- चंद्रमोहन कुलकर्णी
मी खरंच दुस:या दिवशी गेलो, तर कॅप्टन रो यांच्या चेह:यावर तेच स्मितहास्य.
जुन्या काळातल्या टाइपरायटरवर टाइप केलेल्या मजकुराचे दोन लहान आकाराचे कागद ड्रॉवरमधून काढून त्यांनी माङया हाती दिले. मला एक दोन महत्त्वाच्या सूचना दिल्या. काही गोष्टी बजावून सांगितल्या.
मी थँक्यू म्हणालो, बाहेर पडलो.
सायकलवर टांग टाकून बंगल्यापासून थोडय़ा लांब अंतरावर पुढे जाऊन थांबून खाली उतरून, एखादा महत्त्वाचा दागिन्यासारखा ऐवज बाहेर काढून पहावा तसे ते कागद पाहिले.
एका महान कॉपीरायटरनं माङया विनंतीला मान देऊन केलेलं काम होतं ते. माङया दृष्टीनं एक मौल्यवान गोष्ट होती ती.
पुन्हा पुन्हा ते कागद मी हाताळत होतो, लिहिलेली कॉपी इंग्लिशमध्ये होती, तरी मी ती वाचण्याचा प्रयत्न करत होतो. कारण ती लिहिली होती प्रत्यक्ष कॅप्टन ‘रो’नं, माङयासाठी! एवढय़ा मोठय़ा प्रतिष्ठित, मोठय़ा वकूबाच्या माणसानं माङयासारख्या अनोळखी य:कश्चित मुलाला कॉपी लिहून द्यावी, तीही एक दिवसात, ह्या गोष्टीचं मला फार अप्रूप वाटत होतं. पुन्हा एकदा माङया मनाशीच त्यांचे मन:पूर्वक आभार मानून, धन्य होत, मी माङया पुढच्या आर्टवर्कच्या कामाला लागलो.
**
जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर हॉटेल मालकांनी ठरल्याप्रमाणो मला घरी बोलावून घेऊन अजिबात खळखळ न करता अडीचशे रुपये रोख दिले. माङया चित्रची, कामाच्या आर्टवर्कची, कॉपीमॅॅटरची आणि विशेषत: कोंबडय़ाच्या ग्राफिकची स्तुती केली!!
खूश होते.
त्या अडीचशे रुपयातनं मला ब्रोमाइड आणि टाइपसेटिंग वगैरेचा पस्तीसएक रुपये खर्च आला होता, तो द्यायचा होता. तो दिला आणि उरलेल्या रकमेतनं आता कॅप्टनसाहेबांचे कॉपीरायटिंगचे पैसे द्यायचे होते.
आता पुन्हा कॅप्टनसमोर जाऊन उभं राहून त्यांना कॉपीचे किती पैसे द्यायचे, असा प्रश्न विचारला तर ते उर्मटपणाचं वाटेल की काय अशी शंका मनात आली.
बरं, पैसे तर द्यायलाच हवेत. मोठा पेच पडला.
दुसरा मुद्दा होता, की ते किती पैसे मागतील?
मागतील की नाही? की आपण स्वत:हून द्यायचे? बरं, स्वत:हून द्यायचे, तर किती? आणि हे सगळं त्यांच्याशी बोलायचं कसं?
- एक ना दोन, हजार प्रश्नांनी मला भंडावून सोडलं. खरंतर कॉपी लिहून घेण्याच्या वेळीच व्यवहाराच्या गोष्टी मी कॅप्टनशी बोलायला हव्या होत्या. पण प्रचंड दडपणाखाली असल्यामुळे मी ते काही तेव्हा बोललो नव्हतो, आणि खरं म्हणजे ती गोष्ट तेव्हा बोलावी, हे माङया लक्षातही आलं नव्हतं. कॅप्टन ह्या नावाचा आणि व्यक्तीचा मला दराराच इतका वाटला होता, की त्यावेळी भीतीनं माझी गाळणच उडाली होती.
मोठा शूरपणा करून मी त्या वाघाच्या गुहेर्पयत पोहोचलो होतो, हे खरं. माझं काम त्यांनी चोख केलंही होतं. आता व्यवहार पूर्ण करण्याचं उरलेलं काम मी चोखपणो करणं आवश्यक होतं.
**
गेलोच पुन्हा बेधडक, जावं लागणारच होतं, बोलावंही लागणार होतं.
दारावर टकटक केली.
ूेी कल्ल
- असा प्रतिसाद आल्यावर आत गेलो. घर आता माहिती झालं होतं, म्हणून न बिचकता आत खोलीत गेलो, तर कुणीच दिसेना. बाकी माहोल तोच, तसाच, फक्त कॅप्टन जागेवर नव्हते. म्हणून पुन्हा बाहेरच्या खोलीत आलो, तर बाहेरच्या खोलीतल्या पलंगाच्या खालूनच बाहेर आले अचानक!
मी घाबरलोच.
मी म्हटलं, ‘‘ अरे,.. सर.. इथे हे असं काय?’’
तर मोठय़ानं हसत हसत म्हणाले, ‘‘डोण्ट वरी डोण्ट वरी, जरा झोपलो होतो.’’
