शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

देहबोलीचे संकेत

By admin | Published: February 19, 2016 6:44 PM

‘पंतप्रधान मोदींचा फ्रेंच राष्ट्रप्रमुखांच्या कंबरेला स्पर्श?’ ‘रशियाचे राष्ट्रप्रमुख पुतीन यांच्यापुढे जर्मन चॅन्सलर आंगेला मेर्केल यांची पड?

- वैशाली करमरकर
(लेखिका आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ असून ग्योथे इन्स्टिटय़ूट मार्क्‍स म्यूलर भवन येथे विपणनप्रमुख (कॉपरेरेट ट्रेनिंग) म्हणून कार्यरत आहेत.)
 
अर्थाचा अनर्थ करू शकणारा 
देहबोलीचा चांदणचकवा. 
लेखांक एक...
 
‘पंतप्रधान मोदींचा 
फ्रेंच राष्ट्रप्रमुखांच्या कंबरेला स्पर्श?’
‘रशियाचे राष्ट्रप्रमुख पुतीन यांच्यापुढे जर्मन चॅन्सलर 
आंगेला मेर्केल यांची पड?
- अशा प्रश्नचिन्हांचे मळवट भरून 
बातम्यांचे मथळे जगभर घुमू लागतात, याचे कारण देहबोली.
- भाषा आणि शब्दांतून संवाद 
जसा घडतो, तसाच देहबोलीतूनही.
माणसाचे हात, हातांची बोटे, आवाज, त्यातून व्यक्त होणारे हावभाव, चेह:यावरच्या 
बदलणा:या रेषा. 
ही आहेत देहबोलीची मुळाक्षरे. देशोदेशीच्या राष्टप्रमुखांना 
ही मुळाक्षरे जरा 
जास्तच घोटावी लागतात.
 
