शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

एकांडय़ा शिलेदारांची लढाई.

By admin | Published: September 26, 2015 2:22 PM

महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची अवस्था पाहून त्यावर मनापासून प्रेम करणारे मावळे अस्वस्थ झाले. ते पुन्हा सज्ज झाले, ‘द:याखो:यांतल्या’ मावळ्यांना त्यांनी साद घातली. गडकिल्ले संवर्धनाचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावर उचलण्याचा संकल्प त्यांनी सोडला आणि विस्मृतीतल्या गडांना पुन्हा जाग आली.

-एकहाती झुंज देताना गडकिल्ल्यांच्या तटबुरुजांवर पुन्हा उभे राहिले ‘सशस्त्र’ मावळे! 
 
- मंगेश निरवणे
 
महाराष्ट्रातील बेलाग, बुलंद आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेले दुर्ग म्हणजे इथलं ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संचित. पण हे सारेच दुर्गम गडकिल्ले आजवर बहुश: दुर्लक्षितच राहिले. 
केवळ राज्य करण्याच्या मनीषेने इथे आलेल्या इंग्रजांना, परकीयांना आणि आक्रमकांना या संचिताकडे, या ‘महाराष्ट्र देशाकडे’ ममत्व भावनेनं पाहण्याचं काही कारणच नव्हतं; पण आपल्या अस्मितांचा अभिमान नसलेल्या, दूरदृष्टीचा अभाव असलेल्या स्वकीयांनीही दुर्लक्षाचं हेच नातं आणखी जोपासलं आणि गडकिल्ल्यांची ही स्मृती आणखीच विस्मृतीत जाऊ लागली.
शिवाजीराजांनी ज्या गडकिल्ल्यांच्या साथीनं हे ‘राज्य’ उभं केलं आणि या ‘देशावर’ राज्य करू पाहणा:या विरोधकांना नामोहरम केलं, त्याच किल्ल्यांना जराजर्जर अवस्थेत पाहण्याचं दुर्भाग्य नंतर शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी मावळ्यांवर आलं. 
त्यातलेच काही मावळे पुन्हा सज्ज झाले, महाराष्ट्राच्या ‘द:याखो:यांतल्या’ मावळ्यांना त्यांनी साद घातली आणि गडकिल्ले संवर्धनाचं शिवधनुष्य जमेल तेवढं आपल्या खांद्यावर उचलण्याचा संकल्प त्यांनी सोडला आणि सुरू झाली एकांडय़ा शिलेदारांची लढाई. त्याला आता मूर्त रूप येतं आहे.
दुर्गसंवर्धन कार्य अनेक वर्षापासून चालू आहे. किल्ले राजमाचीवरील पाण्याचे टाके असेल, राजगडावरील रेलिंगचे काम असेल, प्रचितगडावरील लोखंडी पूल, चावंडगडाचे जुने रे¨लग, पुरंदरला माजलेली झुडपे काढणो अशी अनेक कामे अगोदर झालीच आहेत. अलीकडच्या काळात मात्र दुर्गसंवर्धनासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. दुर्गसंवर्धन चळवळ उभी राहिली. 
दुर्गसंवर्धनात रायरेश्वर प्रतिष्ठानने अत्यंत मोलाची भर घातली आहे. विशेष म्हणजे, या संस्थेमुळेच दुर्गसंवर्धनाचा पाया घातला गेला असे म्हणता येऊ शकेल.
तिकडे ठाणो जिल्ह्यामध्येसुद्धा किल्ले वसई मोहिमेच्या माध्यमातून वसई किल्ल्याचे संवर्धन कार्य सुरू झाले. वास्तूवर असलेली झुडपे काढणो, वाटा मोकळ्या करणो, किल्ल्याशी संबंधित इतिहास पुस्तकरूपाने प्रसिद्ध करणो, गडदेवतेचा उत्सव साजरा करणो अशा विविध पातळ्यांवर कार्य करण्यात संस्था यशस्वी झाली. अनेक वर्षाच्या सातत्यपूर्ण कामगिरीने परिसरात मोठय़ा प्रमाणात जागरूकता झाली आणि संस्थेला पाठबळ मिळून ठाणो जिल्ह्यातील केळवा, माहीम, भवानीगड, टकमकगड, अर्नाळा अशा अनेक दुर्गावर कामे सुरू झाली. हिरा डोंगरी या दुर्गाचा शोध लागला तसेच काही अपरिचित दुर्ग समोर आले. भवानीगडावरील रणमंडळ झुडपे आणि मलब्याने लुप्त झाले होते ते मोकळे करण्यात आले. माहीम किल्ल्याचा तर कायापालटच झाला. मातीच्या मलब्याखाली गाडला गेलेला किल्ला मोकळा झाला. अनेक वास्तू, अवशेष मोकळे झाले. एरवी नको त्या कारणासाठी वापरण्यात येणारी जागा आज किल्ला म्हणून पुढे आली. 
