शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
3
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; आलिशान कारच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
5
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतील २८ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
6
New Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
7
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
8
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
9
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
10
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
11
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
13
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
14
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
15
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
16
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
17
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
18
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
19
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
20
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व

ग्रामविकासासाठी ‘भगीरथ’ प्रयत्न

By admin | Published: August 26, 2016 5:00 PM

वेंगुर्ल्याजवळील झाराप हे सुंदर गाव. त्या गावात वसलंय ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’. गावातील प्रत्येक प्रकारच्या गरजेवर दीर्घकालीन उपाय शोधत जायचं आणि गावाच्या विकासाचं स्वप्न प्रत्यक्षात आणायचं, अशा जिद्दीने इथे काम चालतं. त्या कामाची ही एक ओळख..

 

- शुभदा चौकर

वेंगुर्ल्याजवळील झाराप हे सुंदर गाव. त्या गावात वसलंय ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’.गावातील प्रत्येक प्रकारच्या गरजेवर दीर्घकालीन उपाय शोधत जायचं आणि गावाच्या विकासाचं स्वप्नप्रत्यक्षात आणायचं, अशा जिद्दीने इथे काम चालतं. त्या कामाची ही एक ओळख..गीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’च्या वास्तूत शिरल्यावरच प्रसन्नतेची झुळूक आणि उत्साहाची सळसळ जाणवली. त्या सुबक, देखण्या इमारतीत त्यावेळी २५-२६ मेंढपाळ जमले होते. त्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण करायला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची टीम आली होती. ‘भगीरथ’चा संस्थापक डॉ. प्रसाद देवधर म्हणाला, ‘प्रशिक्षण हेच यांचे तारण. आम्ही यांच्यासाठी पद्धतशीर प्रशिक्षण ठेवतो आणि असे ‘भगीरथ’चे पाठबळ असलेले प्रशिक्षित मेंढपाळ कर्ज बुडवत नाहीत, हा विश्वास बँकेला आहे, त्यामुळे ते त्यांना कर्ज देतात.’ सिंधुदुर्ग भूूमीतील वेंगुर्ल्याजवळील झाराप गावात ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ वसलंय. पंचक्रोशीतील गावांचा विचार करणारा हा एक आधारवड असावा, असे चित्र तिथे दिसत आहे. घराघरातील गृहिणींची अश्रू-मुक्ती हे ‘भगीरथ’चे एक महत्त्वाचे काम! धूरमुक्तीचा हा यज्ञ सुरू झाला २००४ साली. चुलीवरच्या स्वयंपाकाला कशी चव असते, हे शहरी माणूस कितीही कौतुकाने बोलला, तरी रांधणाऱ्या बायांसाठी हे फारच जिकिरीचं काम. लाकूडफाटा गोळा करणं, तो जाळत स्वयंपाक करणं म्हणजे रोज घरोघरी धूर आणि अश्रू. ‘भगीरथ’ने झाराप परिसर धूरमुक्त करण्याचे ठरवले. ‘भगीरथ’चे तरुण कार्यकर्ते अमेय तेंडुलकर, नवीन मालवणकर