- हेरंब कुलकर्णी
23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन. मुलांवर वाचनाचे संस्कार व्हावेत यासाठी महाराष्ट्राच्या काही भागात जाणीवपूर्वक प्रयत्न होताहेत. त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सहयोगाने ही चळवळ आता व्यापक स्वरूपात रुजू पाहते आहे. त्यासाठी त्यांना फार कष्ट करावे लागलेत, असे नाही. त्यामागची कल्पकता मात्र अतिशय प्रेरणादायी आणि उद्बोधक आहे. शाळापातळीवर वाचनालय सुरू करणो, पुस्तकांची संख्या वाढविणो, मुले-शिक्षकांमध्ये वाचनाची आवड विकसित करणो अशा उपक्र मांतून विद्यार्थी-शिक्षकांत वाचनसवयी विकसित होत आहेत.
सुचिता पाटेकर, यवतमाळ
मनुष्यबळ विकास मंत्रलयाने ज्यांचे कौतुक केले त्या यवतमाळच्या शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी राबविलेले उपक्रमही उल्लेखनीय आहेत. ग्रामीण भागातील महिला एकमेकींची आर्थिक नड भागवायला भिशी लावतात. पाटेकर यांनी प्रत्येक केंद्रातील शाळांची तशी भिशी सुरू केली. एक केंद्र म्हणजे साधारण 10 शाळा. या 10 शाळांतील शिक्षकांनी प्रत्येकी 100 रुपये जमा करायचे. त्यात केंद्रप्रमुखांचे 100 रु पये असे 1100 रुपये जमल्यावर चिठ्ठी काढून ज्या शाळेला भिशी लागली त्या शाळेने त्या रकमेची पुस्तके आणायची! साधारणत: 1100 रु पयांत कमिशन वजा जाता 1700 रुपयांचा 121 पुस्तकांचा संच घेता येतो. वर्षभरात सर्व शाळांना भिशी लागत असल्याने सर्व शाळांना ही पुस्तके मिळाली आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांनी जमवलेली रक्कम मोजली तर ती 23 लाख 36 हजार रुपये आहे. शिक्षक व शाळांनी जमा केलेल्या या रकमेतून आज शाळांची ग्रंथालये समृद्ध होत आहेत. पुण्या-मुंबईत सहजपणो पुस्तक प्रदर्शन होतात; पण विदर्भाच्या एका दुर्गम जिल्ह्यात हा उपक्र म खेडय़ातील शाळेशाळेत होतो हे थक्क करणारे आहे. त्यात अगदी हस्तपुस्तिका, मासिके, शैक्षणिक मासिके, मराठी, हिन्दी, इंग्रजी वर्तमानपत्रं, पेपरच्या रविवार पुरवण्या, मुलांकडील पुस्तके मांडली गेली. दिवाळीत एक मुलगा फटाके वाजवताना भाजल्यावर पाटेकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांतील मुलांना पत्र लिहून ‘फटाके नको, पुस्तके हवीत’ असे अभिनव अभियान राबविले.
कल्पना बन्सोड, चंद्रपूर
चंद्रपूरच्या प्रयोगशील शिक्षिका कल्पना बन्सोड यांनी मुलांना लिहिते केले आहे. मुले कविता, कथा लिहितात. पण चांगले लेखक होण्यासाठी प्रत्येक मुलाच्या घरी ग्रंथालय असावे यासाठी मुलांची पुस्तक भिशी ही कल्पना राबवली. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मुलांनी खाऊच्या वाचलेल्या पैशातून 2क् रु पये आणायचे. ज्यांची ऐपत नसेल त्यांनी कमी आणले तरी चालतील. आणि नंतर त्यातून दोन विद्याथ्र्याच्या चिठ्ठय़ा काढायच्या आणि त्या रकमेची या मुलांनी आवडीची पुस्तके घ्यायची. यातून मुलांचे घरोघर एक बालग्रंथालय तयार झाले. वर्गात 26 विद्यार्थी असल्याने वर्षात सर्वाचा नंबर लागला. ‘आपली स्वत:ची’ पुस्तके यातून पुस्तकप्रेम विकसित करणारा हा उपक्र म कोणताही शिक्षक करू शकतो.
तृप्ती अंधारे, लातूर
अशीच पुस्तक भिशी फक्त शिक्षकांची लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी सुरू केली. तालुक्यातील 35 शिक्षिकांची भिशी दिवाळीत सुरू करण्यात आली. प्रत्येकी 1क्क् रुपये काढून 35क्क् रु पये एका शिक्षिकेला दिले जातात व तिने तेवढय़ा रकमेची पुस्तके आणायची. त्यातून एका शैक्षणिक मासिकाची वर्गणी पण भरणो बंधनकारक आहे. भिशीसाठी जेव्हा सर्वजण एकत्र येतील तेव्हा प्रत्येकीने आपण वाचलेल्या एका पुस्तकावर बोलायचे असे ठरवल्याने आपोआप वाचन वाढते आहे.