तिकोणा किल्ल्यावर जोमाने काम सुरू झाले. श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणो यांच्या माध्यमातून सर्व तट बुरुजांची स्वच्छता करण्यात आली. सर्व झुडपे आधुनिक यंत्रणा वापरून छाटण्यात आली. पाण्याची टाकी गाळ काढून स्वच्छ केली गेली. गडावर आवश्यक तेथे वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेच्या उत्साही सदस्यांच्या साथीने रोहिडा, राजगड, बहादूरगड अशा ठिकाणी कामे चालू आहेत. राजगडच्या पाली मार्गाच्या पाय:या मोकळ्या करणो, संजीवनी माचीची वाट सुस्थितीत आणणो अशी उल्लेखनीय कामगिरी संस्थेने केली आहे. 
शिवछत्रपत्रींच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेतील महत्त्वाचा किल्ला म्हणजे रांगणा. नावाप्रमाणोच राकट आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या या दुर्गाचे संवर्धन तितक्याच ताकदीच्या संस्थेने घेतले ती म्हणजे निसर्गवेध परिवार संस्था, कोल्हापूर. गडावरील झुडपे छाटणो, वाटा मोकळ्या करणो, मंदिर वास्तू नीटनेटक्या करणो, मंदिरासमोरील जुनी दीपमाळ दुरुस्त करण्याचे आव्हान पूर्ण करणो, गडावरील सर्व वास्तूंना फलक लावणो अशी कामगिरी करत सर्व ऐतिहासिक संदर्भ अभ्यासून पुस्तकनिर्मितीचे मोठे कार्य केले आहे. 
सवाष्णीच्या घाटावर लक्ष ठेवून असलेल्या घनगडाला न्याय देत आहे शिवाजी ट्रेल, पुणो ही संस्था. अत्यंत नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत गडावरील स्वच्छता, वाटा दुरुस्ती, पाणी टाकी स्वच्छ करणो, गडावर विविध फलक लावणो, आवश्यक तेथे जुन्या बांधकामाला धक्का न लावता तटाचे बांधकाम, पायथ्याच्या गावासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय शिबिर असे भरीव कार्य चालू आहे. गडाला जाण्यासाठीच्या अवघड वाटेवर खडकात कोरलेल्या पाय:या आणि दोर या साहाय्याने वीस ते पंचवीस फूट उंचीचा मार्ग पार करावा लागायचा. त्यामुळे गडाला भेटी देणारे बहुतेक जण नाराज होऊन 
 
परत फिरायचे. याचा विचार करून संस्थेच्या पुढाकाराने आणि कोहिनूर ट्रेकर्स व शिवदुर्ग मित्र, लोणावळा यांच्या सहकार्याने बावीस फुटी लोखंडी शिडी बसविण्यात आली. घनगडाशिवाय शिवाजी ट्रेलच्या वतीने तिकोणा किल्ल्यावरसुद्धा धोकादायक ठिकाणी रे¨लग, गडावर भगवा ङोंडा, बालेकिल्ला मार्गाच्या पूर्वीच्याच दिमाखात नव्याने केलेल्या पाय:या असे काम झाले. चावंड संवर्धन समितीच्या वतीने चावंडगडासाठी व नारायणगड संवर्धन समिती मार्फत नारायणगडाचे संवर्धन सुरू आहे.  
वैशिष्टय़पूर्ण अभेद्य दरवाजाचे बांधकाम, पायरी मार्ग उत्तम स्थितीमध्ये असलेल्या लोहगडचे संवर्धन कार्य तळेगाव येथील राजे शिवछत्रपती मंच (लोहगड विसापूर विकास मंच) यांच्या वतीने होत आहे. गडावर असलेले भग्न मंदिर दुरुस्तीचे जिकिरीचे काम सर्वाच्या सहकार्यातून पार पाडले. गडावर शिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा होतो. पायथ्याला शिवस्मारक उभारणी झाल्यामुळे दरवर्षी उत्सवादरम्यान येथे शिवशाही अवतरल्याचा आनंद सर्वाना उपभोगता येतो. संस्थेने केलेल्या पाठपुराव्यातून केंद्रीय पुरातत्व विभागाचे कामसुद्धा मोठय़ा प्रामणात झाले आहे. गडाला पूर्वीच्या धाटणीचा दरवाजा बसवण्याचे मोठे काम विभागाने केले आहे. त्यामुळे अनेक गैरप्रकारांना अटकाव घालता आला. अलीकडे संस्थेच्या वतीने विविध साहसी खेळांचे आयोजन करून लोहगड विसापूर जागता ठेवण्यात संस्था यशस्वी झाली आहे. 
