘स्मार्ट लेयर’ चढवून नवी व्यवस्था मार्गी लागली. 
आता पेस्टर आजींच्या गळ्यात आतमध्ये स्मार्ट सेन्सर लपवलेलं एक उभट गोलाकार उपकरण लटकवलेलं आहे. त्यावरची कळ दाबली, की कुणाशी काही न बोलावं लागताच पेस्टर आजींना काहीतरी अडचण आहे, हे दूर कुठेतरी बसलेल्या एका टीमला क्षणात कळतं. ऑटोमेटिक रिस्पॉन्स सिस्टीमशी जोडलेला त्यांचा फोन घरभर लावलेल्या अन्य सेन्सर्सशी जोडलेला आहे. घरातल्या हॉटप्लेटवर काहीतरी ठेवून पेस्टर आजी समजा विसरून गेल्या, आणि तो पदार्थ-भांडं जळू लागलं, तर घरातला स्मोक डिटेक्टर आपलं काम सुरू करतो, परस्पर कॉल सेंटरला कळवतो, की या घरात काहीतरी गडबड आहे.. मग त्या सेंटरमधले लोक आजींना फोन करतात, की आजी, घरात काहीतरी जळतंय का तुमच्या.. 
समजा, विशिष्ट वेळार्पयत आजींनी फोन उचलला नाही, तर एक इमजर्न्सी रिस्पॉन्स टीम त्यांच्याजवळ आधीच देऊन ठेवलेली जास्तीची किल्ली घेऊन थेट आजींच्या घरात धडकते.
समजा, पेस्टर आजी बाथरूममध्ये पडल्या, तापाने फणफणल्या, अस्वस्थ झाल्या तर गळ्यात लटकवलेलं बटण दाबून मदत मागू शकतात.
हे झालं इमजर्न्सीचं!
पण असं काहीही नसतानादेखील बार्सिलोना शहर प्रशासनाने उभारलेल्या सेंटरमधले लोक दर चाराठ दिवसांनी पेस्टर आजींना फोन करतात. ख्यालीखुशाली विचारतात. डॉक्टरांच्या अपॉईंटमेंटपासून औषधं वेळेत घेईर्पयत कसकसल्या आठवणी करून देतात. शहरात एखादी साथ आली, तर आजींना सावध करतात. स्पेनमध्ये अचानक तपमान वाढून उष्माघाताचे प्रकार वारंवार घडतात. असं काही होणार असलं तर आजींना आधीच कळवलेलं असतं, की हवा बदलते आहे, अशी अशी काळजी घ्या. 
पेस्टर आजी राहातात, त्या परिसरात मनोरंजनाचे कार्यक्रम असतील तर त्याहीबद्दल आजींना कळवलं जातं.. त्यांच्या मित्रमैत्रिणींनी मिळून त्या कार्यक्रमाला जायचं ठरवलं तर कमीत कमी खर्चात त्यांच्या नेण्या-आणण्याची व्यवस्थाही केली जाते. मुख्य म्हणजे, एकटय़ाच राहाणा:या पेस्टर आजींना कधी उदास, एकाकी वाटलं, की त्यांच्याशी बोलायला ‘पलीकडे’ कुणीतरी असतं. 
काही बरंवाईट झालं, आणिबाणी आली तर आजीच्या मुलांचे-नातेवाइकांचे पत्ते/फोन नंबर्स त्या ‘पलीकडच्या’ मदतनिसाकडे असतात.
- पेस्टर आजी आता पुष्कळच खुश आहेत. अलीकडेच एका वृत्तपत्रशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘पूर्वी सरकारच्या खर्चाने घरी येणारी मदतनीस आठवडय़ातून एकदाच तासा-दोन तासासाठी येई. आता माणूस नाही येत कुणी; पण चोवीस तास कुणीतरी असतं माङयासाठी. सतत फोनवरून माङयाशी बोलणा:या या तरुण मुला-मुलींचा फार आधार वाटतो मला. त्यांनी माङया घरात सगळीकडे कसकसली यंत्रं लावून ठेवली आहेत. त्यातलं काहीही मला वापरता येत नाही. पण जरूर पडेल तेव्हा मला फक्त एक बटण दाबायचं असतं.. तेवढं करते मी!’