अशा काहीनी गावागावात जाऊन, सर्वेक्षण करून लोकांची इंधन समस्या समजून घेतली. महागलेला गॅस सिलिंडर हा काही गावकऱ्यांना परवडणारा पर्याय होऊ शकत नाही. ‘भगीरथ’ने ठरवलं, ही स्थिती सुधारायची! नैसर्गिक साधनसंपत्तीचं व्यवस्थापन करून विकासाचा मार्ग अनुसरण्यास प्रोत्साहन देणारा ‘नाबार्ड’चा एक उपक्रम आहे, वेु१ी’’ ढ१ङ्मॅ१ेंी ाङ्म१ ठं३४१ं’ फी२ङ्म४१ूी टंल्लँीेील्ल३- वढठफट. ही शासकीय योजना लोकांपर्यंत पोचवून यशस्वीपणे राबवण्याचा वसा ‘भगीरथ’ने उचलला आहे. या योजनेचे कर्जवाटप आणि कर्जवसुलीची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेने घेतली आहे. वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडी व अन्य पाच तालुक्यांतील मिळून सुमारे ५५०० घरांत आज बायोगॅस आहेत. ‘भगीरथ’चे बायोगॅस मॉडेल असे आहे- गावकऱ्यांना घरात १-२ गुरे घ्यायला सांगायचे, त्यांच्या शेणावर बायोगॅस निर्माण करण्यासाठी टाकी-डोम-पाइप अशी बांधणी करायची, आणि स्वयंपाकघरात बिनाधुराच्या आणि बिनाखर्चाच्या गॅसवर स्वयंपाक करायचा! बायोगॅस प्रकल्प खात्रीने नीट चालावा म्हणून ‘भगीरथ’चे मान्यताप्राप्त गवंडी घरी येऊन बायोगॅस प्रकल्पाची बांधणी व जोडणी करतात. या कुटुंबाने गायी-म्हशीच्या दुधातून दुग्धव्यवसाय करायचा. बायोगॅसची स्लरी वापरून शेत किंवा मळा फुलवायचा, कारण ही स्लरी म्हणजे उत्तम खत असते. बायोगॅस प्रकल्पासाठी जो खर्च येईल त्यातला मोठा हिस्सा सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज म्हणून या गावकऱ्याला मिळेल, अशी व्यवस्था ‘भगीरथ’तर्फे केली जाते. काही खर्च त्या कुटुंबाने करावा अशी अपेक्षा असते. काही ठिकाणी घरातील प्रसाधनगृहाचे आउटलेटसुद्धा या बायोगॅस प्रकल्पाला जोडले जाते. पण काही गावकरी मात्र यासाठी तयार नसतात. त्यांना गोठ्यातील शेणावर बायोगॅस चालवणे, हेच पचनी पडते. बायोगॅससाठी शेण कसे वापरायचे, उरलेल्या चोथ्यापासून खत कसे तयार करायचे हेही समजावून सांगितले जाते. साधारणत: घरात एक जनावर असेल तर तीन माणसांना पुरेल इतक्या इंधनाची गरज भागते, असा अंदाज व्यक्त केला जातो. बायोगॅसच्या शेगड्यासुद्धा पुरवण्याची सोय ‘भगीरथ’ने केली आहे. घरात गाय/म्हैस असली की साहजिकच दुग्धव्यवसायही उभा राहतो, ज्यातून रोज घर चालवायची भ्रांत संपते. घरात पूर्वी जी जागा जळणाच्या लाकूडफाट्यासाठी व्यापलेली असायची, ती बायोगॅस प्रकल्पामुळे मोकळी राहते. तिथे कोंबड्या पाळण्यास प्रोत्साहन देण्याचे काम भगीरथ करते. म्हणजे घरोघरी अंडी सहज उपलब्ध होतात, जी खाऊन कुटुंबाचे पोषण होते; शिवाय कोंबड्या विकण्याचा उद्योगही करता येतो. आणि मुख्य म्हणजे घरात चुलीऐवजी गॅस आल्याने गृहिणींचा वेळ आणि ऊर्जा वाचते. गृहिणींना या वाचलेल्या वेळेचे व ऊर्जेचे व्यवस्थापन करायला शिकवणे हेही काम ‘भगीरथ’ करतेय. वाचलेला वेळ आणि उरलेली ऊर्जा वापरून कोंबडीपालन, शेती, शिवण असे एखादे उत्पादक कामही सुरू झाले की त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते, त्यामुळे कर्ज फेडणे सुकर होते. