शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

बिअर...एक हेल्थ टॉनिक? कसं काय...वाचा इतिहासतील महत्वाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 5:47 AM

सिएटलमध्ये १८७८ मध्ये रेनियर बिअरचे उत्पादन व्हायला सुरुवात झाली होती.

सिएटलमध्ये १८७८ मध्ये रेनियर बिअरचे उत्पादन व्हायला सुरुवात झाली होती.  अँड्र्यू हेमरिच ह्या जर्मनीहून अमेरिकेत आलेल्या व्यावसायिकाने आपल्या बिअरलादेखील  नाव दिले ‘रेनियर’! गावाजवळच्या माउंट रेनियरवरून वाहत येणाऱ्या नैसर्गिक झऱ्यांचे पाणी आपण बीअर करताना वापरतो, असा प्रचार तो करीत असे. पुढे त्याने सिएटल ब्रूइंग अँड माल्टिंग कंपनीची स्थापना केली.  अमेरिकेच्या पश्चिम भागात ह्या बिअरला खूप लोकप्रियता मिळाली. १९५४ मध्ये प्रतिष्ठित रेनियर कंपनीचे ‘R’ हे चिन्ह ब्रुअरीच्या वर लावले गेले. आजदेखील ती सिएटलची एक महत्त्वाची खूण मानली जाते. 

रेनियरने आपल्या  १९१२ सालच्या जाहिरातीत  चक्क दहा हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते.  बीअरमध्ये मका, साखर किंवा साखरेपासून बनवलेले इतर कोणतेही पदार्थ, मध, ग्लुकोज किंवा तत्सम कृत्रिम घटक वापरल्याचे सिद्ध करणाऱ्याला ते बक्षीस होते. 

त्याच वर्षीच्या दुसऱ्या एका जाहिरातीत रेनियरने  आपण किती   हजार डॉलर्स पगार म्हणून वाटतो, किती हजार डॉलर्सच्या वस्तूंची खरेदी करतो, सिएटलमध्ये किती हजार डॉलर्सचे उत्पन्न मिळवून देतो, असा सगळा छानछान तपशीलही दिला होता. 

आपल्याकडेही मद्यविक्रीमधून राज्याच्या तिजोरीत किती कोटींची भर घातली जाते हे सांगत मद्यविक्रीचे समर्थन केले जाते, तसाच हा प्रकार! ह्या जाहिराती समजण्यासारख्या आहेत असे एकवेळ म्हणता येईल. पण, ह्या कंपनीने १९०६ साली केलेली जाहिरात बघून आपण हतबुद्ध होतो. ह्या जाहिरातीत  वृद्ध गृहस्थ आणि  सातआठ वर्षांची लहान मुलगी दाखवली आहे. 

‘आबालवृद्धांना ही बिअर लाभदायक आहे!’ असा मथळा देत ह्या जाहिरातीत आपल्या आजोबांना “GESUNDHEIT  GRANDPA” म्हणजेच ‘टू द हेल्थ, ग्रँडपा’ अशा ‘शुभेच्छा’ देणारी नात दाखवली आहे. पुढच्या मजकुरात रेनियर बीअर पिण्याने  नवसंजीवनी कशी मिळते.. आणि ह्या टॉनिकची बरोबरी दुसरे कोणतेही औषध कसे करू शकत नाही याचे (खुमासदार) वर्णन वाचायला मिळते. आज आपल्याकडेच नाही, तर अगदी अमेरिकेतसुद्धा लहान मुलांना टार्गेट करणारी अशी जाहिरात करता येणार नाही; पण एकशेसोळा वर्षांपूर्वी ती सर्रास केली जात असे हे आश्चर्यच मानले पाहिजे.- दिलीप फडके, विपणन शास्त्राचे अभ्यासक,pdilip_nsk@yahoo.com