नरेंद्र लांजेवार, बुलढाणा
वाचनसंस्कृतीसाठी शाळेत होणारे हे उपक्रम आपण बघितले; पण शाळा समाजात जाऊनही असे अनेक वाचनसंस्कृतीचे उपक्र म राबवू शकतात हे बुलढाणा येथील भारत विद्यालयाचे ग्रंथपाल व लेखक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. बुलढाण्याच्या 32 गल्ल्यांमध्ये 32 बालवाचनालये स्थापन केली आहेत. या वाचनालयांना इमारत, फर्निचर काही नाही. 32 पेटय़ांत 1क्क् पुस्तके देऊन ही वाचनालये त्या भागातील एका मुलाच्या घरात सुरू झाली. तो मुलगा/मुलगी हीच ग्रंथपाल. त्या परिसरातील मुले येऊन त्या वाचनालयात पुस्तके घेतात. महाराष्ट्रातील अनेकांचे या उपक्र माने लक्ष वेधून घेतले. हा उपक्रम इतका सहजसोपा आहे की कुठेही त्याचे अनुकरण होऊ शकते. माङया गावात यापासून प्रेरणा घेऊन लोकमतचे प्रतिनिधी रियाज सय्यद व आम्ही मदरशात असे वाचनालय सुरू केले. मी घरातही परिसरातल्या मुलांसाठी असे बालवाचनालय सुरू केले. भारत विद्यालयात वाचनाचे अनेक उपक्र म होतात. मुले दरवर्षी एक आवडते बालसाहित्याचे पुस्तक निवडून त्याला पुरस्कार देतात. परीक्षक मुलेच असतात. सर्वोत्तम वाचक पुरस्कार सुरू करण्यात आला. एका वर्षात मुले किमान 70 पुस्तके वाचतात. मुलांना त्यांनी कोश बघायला शिकविले आहे. वाचनालयात 55 नियतकालिके येतात. लांजेवार यांचे विद्यार्थी आवडत्या लेखकांना पत्र लिहितात आणि स्वत:ही लेख, कविता लिहितात.
वैशाली गेडाम, चंद्रपूर
चंद्रपूरच्या वैशाली गेडाम या प्रयोगशील शिक्षिकेने ज्या ज्या गावात नोकरी झाली त्या त्या गावात वाचनालय उभारले. गावक:यांना पुस्तकाची आवड लागावी म्हणून गावक:यांना पुस्तके घरपोच देण्याचाही उपक्र म त्यांनी राबविला. मारडा या गावात रोज सकाळी 6 वाजता लाउडस्पीकर लावून ग्रामगीतेचे वाचन तिने केले. एक शिक्षक एखाद्या गावाच्या विकासासाठी किती झपाटून काम करू शकतो याचे वैशाली गेडाम उदाहरण ठरावे.
पुंजाजी रामजी भोर विद्यालय, ठाणगाव
नाशिक जिल्ह्यातील ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालयातील सहावीच्या विद्याथ्र्यानी ‘ग्रंथदान श्रेष्ठदान’ अशी नाटिका सादर करून घरातील आनंदी किंवा दु:खी प्रसंगी पुस्तके द्या असा संदेश दिला. त्यातून लोक दहावे/तेरावे/ वाढदिवस यासाठी खर्च न करता गावकरी पुस्तके देऊ लागली. यातून बालग्रंथालय सुरू करण्यात आले. यात ओंकार शिंदे हा मुलगा ग्रंथपाल असून, राहुल पगारे हे शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात.
एक लाख शिक्षक, पालक, विद्याथ्र्यानी दिली अवांतर वाचनाची परीक्षा
जळगावच्या दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने अवांतर वाचनाच्या परीक्षा घेतल्या जातात. गेल्या पाच वर्षात धुळे, नंदुरबार, जळगाव येथे शिक्षक, विद्यार्थी, पालक मिळून एक लाख 13 हजार जणांनी या परीक्षा दिल्या. परीक्षेत यशस्वी झाल्यावर पहिल्या 15 शिक्षकांना राष्ट्रपती भवन ते आयआयएम, आयुकासारख्या संस्था दाखवल्या जातात, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, नरेंद्र जाधव, अच्युत गोडबोले यांसारख्या शास्त्रज्ञ, तज्ज्ञांना भेटवले जाते. पुण्याची अक्षरनंदन, ज्ञानप्रबोधिनी यांसारख्या प्रयोगशील शाळा दाखवल्या जातात. नंतरच्या यशस्वी 1क्क्क् जणांना पुस्तके भेट दिली जातात. यशस्वी विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी शिबिरे सतत आयोजित केली जातात. या निवडलेल्या विद्याथ्र्यासाठी सलग पाच वर्षे शिबिरे होत असून, या विद्याथ्र्याना स्पर्धा परीक्षेला बसण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रकल्पाचे प्रमुख यजुर्वेन्द्र महाजन सांगतात की, ‘अवांतर पुस्तक’ हा शब्द सांगितला तेव्हा या नावाचे एखादे पुस्तक असते का, असे काही मुलांनी विचारले. इथपासून सुरु वात केली. यानिमित्त काही मुले सहलीला रेल्वेत प्रथम बसली. 7 ते 8 लाख रुपये तोटा सोसूनही हा प्रकल्प सुरू आहे.
(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रयोगशील शिक्षक आहेत.)
herambkulkarni1971@gmail.com