 
‘राजकारणी आणि त्यांची देहबोली’ ही गोष्ट तशी पुरातनच! वर्षाचा हिशेब लावायचा तर पुरी दोन हजार वर्षे उलटून गेलीत या गोष्टीला. ही गोष्ट लिहिण्याचा मान जातो तो माकरुस फाबीयुस क्वीन्तीलियानुस या रोमन राजदरबारात वीस वर्षे वक्तृत्व कला शिकवणा:या रोमन राजगुरूकडे. आजकालच्या आपल्या राजकारण्यांना लोकांची मने जिंकण्यासाठी जे काही करावे लागते त्यातले बरेच काही त्याकाळी राजा-महाराजांना करावे लागत असे. क्वीन्तीलियानुसने आपल्या सर्व अनुभवांचे सार मग चांगल्या बारा खंडांमधे ग्रंथित केले. या ग्रंथाचे नाव ‘इन्स्तीतूत्सीओ ओराटोरिया’. त्यामधे त्यांनी इतर अनेक गोष्टींसोबत राजप्रमुखाची देहबोली यावर फार मोठा भर दिला आहे. त्यामागची कारणो विशद करताना हे रोमन राजगुरू म्हणतात- ‘पशुप्राण्यांना आपल्यासारखी भाषाकौशल्ये अवगत नाहीत; परंतु तरीही हे पशुप्राणी केवळ त्यांच्या देहबोलीतून त्यांच्या मनातील सर्व भावना व्यक्त करून दाखवतातच की! आणि त्या आपल्या सर्वाना चटकन समजतातही.’ 
चवताळलेला सिंह किंवा लोळण घेणारा लांडगा यांची देहबोली शब्दांपलीकडचे सर्व काही अनुक्तपणो सांगत असते. इतके या देहबोलीचे महत्त्व आहे. देह प्रथम बोलतो. शब्द मागून येतात.
ही देहबोली कोणत्या मुळाक्षरांवर आधारित आहे? - तर त्याचे उत्तर या रोमन राजगुरूंनी विस्ताराने देऊन ठेवले आहे. देहबोली मुख्यत: चार मुळाक्षरांमधून वाचता येते. या अंकलिपीचा श्रीगणोशा करतात ते माणसाचे हात, हातांची बोटे आणि दोन हातांमधून व्यक्त होणारे हावभाव. तुम्ही हाताची घडी घातली आहे? की हात खिशात आहेत? बोटांची अस्वस्थ हालचाल चालू आहे? की दहा बोटांचा मनोरा बनवला आहे? 
- आपले हात आणि बोटे ही सर्व मंडळी मिळून आपल्या मनोतळातल्या यच्चयावत खळबळी कुठल्याही शब्दांशिवाय सर्वार्पयत अलगद पोहचवत असतात.
‘‘काय रे, टेन्शन आहे का?’’
‘‘छे, कुठे काय?’’
- हे संवाद आपल्या सर्वाच्या रोजच्या परिचयाचे आहेत. आपल्या देहबोलीमुळे फुटलेले पेपर हा आपला रोजचा अनुभव आहे.
मग राष्ट्रप्रमुख आणि राजकारणी मंडळी यांना तर या सर्वाची प्रचंड काळजी घ्यावी लागते यात नवल ते कोणते? त्यांच्यावर तर सतत कॅमे:याची लेन्स रोखलेली. त्यात दृक्श्रव्य माध्यमांची शक्तिशाली उपकरणो वार्ताहरांच्या हातात. राजकारण्यांची आणि राष्ट्रप्रमुखांची सेकंदा-सेकंदाची देहबोली टिपत राहिली की मग कधीतरी मटका लागतो. ‘पंतप्रधान मोदींचा फ्रेंच राष्ट्रप्रमुखांच्या कंबरेला स्पर्श?’ अशा पद्धतीच्या उथळ पाण्याचा हाùù थोरला खळखळाट सुरू होतो आणि देहबोलीच्या व्यापारीकरणाचा हा खेळ पुढे चालूच राहतो. गोष्ट फक्त भारताची नाही. जगातील प्रत्येक राष्ट्रप्रमुखाच्या देहबोलीचे विच्छेदन हा मीडियाचा महामंत्र बनला आहे. (पाहा सोबतची छायाचित्रे)  देहबोलीतले दुसरे मुळाक्षर  म्हणजे चेह:यावरील हावभाव. संवादशास्त्रतील तज्ज्ञ मंडळींनी तब्बल दहा हजार प्रकारचे मानवी चेह:यावरील हावभाव नोंदवले आहेत. ही सगळी करामत आहे  चेह:यावरील त्रेचाळीस स्नायूंची. हे स्नायू आपल्या भावनिक आंदोलनांनुसार लक्षावधी प्रकारे आकुंचन आणि प्रसरण पावत राहतात. प्रत्येकाच्या मनोतळात सदैव भावभावनांची कुजबुज चालू असते.  काही भावभावना नकारात्मक, तर काही सकारात्मक. त्यांचा पाठशिवणीचा खेळ सतत चालू असतो. त्यानुसार ओठ मुडपतात, भुवया आकसतात, डोळे किलकिले होतात. चेहरा आणि डोळे हे मनाचे आरसे असतात - असे जगातील सर्व भाषा एकमुखाने बोलतात ते का उगाच?
शिवाय मानवी मेंदूची मुळात रचनाच अशी आहे की दृक्माध्यमातून आलेला संदेश तो सर्वात आधी विजेच्या वेगाने ग्रहण करतो आणि त्याचे पृथ:करण करतो. त्याची ताबडतोब वर्गवारी होते आणि मुलाच्या जन्मापासून साधारणत: आठव्या वर्षार्पयत प्रत्येक मेंदूने स्वत:पुरते जे कप्पे बनवलेले असतात त्या कप्प्यांमधे हे कडेकोट बंद होऊन, ते कप्पे सत्वरी बंदही होतात. कानांनी ग्रहण केलेले शब्द मेंदूर्पयत पोहोचेस्तोव दृक्माध्यमांनी दिलेल्या संदेशाचे अन्वयार्थ हे असे कडीकुलपात जातात. मग शब्द हे व्यर्थ बुडबुडे ठरतात यात नवल ते कोणते?
साधी आपल्या घरातली उदाहरणो आठवून पाहा. आपल्या आई-वडिलांचे भांडण झाले आहे, त्यांचे काहीतरी बिनसून त्यांच्यात अबोला आहे; हे लहान मुलांना न सांगता कळते. त्याचे कारण असते बदललेली, अस्वस्थ देहबोली! राष्ट्रप्रमुखांचे जीवन तर वादावादीच्या कोलाहलाने भरलेले. त्यांच्या अंतरीची खळबळ जर अशी चेह:यातून दिसली तर त्याचा अन्वयार्थ जगातले कोटय़वधी लोक निमिषार्धात लावणार. एखाद्या राष्ट्रप्रमुखावर संपूर्ण राष्ट्राच्या भावनिक स्थैर्याची अप्रत्यक्ष जबाबदारी असते. शिवाय मीडियाचा तिसरा डोळा त्यांच्या विभ्रमाचे, ओठांच्या मुडपण्याचे सतत चित्रीकरण करत असतो, मनाप्रमाणो अन्वयार्थ लावून आंतरराष्ट्रीय घडामोडींचे कोडे सोडवण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे प्रमुखपदी वावरणा:या नेत्यांना आजकाल या देहबोलीचे शास्त्रोक्त शिक्षण घ्यावे लागते. होय, संवाद ही एक महत्त्वाची शास्त्रशाखा आहे. शब्दसंवाद आणि देहबोलीसंवाद (व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉनव्हर्बल कम्युनिकेशन) हे या शास्त्रचे भले थोरले स्वतंत्र अभ्यास विभाग आहेत. संवादशास्त्र म्हणजे संवादांच्या संकेतांचे दळणवळण कशाप्रकारे होते हे शिकवणारे शास्त्र.
- त्याविषयी अधिक पुढच्या रविवारी.