लष्करीदृष्टय़ा महत्त्वपूर्ण असलेली शिवछत्रपतींची उंबर¨खड येथील लढाई झालेली जागा निश्चित करून तेथे भव्यदिव्य प्रेरणादायी स्मारक उभे केलेली संस्था शिवदुर्ग मित्र, लोणावळा उंबर¨खड संग्रामाचे स्मारक उभे करून दुर्गसंवर्धनातसुद्धा महत्त्वाचे कार्य संस्थेकडून चालू आहे. घनगडसाठी सहयोग, तिकोणा किल्ल्याचे रोपवेचे काम, राजगडावरील सुवेळा माचीजवळील मारुती मूर्ती दरीतून काढण्याचे काम आणि आता राजमाचीसाठी संवर्धन कार्य असा संस्थेचा प्रवास चालू आहे.
घाटमाथ्यावरीलच मानगड व सूरगड या गडांसाठी दुर्गवीर प्रतिष्ठान सरसावले आहे. स्वच्छता अभियानासोबतच मानगडाचे दरवाजाचे अवशेष, प्रचंड अवजड चिरे मोकळे करून इतिहासाला उजाळा दिला आहे. गडावर महत्त्वाच्या वास्तूसाठी फलक लावण्यात आले आहेत. गडावर घडलेला इतिहास फलकाच्या माध्यमातून साकारला आहे. मानगडाच्या पायथ्याशी शिवकालीन वीरगळ जुन्या मूर्ती वगैरे एकत्र करून पायथ्यालाच प्रदर्शनीय मांडणी करण्याचा संस्थेचा मानस आहे. 
या व्रतामध्ये योगदान देत असलेली गडकिल्ले सेवा समिती अनेक वर्षापासून कार्यरत आहे.
सुरुवातीला मल्हारगडावर (सोनोरी किल्ला) काम सुरू झाले. मार्गातील झुडपे, रान वनस्पती छाटून मार्ग मोकळे केले गेले. त्यानंतर अनुकूल अशी झाडे लावून वृक्षारोपणही झाले. पुढे घनगडला असलेल्या अवघड चढणीवर खडकात पाय:या तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य समितीमार्फत केले गेले. त्यानंतर बुलंद अशा पुरंदरावर मोर्चा वळवून सांध किल्ल्यावर झाडाझुडपांमुळे बंद झालेले मार्ग मोकळे केले. तटबंदी आणि वास्तूवर निवडुंगाचे रान माजले होते ते पूर्ण मोकळे केले. केदारेश्वर मंदिराकडे जाणा:या मार्गाची डागडुजी केली. वैशिष्टय़पूर्ण बांधकामांच्या नोंदी केल्या. घनगड, कोरीगड, तुंग, तिकोणा, राजगड, रोहिडा, जंजिरा, मल्हारगड, नगरचा भुईकोट अशा दुर्गावर मोहिमा राबविण्याचे मोलाचे कार्य संस्थेने केले आहे. 
दुर्गसखा प्रतिष्ठान, डोंबिवलीच्या वतीनेसुद्धा संवर्धन कार्यात मोलाची भर पडत आहे. अनेक स्वच्छता मोहिमांनी सुरुवात करत मानगडावर एक महत्त्वपूर्ण कामगिरी संस्थेने केली आहे. गडांवर असलेल्या वास्तूंप्रमाणोच वस्तू, शे, मूर्ती, समाधी हे सर्व जतन व संवर्धन करणो तितकेच महत्त्वाचे असते. त्यातीलच अत्यंत अवघड प्रकार म्हणजे गडावरून खाली पडलेली तोफ. अवजड असे हे शस्त्र पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी बसविण्याचे अशक्य कार्य दुर्गसखा प्रतिष्ठानने (डोंबिवली) केले आहे.