झोपले होते, हे ठीक होतं, पण कॉटच्या खाली? मला काही उलगडा होईना. माङया चेह:यावर प्रश्नचिन्ह तसंच तरळत राहिलं असावं असं वाटून ते पुन्हा म्हणाले,
‘‘डोण्ट वरी, आय वॉज स्ली¨पग. कधी कधी मी पलंगाखाली झोपतो. मज्जा येते. तू झोपलायस का कधी?’’ मी नाही म्हटल्यावर म्हणाले, ‘‘झोपून बघ. मज्जा येते.’’ मग माङया पाठीवर हात ठेवून म्हणाले, ‘‘काय, कशी आली अॅड? चांगली होती ना प्लेसमेण्ट? मी पाहिली!’’ मला फार अचंबा वाटत होता या माणसाचा. कॉटखाली झोपतो काय, गोड हसून मला पण तसं करून मज्जा कशी येते ते बघ म्हणतो काय, एका दिवसात कॉपी काय लिहून देतो, वर ती अॅड पाहिल्याचं सांगतो.. सगळंच विलक्षण.
बोलता बोलता कॅप्टन त्यांच्या त्या गोल टेबलापाशी खुर्चीवर जाऊन बसले, मलाही हातानं बसण्यासाठी खूण केली.
म्हणाले, ‘‘बोला!’’
आता मी जरा सावरलो होतो. पैसे द्यायला आपण आलो आहोत हे, कॉटखालून आलेल्या घटनेच्या धक्क्यामुळे मी काही काळ विसरलो होतो, तो पुन्हा भानावर आलो. आता का कुणास ठाऊक, संकोचही जरा कमी झाला होता. मी म्हणालो, ‘‘हो सर, चांगली आली अॅड. त्यांनापण आवडली. कॉपीचंही त्यांनी कौतुक केलं. सर, तुमची फी किती?’’ मी अनमानधपक्या माङया मनातला प्रश्न विचारूनच टाकला घाईघाईत.
गोड हसले.
मोठे पाणीदार डोळे, मोठे पांढरे आइनस्टाइनसारखे केस, लांब सरळ नाक, नाजूक जिवणी आणि तेच ते स्मितहास्य. माणूस मोठा मजेदार होता. मला म्हणाले,
‘‘किती देणार?’’
‘‘तुम्ही सांगाल तेवढे.’’
बोललो खरा, पण अडीचशेच्या पुढची फिगर निघाली तर? म्हणून घाईघाईत पुढं जोडून घेतलं, ‘‘मला सगळे मिळून अडीचशे मिळालेत, पस्तीस रुपये टाइपसेटिंगला वगैरे लागलेत.’’
खर्च वजा जाता अगदी उरलेले सगळेच्या सगळे पैसे त्यांनी मागितले, तरी ते द्यायचे, असं मी मनाशी ठरवलं होतं, आधीच! माङया दृष्टीनं प्रतिष्ठा महत्त्वाची होती. त्यांची आणि माझीसुद्धा.
पुढे सरकून माङया डोक्यावर हात फिरवून म्हणाले,
‘‘माय चाइल्ड, इतक्या छोटय़ा कामाचे तुङयासारख्या छोटय़ा मुलाकडून मी पैसे घेत नसतो रे. पण तू मला आवडलास. असं इतकं थेट माङयाकडे येऊन कुणी काही मागितलं नाही आत्तार्पयत इतक्या लहान मुलानं. तुला व्यवहार माहिती असावा म्हणून, आणि व्यवहाराचा मान राखायला हवा म्हणून तुङयाकडून मी तीस रुपये घेईन, ओके?’’
किती का होईना, कॅप्टननं पैसे घ्यायची तयारी दाखवली, आणि तेही इतक्या लगेच; आणि इतक्या मोकळेपणानं; याबद्दलच मला ग्रेट वाटत होतं. टाइपसेटिंगच्या खर्चापेक्षाही क्रिएटिव्ह कामाची फी कमी होती. व्यवहाराचा मान रहावा म्हणूनच केवळ तीस रुपये ही नाममात्र रक्कम कॅप्टननं मला सांगितली होती, ही गोष्ट माङया दृष्टीनं लाखमोलाची होती.
मी पैसे दिले. व्यवहार पूर्ण झाला.
**
कॅप्टननं लिहिलेली कॉपी आज मी पूर्णपणो विसरून गेलोय, पण एक नक्की आठवतंय, ज्याचं स्पे¨लगही अवघड आणि उच्चरायला तर जाम अवघड असा एक शब्द त्यात होता. तो म्हणजे ए7क्4्र2्र3ी!!
आजही त्याचा उच्चर मला नीट करता येत नाही, पण स्पे¨लग पाठ आहे. कारण कॉपी हातात घेतल्यावर त्या शब्दाच्या ‘स्पे¨लगकडे नीट लक्ष दे, चुकवू नकोस’, असं कॅप्टननं मला तीनतीनदा बजावलं होतं, हे चांगलं आठवतंय आणि म्हणून तो शब्द लक्षात तर राहिलाच आहे कायमचा; पण त्याबरोबरच कॅप्टन या शब्दाबरोबर आणि व्यक्तीबरोबर त्या शब्दाचं एक प्रकारचं असोसिएशनही माङया मनात तयार झालंय.
Exquisite!!
(उत्तरार्ध)
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)