शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

बुमला पास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 4:00 AM

बुमला पासवरची भारताची चौकी एका उंच पहाडावर आहे. पहाडाच्या काठावर एक खुणेचा विशाल खडक रोवलेला- ‘रॉक आॅफ पीस’! त्याच्या शेजारी दोन सैनिक दुर्बीण घेऊन बसलेले. दुर्बिणीच्या त्या टोकाला चीनची पहिली चौकी आहे.आम्हीही क्षणभरासाठी त्या दुर्बिणीला डोळे लावतो. समोर दिसते ती चीनची भूमी?..

युद्धाचे ढग दाटू लागले, की चर्चेत येतात त्या दोन शेजारी देशांना दुभागणाºया नकाशावरल्या सीमारेषा! पण देशांच्या सीमारेषा फक्त नकाशावर नसतात, त्या वास्तवातल्या माणसांची आयुष्येही चिरफाळून टाकतात. साध्यासुध्या माणसांची घरे आणि आयुष्येही जेव्हा युद्धभूमी बनून धुमसायला लागतात, तेव्हा काय घडते?मुलांच्या शाळेत जायच्या वाटेवरून जेव्हा सैन्याच्या तुकड्या पुढे सरकताना दिसतात... राहत्या गावापासून तिसेक किलोमीटर अंतरावर जेव्हा युद्धाचे नगारे वाजायला लागतात, तेव्हा काय घडते?एकमेकांशी संघर्ष घेऊन विरोधात उभ्या ठाकलेल्या दोन महासत्ता सामान्य मुला-माणसांना जेव्हा तलवारीच्या पात्यावर उभे करतात, तेव्हा काय घडते?- हे शोधायला निघालो होतो.जिथे चकमकी सुरू होत्या, त्या डोकलामच्या प्रदेशात पोहचणे सुरक्षेच्या कारणास्तव अशक्य बनले होते. त्या परिसरात रहिवासी भाग तसा विरळच. वस्ती अगदीच तुरळक. त्यातून होती ती माणसेही सैन्याने सुरक्षेच्या कारणास्तव मागे हलवलेली.... म्हणून मग १९६२च्या युद्धात चिनी सैन्याने कब्जा केलेल्या तवांग व बुमला येथील भारत-चीन सीमेच्या परिसराला भेट देण्याचे ठरले. तिथवर जाण्याची वाट बिकट, आडवळणाची. मैलभराचा चढणीचा रस्ता कापायचा तर काही तास हवेत, अशी बिकटवाट!- पण निघालो.भल्या सकाळी पुन्हा प्रवास सुरू झाला. तवांग ते बुमला पास हे जेमतेम ३७ किमीचे अंतर. भारत-चीन सीमेवर जाण्याची कल्पना थरारक असली तरी तेथवर पोहोचणे हे मोठे दिव्य! ओबडधोबड दगडांचा अरु ंद रस्ता... त्यावरून होडीसारखी डुलत जाणारी मोटार... समोरून लष्कराची अवजड वाहने आल्यावर तिचे अंग चोरून एका बाजूला उभे राहणे..नवा ड्रायव्हर सांगतो, डाव्या बाजूच्या दरीत पाहा. गेल्या युद्धात चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांची प्रेते या दरीत भिरकावून दिली होती...रस्त्यात एक झाड दिसेल तर शपथ! पाहावे तिथे पहाडी सुळके. कुठे काळे दगड, तर कुठे पांढुरके भुरे.वाटेत ठिकठिकाणी लष्कराची उपाहारगृहे दिसतात. तिथे गरमागरम मोमो, समोसे आणि चहा शिवाय गरम पाणी मिळते. काही ठिकाणी गरम जाकिटे, टोप्याही मिळतात. शिवाय बुमला पासचे फोटो असलेले बिल्ले!आणि जिकडे पाहावे तिकडे गस्तीवरचे जवान!जसजसे वर चढत होतो, श्वास घेणे कठीण होत चालले होते. या इतक्या विरळ हवेत हे जवान कसे काम करीत असतील? - नुसत्या कल्पनेनेही ऊर भरून यावा, असे वातावरण!बुमला पासवरची भारताची चौकी एका उंच पहाडावर आहे. पहाडाच्या काठावर एक खुणेचा विशाल खडक रोवलेला - ‘रॉक आॅफ पीस’!त्याच्याशेजारी दोन सैनिक दुर्बीण घेऊन बसलेले.दोघांपैकी एकाचा डोळा अखंड त्या दुर्बिणीला लागलेला.दुर्बीण समोर रोखलेली...दुर्बिणीच्या त्या टोकाला चीनची पहिली चौकी आहे.आम्हीही क्षणभरासाठी त्या दुर्बिणीला डोळे लावतो...समोर दिसते ती चीनची भूमी?कसं दिसतं तवांगमधलं आणि बुमला पासच्या अवतीभोवतीचं अरुणाचल प्रदेशातलं चित्र..वाचा यंदाच्या लोकमत ‘दीपोत्सव’मध्ये..