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे अधिकारी अनिरुद्ध देसाई ‘भगीरथ’च्या पाठीशी ठाम उभे आहेत. त्यांची टीम आज स्वत: ‘भगीरथ’मध्ये येऊन होतकरू गावकऱ्यांना सेवा देते, तेव्हा त्या गावकऱ्यांमध्ये स्वत:ची पत वाढल्याची भावना निर्माण होते आणि त्यांचाही बँकेवरचा विश्वास वाढतो. ‘भगीरथ’चा संस्थापक डॉ. प्रसाद देवधरबरोबर गावात फेरफटका मारताना आम्ही जिथे जिथे गेलो आणि जी जी माणसे भेटत गेली, त्यातून लक्षात आले की, ‘भगीरथ’ने स्वत:ला ग्रामाविकासाच्या आखीव आराखड्यात जखडून घेतलेलं नाही. डॉ. प्रसाद देवधरच्या मनात विकासासाठी काय काय करावं याची स्पष्टता आहे. दोन पातळ्यांवर त्यांचं काम चाललंय. गावातल्या जनतेच्या नेमक्या समस्या कोणत्या आणि काय काय केले म्हणजे गावकऱ्यांना त्यांच्या समस्येतून समूळ बाहेर पडता येईल, याचा विचार ! गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या गरजा/अपेक्षा जाणून घ्यायच्या आणि त्या पूर्ण कशा होतील यावर विचार करायचा, हा मोकळेपणा ‘भगीरथ’च्या कार्यपद्धतीत आहे. पोषण आहारासाठी झारापजवळच्या काही शाळांमध्येही ‘भगीरथ’च्या सहकार्याने बायोगॅस प्रकल्प उभारला गेला आहे. शाळेतील प्रसाधनगृहातील जैविक कचऱ्यातून त्यांच्या पोषण आहारासाठी पुरेसा गॅस तयार होतोय. आम्ही झाराप कामळेवीर जि. प. शाळेला भेट दिली. तिथे मुलामुलींच्या स्वच्छतागृहावर शाळेचा बायोगॅस प्रकल्प कसा चालतोय, ते पाहायला मिळाले. याच बायोगॅसवर मुलांचा रोजचा मध्यान्ह आहार शिजवला जातोय. काही शाळांना आणि विद्यार्थ्यांना ‘भगीरथ’तर्फे सायकली दिल्या जातात. पूर्वी दूरच्या शाळेत जाणे कठीण, म्हणून मुलींचे शिक्षण अडायचे. आता त्या सायकलवर स्वार होऊन झोकात शाळेत जातात. सायकलचे चाक प्रगतीला जलद गती देऊ शकते, ते असे! या प्रतिष्ठानमध्ये काम करणारे उदय आईर. उदयदादाशी गप्पा मारताना समजले की, गावातील कातकरी मुले आतापर्यंत बहुतांशाने शाळेच्या बाहेरच होती. त्यांच्या पालकांबरोबर गावातील बागा राखत फिरायचं, झाडावर चढून फळं काढायची हेच यांचं जीवन होतं. पण उदय आईर या तरुणाने या मुलांच्या घडणीकडे लक्ष द्यायचं ठरवलं. तो महत्प्र्रयासाने या मुलांना शाळेत टिकवतोय. उदयदादाने या मुलांसाठी जवळच्या वेताळ बांबर्डे गावात वसतिगृह सुरू केलंय. तिथे १७ कातकरी मुले राहतात. यंदा प्रथमच ही मुले तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उतरली आणि अंगभूत काटकपणामुळे घवघवीत यश मिळवून आली. शाळेत, गावात त्यांचे कौतुक, सत्कार झाले. यामुळे या मुलांना शाळेत आपल्याला काही महत्त्व मिळतंय असं वाटेल आणि ही मुले शाळेत टिकतील, ही आशा उदयला वाटते. त्यांना विविध खेळांचे रीतसर प्रशिक्षण देण्याची योजना आता प्रसाद आणि उदय मिळून आखत आहेत. गावातील मुलांकडे वेळीच लक्ष देऊन त्यांना कुपोषण किंवा कोणत्याही अभावग्रस्तीचे लक्ष्य होण्यापासून वाचवायचे, याकडेही ‘भगीरथ’चे विशेष ध्यान असते. मध्यंतरी एकदा एक अंगणवाडी शिक्षिका सहज बोलताना म्हणाली, की काही मुले वर्गात फार मलूल असतात. कायम भिंतीला टेकून बसून राहतात. हे ऐकल्यावर प्रसादमधील डॉक्टर ताडकन जागा झाला. प्रसाद आणि त्याची पत्नी हर्षदा दोघेही इंटर पदवीधर. डॉ. हर्षदाने लगेच अंगणवाडीतील ६५ मुलांची तपासणी केली. त्यातील १६ मुले कुपोषित आढळली. मग त्यांना पोषण आहार कसा द्यायचा, हे त्यांच्या मातेला शिकवण्यासाठी काही सत्रे घेतली गेली. एकंदरीत गावाच्या विकासाचे परिपूर्ण मॉडेल ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ उभे करत आहे. ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ आज वेंगुर्ल्यात असे ‘योजक’ म्हणून उभे राहिले आहे. त्यामुळे चांगल्या शासकीय योजना वेंगुर्ल्यातील गावागावांत पोचत आहेत, प्रभावी ठरत आहेत. ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’मुळे ग्रामविकासाचे चक्र गतिमान होताना दिसत आहे.