ट्रेकक्षितिज, डोंबिवली या संस्थेच्या वतीने सुधागडावर स्वच्छता मोहिमा, वाटा सफाई, मुख्य दरवाजा मोकळा करणो, आधुनिक उपकरणो वापरून पूर्ण दरवाजावरील झुडपे काढणो, गडावरील वीरगळ स्वच्छ करणो अशी विविध कामे पार पाडली आहेत. संवर्धन कार्य करत असताना आर्थिक गणित सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळवण्यात संस्था यशस्वी झाली आहे.
दुर्गसंवर्धन चळवळ व्यापक करण्यात सह्याद्री प्रतिष्ठान, ¨पपरी-चिंचवड यांचीसुद्धा मोलाची कामगिरी आहे. संस्थेच्या वतीने अनेक दुर्गावर सातत्यपूर्ण स्वच्छता मोहिमा आजवर झाल्या आहेत. संस्थेच्या महाराष्ट्रभर अनेक शाखा आहेत. दुर्गसंवर्धन चळवळीसाठी जनआंदोलन उभे करण्यात संस्थेने मोलाची कामगिरी बजावली आहे. संस्थेच्या वतीने जनहित याचिका दाखल करून या विषयाला वाचा फोडण्याचा महत्त्वाचा प्रयत्न करण्यात आला. अलीकडे संस्थेच्या वतीने राज्यपातळीवर कार्य सुरू आहे. अनेक उपशाखांचे जाळे निर्माण केल्याने संवर्धन कार्याला चालना मिळते आहे.
‘दुर्ग फाउंडेशन’ या संस्थेच्या वतीने दुर्गम दुर्ग स्वामी राजदुर्ग राजगडाच्या पायथ्याला पाली येथे एक संस्कार केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवरायांनी वसविलेले गाव शिवापट्टण या नावाने हे संस्कार केंद्र असणार आहे, ज्यायोगे राजगडाचा इतिहास, प्रकाशचित्र प्रदर्शन, विविध साहसी खेळांना चालना देण्याचा संकल्प आहे. त्यातूनच राजगड संवर्धनाला गतीही मिळू शकेल.
याशिवाय मल्हारगडावर काम करणारी आय.टी. क्षेत्रतील विन्सिज आयटी सोल्युशन्स ही कंपनी, राजगडावर विविध मोहिमा राबविणारे दुर्गसंवर्धन प्रतिष्ठान (पुणो), राजगडाच्या संवर्धनात सहभाग असलेली अभिनव निर्माण संस्था, शिवदुर्ग मित्र (लोणावळा), सिंहगडाचे पावित्र्यरक्षण आणि संवर्धनकार्य करणारे राजेशिवराय प्रतिष्ठान (पुणो), चाकणच्या किल्ल्याची काळजी घेणारी संग्राम दुर्गसंवर्धन समिती, किल्ले पद्मादुर्गसाठी झटणारे कोकण कडा मित्रमंडळ, सटाणा तालुक्यातील किल्ले मुल्हेर येथे कार्यरत मालेगावचा शिवशंभु दुर्गसंवर्धक संघ, नाशिक विभागात गेली तीन वर्षे कार्यरत असलेली ‘शिवकार्य गडकोट मोहीम’, केवळ गड भटकंतीत न अडकता गडाच्या सर्वागीण अभ्यासासाठी मोहिमा आखणारी मुंबई येथील ‘भ्रमर’, फलटणजवळील शिवस्पर्शित संतोषगडावर निष्ठेने कार्य करणारी शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन संस्था (पुणो), नवोदित सह्याद्री गिर्यारोहक संघ (पुणो). 
किती नावं घ्यावीत? सगळ्यांचा केवळ उल्लेख करणंही केवळ अशक्य, पण प्रत्येकजण आपापल्या परीने हा शिवयज्ञ पेलण्याचा प्रयत्न करतंय. अर्थात यातल्या अनेक संस्था फक्त त्या त्या किल्ल्यांपुरते आणि केवळ तेवढय़ापुरत्याच कार्यरत नाहीत. स्वच्छता मोहिमांबरोबरच गडांचे संवर्धन आणि इतिहास जपण्याचे मोलाचे कार्यही त्या करताहेत. 
 या सर्व संस्थांना प्रोत्साहन, सर्वतोपरी मदत या हेतूने पालक संस्था म्हणून अनेक संस्थांचे प्रतिनिधी असलेली ‘दुर्ग संवर्धक संघ’ ही संस्थासुद्धा गेली पाच वर्षे कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने आजवर तीन दुगसंवर्धक संमेलने पार पडली आहेत. 
