शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
3
महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?
4
Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
5
कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी
7
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
8
Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali Vidhansabha : कांदिवली पूर्वेतून भाजपचे अतुल भातखळकर आघाडीवर, विजयाची हॅटट्रिक मारणार का?
9
शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले
10
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
11
झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
12
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
16
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : Video - "पुन्हा एकदा..."; निकालाच्या दिवशी नेतेमंडळी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक
18
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
19
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
20
व्हॉट्सॲप ग्रुपवरून ज्ञान, घरीच केली प्रसूती; चेन्नईतील खळबळजनक घटना

‘बटन मसाला’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 6:00 AM

डिझाइन हे अनेक प्रश्नांवरचं उत्तर आहे.  फॅशन हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. फॅशनवर होणारा खर्च, त्यामागची मेहनत,  कपड्याचा आणि सामग्रीचा अपव्यय  अशा अनेक प्रश्नांवर अनुज शर्मा यांनी उत्तर शोधलं. एक सलग आयताकृती कपडा,  बटन म्हणून गोट्या, शिंपले, बिल्ले, खडे. असे जे काही उपलब्ध असेल ते आणि रबरबॅण्ड!  फक्त एवढय़ाच सामग्रीतून पेहेरावाचे अनंत प्रकार!  कुठेही कापलं नाही की शिवलं नाही. त्यामुळे कापडाचा एकही तुकडा वाया गेला नाही.  मशीनचा वापर नाही, त्यामुळे ऊर्जाही खर्च झाली नाही!

ठळक मुद्दे‘बटन मसाला’! हेच तंत्र वापरून तयार होताहेत  बॅग, पर्स, पडदे, कुशन कव्हर.

