शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

डंख

By admin | Published: April 23, 2016 1:12 PM

माझ्या आयुष्यात रियाज हा शब्द येण्यापूर्वी आला तो थेट रियाजच. काहीही शिक्षण-बिक्षण न घेताच हातात तबला मिळाला. साथीला कोणी नसलं की माझ्या नावाने पुकारा व्हायचा, ‘छोटू..’ हातातल्या गोटय़ा टाकून मी धावायचो. कमालीची उसळती बंडखोरी व्यक्त करण्यासाठी आणि नवे प्रयोग करून बघण्यासाठी मला काहीही साधन चालते. अशा बंडखोर वयात मला ड्रम मिळाला. माझे सगळे प्रयोग या बंडखोरीतूनच जन्माला आले आहेत.

त्रिलोक गुर्टू

 
वाद्य वाजवणा:या कलाकाराचे हात आधी तयार होतात की कान, असा प्रश्न एकदा मला विचारला कोणीतरी. तेव्हा मी हसलो. हा प्रश्न अशा व्यक्तीला विचारला होता ज्याला वाद्य म्हणजे काय आणि स्वर कशाला म्हणतात याची ओळख होण्यापूर्वीच कानावर सतत स्वर आणि ठेका ऐकू येत होता. जिवंत राहण्यासाठी माणसाला प्राणवायू लागतो तसेच स्वरही गरजेचे असतात असे वाटायला लावणारे माङो बालपण मग मला आठवले.  
एका हाताने मांडीवरच्या पेंगुळलेल्या मुलाच्या तोंडात दुधाची बाटली धरणारी आई जेव्हा दुस:या हाताने केरव्याचा ठेका धरत असते, तेव्हा श्वासाच्या लयीशी जोडले जाणारे ते स्वर दुधाइतकेच गरजेचे आहेत असेच वाटत असते त्या बाळाला.! 
माझ्या आयुष्यात रियाज हा शब्द येण्यापूर्वी आला तो थेट रियाजच, माझ्या आईचा. आईचे स्वर कानावर पडले नाही असा दिवस नव्हे, ताससुद्धा मला आठवत नाही. कारण रियाज नसेल तेव्हासुद्धा ती गुणगुणत असायची. शरीराला जगवणा:या पिठा-मिठाच्या गोष्टी आमच्या घरात अगदी जुजबी होत. ती आमची फारशी गरजच नसावी का? बहुधा आमच्या घरात अखंड वाहणारे स्वरच पोषण देत होते आम्हा सगळ्यांना. मनाचे आणि कित्येकदा शरीराचेसुद्धा. 
आजोबांची सतार, आजीचे नृत्य आणि माझ्या आईचे गाणो. केवढी लखलखीत समृद्धी होती त्या घरात! त्यावेळी, आईचे गाणो माझ्या इवल्याश्या, लकलकणा:या काळजाला दुखवणारे वाटायचे. पण आमच्या घरात निव्वळ आईचे गाणोच नसायचे; त्यासोबत कधी वसंतरावांचा अनवट वाटवळणांनी फिरणारा स्वर असायचा, तर कधी अभिषेकीबुवांचा एखादा नवा प्रयोग आमच्या बैठकीत सगळ्यांसमोर सादर व्हायचा. त्या प्रयोगात ङिारमिर ऑपेरा संगीताची सूक्ष्म थरथर जाणवते अशा चर्चा मग त्यानंतर रंगायच्या. ज्याची सकाळ शाळेच्या दप्तराबरोबर नाही, तर भैरवच्या कोवळ्या सुरांबरोबर सुरू व्हायची आणि संध्याकाळी घरातील देवासमोर निरांजन लागता-लागता बैठकीत तंबो:याचे सूर जमवले जायचे अशा घरात वाढत असताना स्वाभाविकपणो एक गोष्ट घडली. काहीही शिक्षण-बिक्षण न घेताच हातात तबला मिळाला. ठेका धरण्यासाठी. संध्याकाळी बैठक सुरू व्हायची वेळ झाली आणि तबलजी नसल्याने मैफल खोळंबण्याची लक्षणो दिसू लागली की  माङया नावाने पुकारा व्हायचा.  ‘छोटू.’ मग हातातल्या गोटय़ा किंवा रिळावर असलेला मांजा टाकून मी धावायचो, साथ करण्यासाठी. कारण एकच, त्या साथीनंतर होणा:या कौतुकासाठी. त्या कौतुकाने मी भले फुशारून जायचो; पण माझी आई मात्र त्या कौतुकाबद्दल मूकच असायची. इतरांपेक्षा तू खूप वेगळा आहेस हे तुला कळतंय का, असा त्यावेळी मला फारसा न ङोपणारा प्रश्न ती मला पुन्हा-पुन्हा विचारत राहायची. इतरांपेक्षा मी वेगळा आहे हे तिला जाणवत असावे ते माङया हातात असलेल्या निसर्गदत्त ठेक्यामुळे. कोणत्याही गुरूची तालीम न घेता वसंतराव किंवा अभिषेकीबुवा यांच्यासारख्या तयारीच्या कलाकारांसाठी तबल्याचा ठेका धरणो ही गोष्ट सर्वसामान्य मुलांपेक्षा थोडी वेगळी होती हे नक्की. मला हे वेगळेपण जाणवले ते मी घरातील ड्रमवर पहिली थाप