या संमेलनांच्या माध्यमातून संवर्धकांसाठी कार्यशाळा घेतल्या गेल्या. पुरातत्व विभाग, वन विभाग, जैवविविधता विभाग यांतील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं, शास्त्रीय पद्धतीने दुर्गसंवर्धन कसे करावे याबाबत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले गेले. संस्थेच्या वतीने अनेक संस्थांना मार्गदर्शन व मदत चालू आहे. संवर्धन चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट कार्य करणा:या संस्थेस पुरस्कार दिला जातो. 
संवर्धन कार्य करणा:या संस्थांचे कार्य संकलित व्हावे यासाठी मागील वर्षी संस्थेच्या वतीने ‘दुर्गसंवर्धनाची पहाट’ ही स्मरणिका काढण्यात आली. 
दुर्गसंवर्धन चळवळीला प्रोत्साहन देण्यात मोलाची कामगिरी बजावणारा आणखी एक उपक्रम म्हणजे दुर्ग साहित्य संमेलन. या संमेलनाच्या माध्यमातून या क्षेत्रतील अनेक लोक एकत्र आले. दुर्गसंवर्धनासंबंधात त्यातून मोलाची चर्चा झाली. उपाययोजनांचं आदानप्रदान, मार्गदर्शन मिळालं. त्यातून ही चळवळ आणखी पुढे गेली. 
एकीकडे स्वयंसेवी संस्थांचे झपाटल्यागत काम सुरू असताना अलीकडे शासनाकडूनसुद्धा हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य पुरातत्व विभागाकडून सिंहगडावरील कामाला वेग आला आहे. राजगडावरील कामामध्ये पद्मावती माचीवरील सदरेचे काम चांगल्या प्रकारे होत आहे. केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत शिवनेरीगडाचे काम उल्लेखनीय, आदर्श पद्धतीने चालू आहे. एकंदरीत शासकीय पातळीवर हा वेग संथच असला, तरी ‘प्रगती’ होते आहे हे महत्त्वाचे. 
स्वयंसेवी संस्था आणि शासन असा समन्वय साधून शास्त्रशुद्ध दुर्गसंवर्धन कार्य सुरू झाल्यास दुर्गाचे भवितव्य आणि राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही.
या चळवळीमध्ये स्वयंप्रेरणोने आणि स्वबळावर कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांना शासनाने पाठबळ दिल्यास दुर्गसंवर्धनाचा हा प्रवास निश्चित दिशेला योग्य कालावधीमध्ये जाईल यात शंका नाही. 
ऐतिहासिकदृष्टय़ा संशोधनास आजही प्रचंड वाव आहे. त्यातून आपली संस्कृती, परंपरा आणि पूर्वजांचा इतिहास उलगडणार आहे. 
एक दुर्गसंवर्धक या नात्याने दुर्गसंवर्धन कार्याचा हा प्रवास करताना आम्ही माघार घेणार नाही आणि हरणारही नाही, परंतु पुरातत्व, वन, पर्यटन, जैवविविधता मंडळ हे शासनाचे सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, सर्वसामान्य नागरिक. या सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास अवघड वाटणारे हे शिवधनुष्य आपण लिलया पेलू शकू व हा शिवयज्ञ निर्विघ्न पार पडेल.
 
दुर्गसंवर्धनाचा पाया
दुर्गसंवर्धनाचा मागोवा घेताना प्रथम समोर येतो तो रायरेश्वर. रायरेश्वर प्रतिष्ठान (भोर) या संस्थेमार्फत या दुर्गाचे काम सुरू झाले. मंदिर डागडुजी, रस्ते दुरुस्ती आणि अवघड पायरी मार्गावर लोखंडी भक्कम रेलिंग लोकसहभाग व शासकीय मदत घेऊन कार्य करण्यात संस्था यशस्वी झाली. दुर्गसंवर्धन कार्यामध्ये भरीव कामगिरीने सुरुवात ख:या अर्थाने येथूनच झाली. पुढे सामूहिक पद्धतीने कार्य होण्यासाठी आवाहन करून ‘किल्ले संवर्धन समिती’ तयार करून रोहिडा, राजगड, तिकोणा अशा किल्ल्यांचा आराखडा तयार करण्यात आला. रोहिडा किल्ल्यावरील मंदिराचे कामसुद्धा 
त्याचवेळी सुरू झाले. 
(लेखक ‘दुर्गसंवर्धक संघ, महाराष्ट्र’चे विश्वस्त व 
‘दुर्ग फाउण्डेशन’चे अध्यक्ष आहेत.)
mangesh.nirwane@gmail.com