पेस्टर आजींना एकच शंका आहे. त्या म्हणतात, ‘रोजच्या औषधांशिवाय दर दिवसाआड मला एक वेगळी गोळी घ्यावी लागते. ती घेतली का, अशी आठवण करून द्यायला एक फोन येतो, पण त्या मुलीचा आवाज काहीतरी वेगळाच वाटतो. ती मुलगी दर दिवसाआड नेमक्या त्याच वेळी, तेच, तेवढंच, त्याच शब्दात कशी काय बोलते?’
- आपल्याशी बोलणारी ती मुलगी कुणी जिवंत माणूस नसून मशीनवर रेकॉर्ड केलेला तो एक आवाज आहे, हे आजींच्या समजुतीपलीकडचं आहे. पण त्याने असा काय फरक पडतो?
काही वर्षापूर्वी ही योजना बार्सिलोना शहराने कार्यान्वित केली तेव्हा, एक टीम पेस्टर आजींच्या घरी आली. त्यांच्याजवळ जवळपास दोनेकशे प्रश्नांचा एक कागद होता. आजींचे नातेवाईक कुठे असतात, अडचणीच्या वेळी कोणाला आधी सांगायचं, त्यांच्या शेजारी-पाजारी राहाणारे मित्र, त्यांचे फोन नंबर्स, आजींची तब्येत, औषधपाणी, पथ्यं इथपासून त्यांच्या आवडीची गाणी, सिनेमे असं काय काय त्यांनी जमवलं आणि आजींची पर्सनल प्रोफाईल त्यांच्या सिस्टीममध्ये साठवली.
आता दर सहा महिन्यांनी कुणीतरी येतं. काही अधिकचे तपशील आहेत का, नवी औषधं, नवी दुखणी-खुपणी बघायला! तसंही आजी त्यांच्या डॉक्टरकडे गेल्या, की तिथलं नवं रेकॉर्ड आपोआप ‘सिस्टीम’मध्ये अपडेट होतंच!
- आणि पेस्टर आजी एकटय़ाच नाहीत. बार्सिलोना शहरात राहाणा:या, सत्तरी ओलांडलेल्या साठ हजारांहून जास्त एकेकटय़ा वृद्धांशी ‘ती’ मुलगी बोलत असते. त्यांच्या गळ्यात अडकवलेल्या उपकरणाची कळ दाबताच मदतीचा फोन येत असतो. फोन उचलला गेला नाही तर अध्र्या तासाच्या आत प्रथमोपचाराच्या पेटीसह कुणीतरी दाराशी धडकतं. आणिबाणीच्या प्रसंगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यापासून ऐंशी-नव्वदाव्या वाढदिवशी शुभेच्छांचा फोन करण्यार्पयत हरेक एकेकटय़ा टप्प्यावर वृद्ध नागरिकांची सोबत करणा:या या स्मार्ट योजनेचं नाव आहे :
टेलिकेअर प्लस ! - आणि त्यामागे आहे नियोजनपूर्वक विणलेलं एक सुसूत्र जाळं!  त्याबद्दल पुढच्या लेखात! आणि हो, बार्सिलोनाच्या  ‘स्मार्ट’ प्रवासाची कहाणीही!
 
 
1क् सेकंदात फोनला उत्तर
3क् मिनिटात मदत!
 
 बार्सिलोना शहरातली 
20% लोकसंख्या 65 वर्षाहून अधिक वयाची. हेच प्रमाण 2040 र्पयत 25% वर जाण्याचं अनुमान
 शहरातले 5.20% नागरिक 85 हून अधिक वयाचे
 जवळपास 65,000 
ज्येष्ठ-अतिज्येष्ठ नागरिक टेलिकेअर प्लस सेवेचा लाभ घेतात.
कॉल सेंटरमध्ये आलेला फोन उचलला जाण्यासाठी लागणारा सरासरी वेळ - 10 सेकंद
 तातडीच्या प्रसंगी प्रत्यक्ष मदतीला धावणारी 
11 मोबाइल युनिट्स
 प्रत्यक्ष मदतीसाठी टीम पोचण्यासाठी लागणारा सरासरी वेळ - 30 मिनिटे
 
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com