टाकली तेव्हा.! हा आवाज तबल्याच्या आवाजापेक्षा थोडा वेगळा होता. अधिक सणसणीत, काहीसा रांगडा आणि मैफलीच्या सभ्य अदबीपासून जरा दूर. मला तो माङया  स्वभावासारखा वाटला. बंडखोर, मनाला पटेल तेच आणि तेच करणारा. मला आठवतेय ना, माझा मोठा भाऊ तेव्हा हिंदी सिनेक्षेत्रत म्युङिाक अॅरेंजर म्हणून काम करीत होता. त्यांनी मला सचिनदा बर्मन यांच्या वाद्यवादकांच्या ताफ्यात तबला वाजवण्यासाठी पाठवले. काम करीत असताना सूचना येऊ लागल्या, इथे लग्गी लाव, ही तिहाई इथे नको टाकू, जरा बदलून पुढे वापरता येते का बघ.. मी शांतपणो उठलो आणि आपला जामानिमा आवरून निघालो. त्यांच्या सूचना निमूटपणो पाळत काम करणारा गरजू साथीदार वगैरे मी आहे असे मला वाटत नव्हते. सचिनदांनी विचारले, ‘किसका बेटा है ये, बडा तेज है..’ तर, या तेज मुलाला आता ड्रम्सचे वेड लागले होते. 
 ड्रम्स वाजवण्याचे शिक्षण किंवा रियाज मी कधी केलाय का असे तुम्ही विचारले तर उत्तर देणो माङयासाठी जरा अवघड आहे. कारण मुळात माङयासाठी ड्रम हे निव्वळ एक साधन होते माङया आत सतत मला जाणवत असलेली लय व्यक्त करण्याचे. माङयाभोवती घडणा:या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारीत राहण्याची कमालीची उसळती बंडखोरी व्यक्त करण्यासाठी आणि नवे प्रयोग करून बघण्यासाठी मला काहीही साधन चालते. अशा बंडखोर वयात मला ड्रम मिळाला. माङो सततचे प्रश्न फक्त संगीतापुरते नसायचे, तर फोटोमध्ये दिसणा:या देवाला चार हात का असतात, असा प्रश्न मला पडायचा आणि आई गाते त्या बंदिशीला तबल्याचा ठेका धरण्याऐवजी ड्रमचा ठेका धरला तर तिचे गाणो कसे होईल असा प्रश्नही पडायचा. त्रिलोकचे वेगळेपण म्हणून माङया ज्या प्रयोगांचा उल्लेख होतो ते सगळे या बंडखोरीतून जन्माला आले आहेत. माझी आई नेहमी म्हणायची, तबल्याचा प्रत्येक बोल वेगळ्या त:हेने वाजवता येतो आणि प्रत्येक स्वर हजारो मार्गांनी सुंदर करता येतो. फक्त त्यात सुरेलपणा हवा.. आता मला या सुरेलपणाचा शोध घ्यायचा होता, माङया बंडखोर पद्धतीने. हा सुरेलपणा माङया  जगण्यात दिसत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये असेल असे मला वाटत होते.. आणि मला तेच आजमावून बघायचे होते. माङयासाठी तोच माझा रियाज होता.. 
या माङया शोधातूनच जन्म झाला माङया पहिल्या बँडचा. वॉटर फ्रंट नावाचा. आजवर तानपुरा-हार्मोनियमच्या संगतीत वावरणा:या या छोटूच्या आयुष्यात गिटार-ट्रम्पेटसारखी वाद्यं आली आणि आमच्या या बँडने तेव्हा मुंबईत लागणा:या अनेक पारशी लग्नांमध्ये धमाल उडवून दिली. पण आमची दिल्लीवर केलेली चढाई मात्र फसली. कारण दिल्लीत कोणत्याच क्लबने आम्हाला उभेसुद्धा केले नाही. त्यांना हवा असलेला तडका आमच्या बँडमध्ये नव्हता का? ठाऊक नाही. पण या शहराने आम्हाला दाखवली उपासमार, रेल्वे फलाटावरच्या नि:शंक रात्री आणि कामासाठीची वणवण. हे अनुभवताना मला वसंतराव देशपांडे त्यांच्या एका खवय्या खांसाहेबांची एक गोष्ट सांगत ती आठवायची.
हे खांसाहेब तालीम घेणो आणि खाना पकवणो या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करीत असायचे. कधी-कधी खांसाहेब दीर्घ श्वास घेत आणि म्हणत, ‘अरे उसमें थोडा तीव्र निखाद (निषाद) डालो..’ तेव्हा त्यांचा इशारा असायचा मिठाकडे.. स्वरात, गाण्यात आणि माङो ज्यावर अत्यंत प्रेम आहे त्या खाण्यात तीव्र निखाद नसेल तर असे अळणी गाणो आणि खाणोही काय कामाचे? गाण्याला वेदनेचा झणझणता, सूक्ष्म डंख देणारा हा रियाज आधी दिल्लीने आणि मग इटलीने माङया ओंजळीत टाकला.. त्याविषयी पुढील लेखात. 
 
मुलाखत आणि शब्दांकन
- वन्दना अत्रे
vratre@gmail.com