- स्नेहल जोशी गेले काही दिवस आपण श्ॉम्पू-सॅशे, हिप्पो रोलर, लाइफ-स्ट्रॉ यांसारख्या उदाहरणांद्वारे डिझाइन काय घडवू शकतं हे पाहत आहोत. डिझाइनमुळे आर्थिक स्वातंत्र्य, र्शम-मुक्ती, आरोग्य-उन्नती, विद्यार्जन साध्य झालेलं आपण आजवरच्या लेखांमधून पाहिलंच आहे. या सगळ्यातून एव्हाना डिझाइनच्या शक्तींचा अंदाज तुम्हाला आला असणारच. त्यातलाच एक नवा पैलू आज मी तुम्हाला उलगडून दाखवणार आहे. तो आहे फॅशन जगतातला. फॅशन म्हटल्यावर जरा साशंक झाला असाल - त्यात काय ताकद? फॅशन मुळातच क्षणभंगूर नाही का? असे प्रश्न लगेच डोकावले असतील. ते योग्यही आहेत. मागच्याच लेखात हृषिकेशनं म्हटल्याप्रमाणे जगातले 90 टक्के डिझाइनर हे केवळ 10 टक्के  जनतेच्या गरजांसाठी कार्यरत असतात. उरलेल्या 90 टक्के लोकांच्या गरजांची पूर्तता कशी होणार? फॅशन डिझाइनचीही तीच गत आहे.फॅशन शोमध्ये फॅशनच्या नवीन कल्पना, कलाकृती सादर केल्या जातात. त्यामुळे तिथे अतिशयोक्तीचा वापर होत असतो. त्यातून लोकांच्या शरीरावर घालण्यायोग्य कपडे निर्माण करेपर्यंत बरीच मोठी प्रक्रि या घडते. फॅशन जगताची छाप आपल्यावर अप्रत्यक्षपणे; पण खोलवर पडलेली असते हे मात्न निश्चित. याच जगात वावरणारा अहमदाबादस्थित एक फॅशन डिझायनर - अनुज शर्मा. त्याला मात्न फॅशन डिझाइनवर होणारा खर्च, त्यामागे घेतलेली मेहनत, त्यातून होणार्‍या कपड्याचा आणि सामग्रीचा अपव्यय या सगळ्या बाबतीत प्रश्न पडायला लागले. होतं काय की, कपडे डिझाइन केले जातात, मग लहान-मोठय़ा मापात, वेगवेगळ्या रंगात ते शिवले जातात, बाजारात येतात आणि विकले जातात. तरीही तुमच्या-आमच्या पसंतीस पडतीलच, चपखल मापात बसतीलच असं नाही. याला काही तोडगा असेल का? साडी आणि धोतरासारखे भारतीय पेहेराव या बाबतीत किती सुटसुटीत आहेत. मापाचा प्रश्न तर नाहीच शिवाय एकच साडी कितीतरी पद्धतींनी नेसता येते. तेव्हा ड्रेस डिझाइन करण्यापेक्षा पेहेरावाचं तंत्न विकसित करता आलं तर? या प्रेरणेतून सतत विचार करत असताना अनुजचं लक्ष शर्टच्या बटणांकडे गेलं. दोन कापडांना एकत्न आणण्याचं, जोडण्याचं सोपं तंत्न. आपल्याच शर्टाची बटणं जर आपण क्र म मोडून वर-खाली लावली तर परिणामी शर्टचा आकार बदलतो. यातून अनुजला मार्ग गवसला.2011 साली ‘बटन मसाला’ जन्माला आला. सुरुवातीला एक सलग कापड घेऊन त्याच्या अध्र्या भागावर बटणं लावून घेतली आणि अध्र्या भागावर काजी केली. आता हे कापड अंगावर घालून हवं ते बटन हव्या त्या काज्यात घातलं की त्याला आकार मिळणार. पण मग लक्षात आलं की हा काजं-बटन युक्त कपडा तयार करायला कष्टप्रद आहे, शिवाय खूप काजी केल्यानी कपडा लवकर जीर्ण होण्याची शक्यता आहे. यातून पुढे मार्ग म्हणजे काजं न करता रबरबॅण्ड वापरले तर? मग बटन तरी शिवत का बसावं? त्याऐवजी बटन, गोट्या, शिंपले, बिल्ले, खडे असं काहीही कपड्यात ठेवून वरून रबर बांधलं की बटन तयार. डिझाइन सगळ्याच बंधनातून मुक्त झालं. एक सलग आयताकृती कपडा, बटन म्हणून जे काही उपलब्ध असेल ते आणि रबरबॅण्ड - फक्त एवढय़ाच सामग्रीतून पेहेरावाचे अनंत प्रकार अनुजनी साध्य केले. कुठेही कापलं नाही की शिवलं नाही त्यामुळे कापडाचा एकही तुकडा वाया गेला नाही. मशीनचा वापर नाही त्यामुळे ऊर्जाही खर्च झाली नाही. पेहेरावाची एखादी पद्धत पसंत न पडल्यास, आपण आपल्या मनाने पद्धत बदलू शकतोच. त्यामुळे डिझायनरला अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर मिळालच; पण ते ग्राहकापर्यंतसुद्धा पोहोचलं हे अधिक महत्त्वाचं. अनुजच्या मते बटन मसाला हे प्रॉडक्ट नसून तंत्न आहे. या तंत्नामुळे फॅशन अर्थगणितातून स्वतंत्न होतं.लॅकमे फॅशन वीकमध्ये अनुजचं डिझाइन खूप गाजलं. पण या डिझाइनची ताकद आणि जबाबदारी फॅशन वीकहून खूप जास्त आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. एखाद्या मोठय़ा फॅशन लेबलबरोबर सौदा करण्यापेक्षा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय अनुजनी घेतला. हस्तकला, हातमाग व्यावसायिकांसाठी कार्यशाळा घ्यायला त्यानं सुरु वात केली. यातून बटन मसालाचे अजून नवे प्रयोग सुरू झाले. पेहेरावच काय; पण हे तंत्न वापरून कारागीर आता बॅग, पर्स, पडदे, कुशन कव्हर या वस्तूदेखील तयार करू लागले.पण सगळ्यात अनोखी कार्यशाळा झाली ती मुंबईच्या धारावी झोपडपट्टीमध्ये. अन्न, वस्र, निवारा या मूलभूत गरजांचा प्रश्न धारावीमध्ये नेहेमीच भेडसावत असतो. त्यात पावसाळा चालू झाला की, तो अजूनच तीव्र होतो. अनुजनं पावसाळ्यात धारावीमधल्या सर्व मुलांना एकत्न बोलावलं आणि त्यांच्या अडचणींबाबत विचारलं. मुलांना पावसात शाळेत जाता येत नाही, स्वत:चा आणि मुख्यत: दप्तराचा पाण्यापासून बचाव करता येत नाही ही सर्वात मोठी अडचण होती. अनुजनं मुलांना आसपास उपलब्ध असलेले जाहिरातींचे फ्लेक्स, जुन्या ताडपत्नी, प्लॅस्टिकच्या पिशव्या असं गोळा करायला सांगितलं आणि बटन मसालाचा वर्ग सुरू झाला. बिल्ले, दगड, गोट्या बटन म्हणून वापरून काही तासातच सगळ्यांचे रेनकोट तयार झाले. एका रेनकोट मागे जेमतेम एक रु पया खर्च.  हे रेनकोट किती सुंदर आहेत हे फोटोत प्रतीत होतंच आहे. एखाद्याला वस्तू दान करून त्याच्या गरजा भागवता येऊ शकतात. पण त्याऐवजी स्वत: गरज भागविण्यासाठी माणसाला सक्षम करणं, स्वयंसिद्ध करणं हे नक्कीच अधिक उदात्त ठरतं. आणि डिझाइनमध्ये असलेली ही ताकद वापरणं आज काळाची गरज आहे.

snehal@designnonstop.in(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)

छायाचित्र सौजन्य : अनुज शर्मा